पोलिसनामा ऑनलाइन – क्लाउड व्हिडिओ कॉन्फरन्सिंग प्लॅटफॉर्म Zoom च्या अडचणी कमी होत असल्याचे दिसत नाही. कोरोनामुळे लॉकडाऊन असल्याने जगभरात वेगाने Zoom युजर्स वाढले आणि आता प्रायव्हसीबाबत मोठी समस्या येत आहे.
ब्लीडींग कॉम्प्युटरच्या ताज्या अहवालानुसार, ५ लाख पेक्षा जास्त Zoom अकाउंटला डार्क वेबमध्ये विकले जात आहे. आश्चर्याची बाब तर अशी की, लाखो लोकांचा डेटा इथे स्वस्तात विकला जात असून काही ठिकाणी तर Zoom युजर्सचा डेटा मोफत विकला जात आहे.
अहवालानुसार, Zoom युजर्स या गोष्टीचा अंदाज देखील लावू शकत नाही कि त्यांचा डेटा विकला जात आहे. यात युजरनेम, पासवर्ड आणि युजरकडून नोंदवली गेलेली माहिती शामिल आहे.
या वेळी Zoom युजर्सची माहिती हॅक करण्यासाठी क्रेडेन्शियल स्टफिंग मेथड वापरली जात आहे. याअंतर्गत पहिले जेवढे Zoom अकाउंट हॅक झाले आहेत त्यांचे लॉगिन डिटेल्स वापरून पहिले हॅकर्स त्यांच्या अकाउंटचा ऍक्सेस घेत आहेत.
रिपोर्टनुसार, ज्या युजर्सचा ऍक्सेस मिळत आहे त्यांना कंपाइल करून नवीन लिस्ट तयार केली जात आहे आणि त्याला डार्क वेबवर विकले जात आहे. सायबर सिक्युरिटी इंटेलिजन्स फर्म Cyble च्या एका रिपोर्टनुसार काही Zoom अकाउंट्स डिटेल्सला एक हॅकर फोरमवर विकण्यासाठी अपलोड केला गेला आहे.
सायबर सिक्युरिटी फर्म Cyble ने दावा केला आहे की, या कंपनीने ५ लाख पेक्षा जास्त Zoom चे युजर क्रेडेन्शियल म्हणजे लॉगिन डिटेल्स खरेदी केले आहेत. या फर्मने सांगितले की, हा डेटा १० पैसे प्रति अकाउंट पेक्षा कमी मध्ये खरेदी केला गेला आहे.
सध्या या डेटा ब्रीचबाबत Zoom ने आपल्या युजर्सला माहिती दिलेली नाही. जर तुम्ही Zoom अकाउंट वापरत असाल तर आपल्या अकाउंटचा पासवर्ड बदला आणि मजबूत पासवर्ड ठेवा.
तुमच्या ईमेल आयडीचा पासवर्ड डेटा ब्रीचमध्ये लीक झाला आहे कि नाही हे चेक करण्यासाठी तुम्ही Have I Been Pwned वेबसाइट वर जाऊन आपला ईमेल आयडी एंटर करू शकता. यामुळे माहित होईल कि डेटा लीकमध्ये तुमचा ईमेल आयडी हॅक झाला आहे कि नाही.
खरतर गुगलने आपल्या कर्मचाऱ्यांना Zoom व्हिडिओ कॉलिंग वापरण्यास नकार दिला आहे आणि यामुळे युजरची प्रायव्हसी आणि हॅकिंग होत आहे.