Zydus Lifesciences | ‘ही’ कंपनी रू. 650 ला खरेदी करणार आपला शेअर, आता रू. 357 मध्ये मिळत आहे स्टॉक, बातमी ऐकून अचानक वाढली शेअरची खरेदी

नवी दिल्ली : फार्मास्युटिकल कंपनी जायडस लाईफसायन्सेस (Zydus Lifesciences) ने शेअर बायबॅकची घोषणा केली आहे. Zydus Lifesciences ने कंपनीचे 1,15,38,461 शेअर्स किंवा 1.13% पूर्ण पेड-अप इक्विटी शेअर्सच्या बायबॅकची घोषणा केली आहे.

 

या बायबॅकची रेकॉर्ड तारीख 2 जून 2022 निश्चित करण्यात आली आहे आणि बायबॅक किंमत रू. 650 प्रति शेअर ठेवण्यात आली आहे. एवढेच नाही तर कंपनीने लाभांशही जाहीर केला आहे. या बातमीनंतर जायडस लाईफसायन्सेस (Zydus Lifesciences) चा शेअर शुक्रवारी 5.64% वाढला. एनएसईवर शेअर रु. 357.85 वर बंद झाला.

 

कंपनीने काय म्हटले?

जायडस लाईफसायन्सेसने एका एक्सचेंज फाइलिंगमध्ये म्हटले आहे की, आज झालेल्या त्यांच्या बैठकीत संचालक मंडळाने 1 रुपयाच्या दर्शनी मूल्यावर प्रति शेअर 2.50 रुपये म्हणजे 250% अंतिम लाभांशाची शिफारस केली आहे.

 

हे 10 ऑगस्ट 2022 रोजी होणार्‍या आगामी वार्षिक सर्वसाधारण सभेत (AGM) शेअरधारकांच्या मान्यतेच्या अधीन आहे. कंपनीच्या मते, शेअर बायबॅक निविदा आधारित असेल.

 

कंपनीच्या शेअरची स्थिती

Zydus Lifesciences ही एक जागतिक, पूर्णपणे एकात्मिक फार्मास्युटिकल कंपनी आहे.
हा फार्मा स्टॉक एका वर्षाच्या कालावधीत 42% पेक्षा जास्त खाली आला आहे
आणि 2022 (वायटीडी) मध्ये स्टॉक आतापर्यंत जवळपास 25% घसरण झाली आहे.

 

(डिस्क्लेमर : – याठिकाणी केवळ शेअरच्या परफॉर्मन्सची माहिती (Share Performance Information) दिली आहे. हा गुंतवणुकीचा सल्ला नसून शेअर मार्केट मधील (Stock Market) गुंतवणूक ही जोखमीवर अवलंबून असते. त्यामुळे गुंतवणूक करण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला आणि मार्गदर्शन घेणे आवश्यक आहे. येथे दिलेला मजकूर केवळ माहितीच्या हेतूने दिलेला आहे. www.policenama.com कडून कुणालाही पैसे लावण्याचा कधीही सल्ला दिला जात नाही.)

 

 

Web Title :- Zydus Lifesciences | zydus lifesciences announced share buyback at 650 rupees and dividend

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा