Zycov D Vaccine | 12 वर्षावरील सर्व वयोगटासाठी नवीन कोरोना व्हॅक्सीन Zycov D, कसे होईल व्हॅक्सीनेशन; जाणून घ्या

नवी दिल्ली – Zycov D Vaccine | केंद्र सरकारने शुक्रवारी देशात 6 व्या कोरोना व्हॅक्सीनला (6th Covid Vaccine) सुद्धा परवानगी दिली आहे. फार्मा कंपनी जायडस कॅडिला (Zydus Cadila) च्या या व्हॅक्सीनचे नाव Zycov D Vaccine आहे. भारताची औषध नियामक संस्था DCGI च्या एक्सपर्ट कमेटीने या व्हॅक्सीनच्या इमर्जन्सी वापरला मंजूरी दिली आहे. ही भारतात 18 वर्षापेक्षा कमी वयोगटासाठी पहिली व्हॅक्सीन आहे. तिच्या द्वारे 12 ते 18 वयोगटात सुद्धा व्हॅक्सीनेशन केले जाईल.

यापूर्वी देशात कोविशील्ड, कोव्हॅक्सीन, स्पूतनिक, मॉडर्ना आणि जॉन्सन अँड जॉन्सच्या व्हॅक्सीनला मंजूरी मिळाली आहे. झायकोव्ह डी जगातील पहिली DNA व्हॅक्सीन आहे. Zydus ने डिपार्टमेंट ऑफ बायोटेक्नोलॉजी आणि इंडियन कौन्सिल ऑफ मेडिकल रिसर्चसोबत मिळून ही व्हॅक्सीन बनवली आहे.

किती असेल दोन डोसमधील अंतर?

या व्हॅक्सीनचे तीन डोस दिले जातील. दूसरा डोस 28 दिवस आणि तिसरा डोस 56 दिवसांनी घ्यावा लागेल. या व्हॅक्सीनवर भारतात सर्वात मोठी ट्रायल झाली आहे. सुमारे 28000 वॉलंटियर्सचा समावेश करण्यात आला होता.

निडल फ्री व्हॅक्सीन

ही एक निडल फ्री व्हॅक्सीन आहे. ही फार्मा जेट निडल फ्री सिस्टमद्वारे दिली जाईल. जेट इंजेक्टरद्वारे
ती दिली जाईल. इतर व्हॅक्सीन मसल्समध्ये दिल्या जातात. ही स्किनच्या जेट जेट इंजेक्टरमध्ये दिली
जाऊ शकते. हिचे वैशिष्ट्य हे सुद्धा आहे की, सामान्य फ्रीजरमध्ये 2 ते 8 डिग्रीवर स्टोअर केली जाऊ शकते.

हे देखील वाचा

Pune Crime | चारित्र्याच्या संशयावरून 19 वर्षीय पत्नीचा खून; पुण्याच्या वडगाव धायरी परिसरातील घटना

Pune Police | सुरेश पिंगळे आत्महत्या प्रकरणी महिला पोलीस कर्मचारी तडकाफडकी निलंबित

Ajit Pawar | राज ठाकरेंच्या बोलण्याला महत्व देण्याची गरज नाही – अजित पवार

ट्विटर ला देखील फॉलो करा

 

फेसबुक ला लाईक करा

Web Titel : Zydus D Vaccine | how vaccination process of new indian covid vaccine zycov d is different from other vaccines

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update