साथीच्या रोगानंतर झोमॅटोने पुन्हा सुरू केली भरती , जाणून घ्या कोणाला मिळणार रोजगार

नवी दिल्ली, वृत्तसंस्था : देशभर पसरलेल्या कोरोना साथीच्या दरम्यान अनेकांना आपल्या नोकरीवरून हाथ धुवावे लागले. या दरम्यान झोमॅटो पुन्हा एकदा कर्मचार्‍यांना कामावर घेणार आहे. आपला स्टाफ वाढविण्यासाठी कंपनी रेफरल मोडद्वारे हायरिंग करणार आहे. कंपनी सध्या सुमारे ४०० कर्मचाऱ्यांना वाढवण्याचा विचार करीत आहे. याआधीही कंपनीने सुमारे ४०० कर्मचाऱ्यांना आपल्यासोबत जोडले आहे. सध्या कंपनीत सुमारे ३६०० कर्मचारी आहेत. गुरुग्रामवर आधारित कंपनीची प्रमुख आकृती चोपडा यांनी सांगितले की कंपनी रेफरल पद्धतीने नोकरीवर घेणार आहे. यासह, त्या म्हणाल्या कि, मे २०२० मध्ये बाजारातील मंदीमुळे कंपनीने आपल्या जवळपास १३ टक्के कर्मचार्‍यांना सुट्टी दिली होती.

टेक आणि उत्पादन टीमसाठी भरती सुरु
झोमॅटोच्या या भरतीतील बहुतेक पदे टेक आणि प्रॉडक्ट टीमसाठी आहेत. कंपनी दरमहा सुमारे १० ते १५ लोकांना आपल्यासोबत जोडत असते. या व्यतिरिक्त कंपनी सेल्स, फायनान्स व लीगल टीमसाठी देखील काम करत आहे. चोपडा म्हणाल्या कि, २०२० हे आपल्या सर्वांसाठी कठीण, परंतु रिवॉर्डिंग ईयर होते. देशभरात लॉकडाउन उघडल्यानंतर फूड डिलिव्हरी आणि डाइनिंग आउटची मागणी वाढताना पाहायला मिळाली.. आम्ही आमच्या टीमला त्या लोकांच्या योग्य सेटसोबत आणखी मजबूत करू इच्छितो, जे झोमॅटोला पुढे नेण्यासाठी सतत काम करत आहे. ते पुढे म्हणाले की, रेफरलने खरोखरच आमची भरती प्रक्रिया सुलभ केली आहे. मुलाखतींच्या फेऱ्यांची संख्या कमी करण्यास आम्हाला मदत केली आहे आणि उमेदवाराच्या मुख्य वैशिष्ट्यांकडे लक्ष केंद्रित करण्यास आम्हाला वेळ दिला आहे.