नरभक्षक सिंहाच्या पिंजऱ्यात घुसला युवक, पुढं घडलं ‘असं’ काही

पंजाब : वृत्तसंस्था – पंजाबमध्ये एका व्यक्तीला प्राणिसंग्रहालयातील सिंहाच्या पिंजऱ्यात जाऊन शौर्य दाखवणे खूप महागात पडले. युवकावर सिंहाने केलेल्या हल्ल्यात या युवकाचा मृत्यू झाला. दरम्यान, पंजाबच्या झिरकपूरमध्ये एका तरूणाने प्राणूसंग्रहालयात ३० फूट उंच भिंतीवरून उडी मारून सिंहाच्या पिंजऱ्यात प्रवेश केला. या प्रकारची ही पहिली घटना नाही. यापूर्वी अशा अनेक घटना घडल्या आहेत.
जब आदमखोर शेर के बाड़े में जा घुसा युवक, फिर जो हुआ...
जाणून घेऊयात या घटनांविषयी –
मिळालेल्या माहितीनुसार, यावर्षी ७ सप्टेंबर रोजी दिल्लीमध्येही अशीच एक बाब समोर आली होती, ज्यामध्ये एक युवक प्राणीसंग्रहालयात सिंहाच्या पिंजऱ्यात शिरण्याचा प्रयत्न करीत होता. तथापि, लोकांनी त्याचा पाय पकडून त्याला बाहेर खेचले, ज्यामुळे त्याचा जीव वाचविला. मात्र त्यानंतर त्या व्यक्तीने सांगितले होते की त्याला जगायची अजिबात इच्छा नसून तो सिंहाचे भक्ष्य बनण्यासाठीच येथे आला आहे.

४ जानेवारी २०१८ रोजी मध्य प्रदेशातील कमला नेहरू प्राणिसंग्रहालयातही अशीच एक घटना समोर आली होती जिथे एका तरूणाने सिंहाच्या खोलीत उडी मारली. तो तब्बल अर्ध्या तासासाठी या कुंपणात थांबला आश्चर्य म्हणजे परंतु कर्मचाऱ्यांनी त्याला पाहिले आणि सुखरुप बाहेर काढले.

२७ नोव्हेंबर २०१६ रोजी पुण्यातील राजीव गांधी प्राणिसंग्रहालयात एका २४ वर्षीय तरूणाने पांढऱ्या सिंहाच्या पिंजऱ्यात उडी मारली आणि सर्वांना चकित केले. तो तरुण सिंहाच्या जवळ गेला होता आणि त्याने सिंहाला हातदेखील लावला होता. सुरक्षारक्षकांनी पिंजऱ्यात प्रवेश केला आणि त्या युवकाला सुरक्षित पिंजऱ्यातून बाहेर काढले होते.
जब आदमखोर शेर के बाड़े में जा घुसा युवक, फिर जो हुआ...
कालची पंजाबमधील घटना :
दरम्यान बुधवारी पंजाबमध्ये सिंहाच्या खोलीत प्रवेश केलेल्या व्यक्तीचा मृत्यू झाला आहे. तेथे उपस्थित लोकांच्या म्हणण्यानुसार त्या सिंहाने त्याला जखमी केले आणि लायन सफारीच्या आत फरपटत नेले. यावेळी तेथे उपस्थित लोकांनी सिंहाला हाकलून देण्यासाठी आवाज केला पण सिंहाने त्या व्यक्तीला सोडले नाही. सिंहाच्या हल्ल्यामुळे मरण पावलेली व्यक्ती सुमारे ३० वर्षांची आहे आणि त्याची ओळख पटविण्याचा प्रयत्न केला जात आहे. तथापि, हा माणूस सिंहाच्या खोलीत का गेला होता हे स्पष्ट झाले नाही. सध्या वनविभागाच्या जवानांनी सिंहाला पिंजऱ्यात बंद केले आहे.
जब आदमखोर शेर के बाड़े में जा घुसा युवक, फिर जो हुआ...

Visit : Policenama.com