ZP, Panchayat Samiti Election | माजी गृहमंत्री अनिल देशमुखांना ‘धक्का’ ! नगरखेडा पंचायत समितीत भाजपचं ‘कमळ’ फुललं

नागपूर : पोलीसनामा ऑनलाइन – ZP, Panchayat Samiti Election | राज्यातील 6 जिल्हा परिषदा आणि त्याअंतर्गत येणार्‍या 38 पंचायत समित्यांचे झालेल्या पोटनिवडणुकांचे (ZP, Panchayat Samiti Election) आज निकाल सुरु आहे. अधिक करुन महाविकास आघाडीने बाजी मारली आहे. मात्र, नागपूरच्या नगरखेडा पंचायत समितीमध्ये (Nagarkheda Panchayat Samiti) महाविकास आघाडी (Mahavikas Aghadi) आणि माजी गृहमंत्री अनिल देशमुख (Anil Deshmukh) यांना मोठा धक्का बसला असल्याचं पाहायला मिळालं. नगरखेडा पंचायत समितीत भाजपचं (BJP) कमळ फुललं आहे.

नगरखेडा पंचायत समितीवर (Nagarkheda Panchayat Samiti) राष्ट्रवादी काँग्रेसची (NCP) सत्ता होती. मात्र आता भाजपने यावर सत्ता मिळवली आहे. नागपुरात जिल्हा परिषदेच्या 16 जागांसाठी 79 उमेदवार तर पंचायत समित्यांच्या 31 जागांसाठी 125 उमेदवारांनी निवडणूक लढवली होती. मात्र, अनिल देशमुख (Anil Deshmukh) यांच्या काटोल विधानसभा मतदार संघातील सावरगाव व पारडसिंगा या दोन्ही जागेवर राष्ट्रवादीने आपली सत्ता गमावली आहे. याठिकाणी भाजपने (BJP) सत्ता काबीज केली आहे.

दरम्यान, सावरगावमध्ये भाजपच्या पार्वती काळबांडे (Parvati Kalbande) या 334 मतांनी विजयी झाल्या आहेत.
त्याचबरोबर पारडसिंगा येथे भाजपच्या मीनाक्षी संदीप सरोदे (Meenakshi Sandeep Sarode) या विजयी झाल्या आहेत.
त्यामुळे अनिल देशमुख (Anil Deshmukh) यांना मोठा धक्का बसला आहे.

Web Title :- ZP, Panchayat Samiti Election | big blow former home minister anil deshmukh bjps victory nagarkheda panchayat samiti

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

LPG Connection | घरबसल्या करू शकता ‘फ्री एलपीजी गॅस’ कनेक्शनसाठी अर्ज, जाणून घ्या काय आहे प्रोसेस?

HDFC Bank देतंय 10,000 रुपयांची ‘ही’ ऑफर, तात्काळ जाणून घ्या कसा घ्यायचा लाभ?

Palghar ZP Election Result | पालघरमध्ये शिवसेनेला धक्का ! खासदाराच्या मुलाला पराजित करत भाजपची ‘बाजी’