COVID-19 : तुम्हाला न भेटता Zomato अशी करणार होम डिलिव्हरी

पोलिसनामा ऑनलाईन – कोरोना व्हायरसचे संक्रमण पसरणे थांबवण्यासाठी फूड डिलिव्हरी सर्व्हिस झोमॅटोने कॉन्टॅक्टलेस डिलिव्हरी पर्यायाची सुरुवात केली आहे. हा पर्याय iPhone च्या झोमॅटो ऍपसाठी आणला जात आहे. याला तुम्ही ऍप स्टोअरमध्ये जाऊन अपडेट करू शकता.

काय आहे हा Contactless Delivery Option?

ही पद्धत खूपच सोपी आहे. सर्वात पहिले युजर झोमॅटो ऍपमध्ये जाऊन कोणत्याही हॉटेलमधून जेवण ऑर्डर करेल. आता यानंतर युजरला कॉन्टॅक्टलेस डिलिव्हरी पर्याय निवडावा लागेल. ऑर्डर झाल्यानंतर डिलिव्हरी एक्जिक्यूटिव (delivery boy) ऑर्डर फॉलो करेल आणि तुमच्या घराच्या दरवाजा बाहेर कोणत्यातरी साफ टेबलवर पॅकेट ठेवून देईल. यानंतर फोटो काढून तुम्हाला सेंड करेल.
यानंतर तुम्ही तुमची ऑर्डर उचलू शकता आणि जेवण एन्जॉय करू शकता.

लक्षात राहू द्या कि कॉन्टॅक्टलेस डिलिव्हरी पर्याय फक्त प्रीपेड ऑर्डरसाठीच आहे, ‘Pay on delivery’ साठी नाही. झोमॅटोचा हा पुढाकार सोशल डिस्टंसिंगला चालना देण्यासाठी आहे, ज्यामुळे डिलिव्हरी बॉय आणि ग्राहकामध्ये कोणत्याही प्रकारचा संवाद होणार नाही. झोमॅटोची ही नवीन सर्व्हिस त्या सर्व हॉटेलसाठी उपलब्ध आहे, जे या प्लॅटफॉर्मवरून फूड डिलिव्हरी सर्व्हिस ऑफर करत आहेत.

COVID-19 ला थांबवण्यासाठी झोमॅटोने हॉटेल्ससाठी नवीन एडव्हायजरी सादर केली आहे. कंपनी सुनिच्शित करत आहे कि फूड प्रोडक्टला पॅक करताना सगळ्या नियमांचे पालन केले जाईल. झोमॅटोने हेही सांगितले कि ते ग्राहकांना जेवण जेवायच्या अगोदर हात धुण्यासाठीही आठवण करून देत आहेत.