जि. प. शाळांना पुराचा मोठा ‘फटका’,पुनर्रबांधणीसाठी लवकरच निधी : आशिष शेलार

पुणे : पोलिसनामा ऑनलाइन – राज्यात उदभवलेल्या पूरग्रस्त परिस्थितीमुळे जनजीवन मोठ्या प्रमाणावर विस्कळीत झाले आहे. महापुराचा फटका आता जिल्हा परिषदेच्या शाळांनाही मोठ्या प्रमाणावर बसला असल्याची माहिती आशिष शेलार यांनी दिली आहे. राज्यातील २१ जिल्ह्यामधील १५५ तालुक्यातील जिल्हा परिषदेच्या २ हजार १७७ शाळांना अतिवृष्टीचा फटका बसला असून या शाळांच्या वर्ग खोल्यांची नव्याने बांधणी व दुरुस्तीसाठी निधीची आवश्यकता आहे. त्याचप्रमाणे पुराच्या पाण्यामुळे पोषण आहार, शैक्षणिक साहित्य व पाठ्यपुस्तकांचे नुकसान झाले आहे. त्यामुळे राज्याच्या शिक्षण विभागाकडून या सर्व बाबींसाठी ५७ कोटींचा निधी खासबाब म्हणून देण्यात येईल. अशी घोषणा शालेय शिक्षणमंत्री आशिष शेलार यांनी रविवारी केली.

महापुरामुळे शाळांचे नुकसान झाले आहे. मात्र पूर ओसरल्यावर विद्यार्थ्यांचे नुकसान होऊन नाही. यासाठी आशिष शेलार यांनी पुण्यामध्ये आढावा बैठकीचे आयोजन केले होते.

केवळ शाळाच नाही तर अकरावी बारावीपर्यंतच्या विद्यार्थ्यांना पुस्तके उपलब्ध करून दिली जातील. राज्य मंडळाप्रमाणे सीबीएसई, आयसीएसई बोर्डाच्या शाळांनी सुध्दा विद्यार्थ्यांना पुस्तके उपलब्ध करून देणे गरजेचे आहे. वर्ग खोल्या बांधणीसाठी आवश्यक असलेला निधी थेट शाळेच्या बँक खात्यामधे जमा करण्यात येणार असून स्थानिक पातळीवर वर्ग खोल्यांची दुरुस्ती करण्यात येईल. शिक्षण विभागांतर्गत २८५ अभियंते याबाबतचे काम करणार आहेत.

या बैठकीस शिक्षण विभागाच्या अप्पर मुख्य सचिव वंदना कृष्णा, शिक्षण आयुक्त विशाल सोळंकी, शिक्षण विभागाचे संचालक व शिक्षण अधिकारी आदी उपस्थित होते.

आरोग्यविषयक वृत्त –