RTE प्रवेशासाठी जिल्हा परिषदेमार्फत स्वतंत्र नियमावली जाहीर

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन –   लॉकडाऊनमुळे मागील तीन महिन्यांपासून रखडलेल्या आरटीई प्रवेश प्रक्रियेला गती देण्यासाठी पुणे जिल्हा परिषदेने स्वतंत्र नियमावली जाहीर केली आहे. या नियमावलीनुसार ही प्रवेश प्रक्रिया पुर्ण करण्याचा आदेशही सर्व शाळांना देण्यात आला आहे. या नियमावलीमुळे आता जिल्ह्यात पुन्हा एकदा आरटीई प्रवेशांना वेग येणार आहे.

देशातील उच्च दर्जाच्या खासगी शाळांमध्ये समाजातील आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकातील बालकांना मोफत प्रवेश मिळावा, या उद्देशाने 2009 मध्ये तत्कालीन केंद्र सरकारने बालकांना मोफत व सक्तीचे शिक्षण देणारा कायदा केला आहे. तेव्हापासून या आरटीई अंतर्गत गरीब मुलांना नामवंत खासगी शाळांमध्ये प्रवेश देण्यात येत आहे. मुलांना प्रवेश देण्यासाठी सोडत पद्धत वापरून प्रवेश दिला जातो.

आरटीई प्रवेशासाठी दरवर्षी जानेवारी महिन्यापर्यंत यासाठी पात्र ठरत असलेल्या बालकांकडून ऑनलाईन प्रवेश अर्ज मागवण्यात येत असतात. त्यानुसार चालू शैक्षणिक वर्षात देखील अर्ज मागवण्यात आले होते. या प्रवेशासाठी प्राप्त झालेल्या एकूण प्रवेश अर्जामधून लकी ड्रॉद्वारे प्रवेशासाठी निवड करण्यात येते. त्यानुसार चालू शैक्षणिक वर्षातील आरटीई प्रवेशाबाबतची सोडत 17 मार्च रोजी काढण्यात आली होती.मात्र त्यानंतर आठवड्याभरात लॉकडाऊन सुरु झाले. त्यामुळे ही प्रवेश प्रक्रिया रखडली होती. यावर मार्ग काढण्यासाठी आणि एकही विद्यार्थी या प्रवेशापासून वंचित राहू नये, या उद्देशाने खास नियमावली तयार करण्यात आल्याचे जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष व शिक्षण विभागाचे उपसभापती रणजित शिवतरे यांनी सांगितले.

यानुसार निवडण्यात आलेल्या बालकांना पुणे शहर, पिंपरी-चिंचवड शहर आणि ग्रामीण भागातील 972 नामवंत शाळेत मोफत प्रवेश देण्यात येतात. या मुलांच्या प्रवेशाबाबतचे शैक्षणिक शुल्क राज्य सरकार भरते.

प्रवेशासाठी जिल्हा परिषदेची नियमावली

–  शाळांमार्फत मेसेजद्वारे प्रवेशाची तारीख कळवणार

– प्रवेसासाठी पालकांना शाळेत बोलवण्याची तारीख शाळा ठरवणार

–  प्रवेशाबाबतचे वेळापत्रक शाळेच्या प्रवेशद्वारावर लावणार

–  लॉकडाऊनमुळे मूळ गावी गेलेले पालक दिलेल्या तारखेला न आल्यास त्यांना नवीन तारीख द्यावी

–  कोरोना प्रतिबंधित क्षेत्रातील पालकांना नियम शिथिल झाल्यानंतर शाळेत बोलवावे.

–  प्रतिबंधित क्षेत्रातील शाळांनी निर्बंध उठेपर्य़ंत प्रक्रिया राबवू नये

–  प्रवेशासाठी एकावेळी पाच पेक्षा अधिक विद्यार्थ्यांनाच बोलवावे

–  शाळेच्या प्रवेशद्वारावरच पालकांची तपासणी करावी

–  केवळ पालकांनाच शाळेत बोलवावे

–  मुलांना प्रवेशासाठी शाळेत बोलवू नये.

आरटीई प्रवेश संक्षिप्त माहिती

–  प्रवेशासाठी ऑनलाईन प्राप्त अर्ज – 62290

–  एकूण रिक्त जागा – 16949

–  सोडतीद्वारे निवड झालेली बालके – 16617

–  प्रतिक्षा यादीतील बालके – 15025

–  आरटीई अंतर्गत दिले जाणारे प्रवेश – 25 टक्के

–  प्रवेशासाठी एकूण शाळा – 972

पोलीसनामा न्युज आता टेलीग्रामवर... आमचं चॅनेल (@policenamanews) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.
WhatsAPP
You might also like