जि.प. शाळेतील मुलांनी भरविला आठवडे बाजार

लासलगांव : पोलीसनामा ऑनलाइन – जि. प. प्राथमीक शाळा कोटमगाव (ता.निफाड) येथील प्राथमिक शाळेत विद्यार्थ्यांनी व्यवहारी ज्ञान आत्मसात करण्यासाठी येथील सरपंच व शालेय व्यवस्थापन समितीने विद्यार्थ्यांना स्व- अनुभूती येण्यासाठी सदर उपक्रम राबवण्यात आला.

शनिवारी सकाळी आठ ते अकरा या वेळेत शालेय विद्यार्थ्यांनी भाजीपाला मंडई, भजी पावडे दुकान असे अनेक विविध स्टॉल लावले होते. यासाठी परिसरातील महिला पालक मोठ्या संख्येने खरेदीसाठी सहभागी झाले होते.

यावेळी सरपंच तुकाराम गांगुर्डे, उपसरपंच मंगला काळे, शालेय समितीचे अध्यक्ष दत्ता भाऊ गांगुर्डे, उपाध्यक्ष कैलास शिरसाठ यांच्यासह गावातील प्रतिष्ठित नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

या कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी संगीता आहेर, विलास पान पाटील, सुरेखा खरे, रुपाली बुचडे, संगीता भालेराव, यांनी विशेष परिश्रम घेतले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन खंडू किट्टे यांनी केले तर आभार प्रदर्शन राहुल बच्छाव व निरभवणे सर यांनी केले.

फेसबुक पेज लाईक करा https://www.facebook.com/policenama/