Zomato Share | 78 टक्के शेअरचे लॉक-इन संपले, एक्सपर्टने व्यक्त केली मोठ्या घसरणीची शक्यता

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – झोमॅटो (Zomato Share) च्या 78 टक्के शेअर्सचा लॉक-इन कालावधी पुढील आठवड्यात संपत आहे. अशावेळी कंपनीच्या शेअर्सवर विक्रीचा दबाव निर्माण होण्याची भीती विश्लेषक व्यक्त करत आहेत. असे झाल्यास, स्टॉक सध्याच्या पातळीपासून आणखी खाली जाईल. आज मंगळवारच्या क्लोजिंगमध्ये, झोमॅटोचा स्टॉक NSE वर 0.65 टक्क्यांच्या वाढीसह 53.95 रुपयांवर बंद झाला. मात्र, तो कालचा उच्चांक मोडू शकला नाही. (Zomato Share)

 

लॉक-इन कालावधी काही ठराविक विशेष गुंतवणूकदारांसाठी असतो. जेव्हा एखाद्या स्टॉकच्या मोठ्या टक्केवारीचे लॉक-इन संपते तेव्हा ते गुंतवणूकदार त्यांचे शेअर्स विकू शकतात. त्यापूर्वी ते त्यांचे शेअर्स विकू शकत नाहीत. अशावेळी गुंतवणूकदारांनी ते शेअर विकायला सुरुवात केली तर मोठी घसरण होऊ शकते. पण गुंतवणूकदारांनी त्यांचे शेअर्स विकलेच पाहिजेत असे नाही.

 

किंमतीवर होऊ शकतो वाईट परिणाम
मनीकंट्रोलमधील एका बातमीनुसार, इनगव्हर्नचे संस्थापक आणि एमडी श्रीराम सुब्रमण्यम म्हणाले, या कंपनीमध्ये कोणीही प्रमोटर्स नाहीत. संस्थापकांसह सर्व शेअरधारकांचा त्यात 77.87 टक्के हिस्सा आहे. 23 जुलै रोजी लॉक-इन कालावधी संपल्यानंतर हे भागधारक त्यांचे शेअर्स विकण्यास मोकळे असतील. त्यांना कोणताही खुलासा करण्याची गरज नाही. याचा शेअरच्या किमतीवर मोठा परिणाम होऊ शकतो. ते म्हणाले की, जेव्हा अँकर गुंतवणूकदारांसाठी लॉक-इन कालावधी संपला होता तेव्हा केवळ एका दिवसात स्टॉक 8 टक्क्यांनी घसरला होता. (Zomato Share)

यामुळे आहे खाली जाण्याची शक्यता
इक्विनॉमिक्स रिसर्च अँड अ‍ॅडव्हायझरीग्रामचे संस्थापक जी चोक्कलिंगम, म्हणाले, किरकोळ गुंतवणूकदारांसाठी हे पाहणे महत्त्वाचे आहे की पीई/व्हीसी गुंतवणूकदार कोणत्या किमतीवर आले आहेत.
जर त्यांची झोमॅटो शेअर्सची खरेदी किंमत सध्याच्या किमतीपेक्षा खूपच कमी असेल, तर मंदीच्या स्थितीत त्यांना बाजारात नफा बुक करायला आवडेल.
त्यांनी म्हटले की, कारण अनेक गुंतवणूकदारांसाठी शेअर्स खरेदीची किंमत खूपच कमी असल्याने त्यांना नफा बुक करण्याची संधी मिळेल.
त्यामुळे 23 जुलैनंतर स्टॉक खाली जाण्याची शक्यता जास्त आहे असे मला वाटते.

 

76 रुपये दराने झाले वाटप
Zomato चा स्टॉक गेल्यावर्षी 23 जुलै 2021 रोजी शेअर बाजारात लिस्ट झाला होता. त्याची खूप चांगली लिस्टिंग होती.
झोमॅटोने आयपीओमध्ये गुंतवणूकदारांना 76 रुपये किमतीचे शेअर्स वाटप केले.
कंपनीचा शेअर बीएसईवर 51 टक्के प्रीमियमसह 115 रुपयांवर लिस्ट झाला होता.
त्यानंतरही शेअर्समध्ये तेजीचा कल कायम राहिला. बीएसईवर शेअरची किंमत 169 रुपयांच्या सार्वकालिक उच्चांकावर पोहोचली होती.
कंपनीच्या बाजार भांडवलाने 1 लाख कोटी रुपयांचा टप्पा ओलांडला होता.

 

Web Title :- Zomato Share | lock in for 78 per cent zomato shares to expire next week analysts see big sell off risk

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा

 

Eknath Shinde | बाळासाहेबांनी लिहिलेली शिवसेनेची घटना काय सांगते; CM एकनाथ शिंदेंना नुसते आमदार, खासदार पुरेसे नाहीत?

 

Shivsena | खासदारांच्या बंडखोरीनंतर शिवसेनेसमोरील पेच आणखी वाढला

 

Pune Pimpri Crime | मूल होण्यासाठी आयुर्वेदिक गोळ्या देण्याच्या बहाण्याने दिले गुंगीचे औषध, महिला बेशुद्ध झाल्यावर…