ZP and Panchayat Samiti Election | राज्यातील 5 जि. प. आणि पं. स. च्या पोटनिवडणुकांना स्थगिती

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन (Policenama Online) – राज्यात कोरोनाची दुसरी लाट (Coronavirus Second Wave) अद्याप पूर्णपणे ओसरलेली नाही. त्यातच कोरोनाच्या तिसऱ्या लाटेची आणि डेल्टा प्लसचा (Delta Plus Variant of Corona) मोठ्याप्रमाणावर प्रसार होण्याची भीती व्यक्त केली जात आहे. त्यामुळे राज्यात कडक निर्बंध असल्याने राज्यातील पाच जिल्हा परिषद व त्यांतर्गतच्या 33 पंचायत समित्यांमधील रिक्त पदांच्या पोटनिवडणुकांची (ZP and Panchayat Samiti Election) प्रक्रिया आज आहे त्या टप्प्यावर स्थगित करण्यात येत आहे, अशी घोषणा राज्य निवडणूक आयुक्त यू.पी.एस. मदान (State Election Commissioner UPS Madan) यांनी केली आहे.

या जिल्ह्यातील निवडणुका रद्द

राज्य निवडणुक आयुक्त मदान यांनी सांगितले की, धुळे, नंदुरबार, अकोला, वाशीम आणि नागपूर या 5 जिल्हा परिषदांमधील 70 निवडणूक विभाग आणि 33 पंचायत समित्यांमधील 130 निर्वाचक गणांमधील पोटनिवडणुकांसाठी 19 जुलै 2021 रोजी मतदान होणार होते. परंतु 7 जुलै 2021 रोजी राज्य शासनाने कोविड-19 (Covid-19) च्या पार्श्वभूमीवर या पोटनिवडणुका (By-election) स्थगित करण्याची विनंती राज्य निवडणूक आयोगाकडे केली होती.

लागू केलेली आचारसंहिता शिथिल

सर्वोच्च न्यायालयाचा 6 जुलै 2021 चा आदेश आणि राज्य शासनाची विनंती लक्षात घेता राज्य निवडणूक आयोगाने राज्य शासनाकडून कोविड-19 बाबत अधिकची माहिती आणि जिल्हाधिकारी यांच्याकडून सविस्तर अहवाल मागवण्यात आले होते. त्याद्वारे आयोगाने या निवडणुका शुक्रवारी (दि.9) आहे त्या टप्प्यावर स्थगित केल्या. त्यामुळे या पोटनिवडणुकांसाठी लागू केलेली आचारसंहिता देखील (Code of Conduct) आज पासून शिथिल करण्यात आली आहे. कोविड-19 ची परिस्थिती सुधारल्यानंतर या पोटनिवडणुकांचे उर्वरित टप्पे पार पाडण्यासंदर्भात राज्य निवडणूक आयोग घोषणा करेल, असेही मदान यांनी सांगितले.

हे देखील वाचा

IAS Officer Transfer | राज्यातील 7 सनदी (IAS) अधिकाऱ्यांच्या बदल्या; ‘PMPML’ च्या अध्यक्षपदी लक्ष्मीनारायण मिश्रा यांची नियुक्तीट्विटर ला देखील फॉलो करा

ट्विटर ला देखील फॉलो करा

फेसबुक ला लाईक करा

Web Titel : ZP and Panchayat Samiti Election | maharashtra election commission stay on 5 zp and panchayat samiti election

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update