‘हे’ खास प्रकारचे पॉर्न येत्या काही दिवसात बनू शकते ’महामारी’, तज्ज्ञांचा दावा

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – आजपासून तीन दशकांपूर्वी लोकांकडे इंटरनेट नव्हते, त्यावेळी पॉर्न  कल्चर सुद्धा जास्त नव्हते. मात्र, जस-जसे जगातील तंत्रज्ञान वाढत गेले, पॉर्नचे जग (pornography) सुद्धा तेवढेच विकसित झाले. आता एका प्रमुख तज्ज्ञाचा दावा आहे की, डीपफेक (pornography) पॉर्नोग्राफी (pornography) आगामी काळात लैंगिक शोषणाची महामारी ठरू शकते.

काही वर्षांपासून एखाद्या व्यक्तीच्या चेहर्‍याला बदलून त्याची इमेज मॉडिफाय केल्याचे वृत्त येत असे, परंतु डीपफेक तंत्रज्ञानामुळे हिच प्रक्रिया आता व्हिडिओमध्ये वापरली जात आहे,
येत्या काळात अनेक लोक विशेषता महिलांसाठी हे नुकसानकारक ठरू शकते.

डीपफेक एक अशी टेक्नोलॉजी आहे ज्याद्वारे कम्प्युटर तंत्रज्ञानाचा वापर करून कोणत्याही माणसाच्या शरीरावर कोणताही चेहरा ठेवला जाऊ शकतो आणि हे तंत्रज्ञान इतके अचूक आहे की यामध्ये असे कुठूनही वाटणार नाही की,
एखाद्या व्यक्तीच्या बॉडीवर दुसर्‍या व्यक्तीचा चेहरा वापरला गेला आहे.

डीपफेक तंत्रज्ञान काही काळापूर्वी जेव्हा मार्केटमध्ये वायरल झाले होते तेव्हा अनेक लोकांना वाटले होते की,
यामुळे फेक न्यूजची प्रकरणे खुप वाढू शकतात. कारण कोणत्याही राजकीय नेत्याची फेक इमेज वापरून त्याच्या तोंडी कोणतेही वक्तव्य देऊन ते वायरल केले जाऊ शकते.
मात्र, यापूर्वीच या तंत्रज्ञानाच्या अनेक भयंकर बाजू समोर येऊ लागल्या आहेत.

डीपफेक्सचे तज्ज्ञ हेन्री एजडर या टेक्नॉलॉजीच्या डेव्हलपमेंटला खुप बारकाईने फॉलो करत आहेत.
त्यांनी बीबीसीसोबत बोलताना म्हटले, डीपफेकची क्रेज 2017 च्या आसपास सुरु झाली होती.
एका व्यक्तीने एक ओपन सोर्स सॉफ्टवेयर शेयर केल्यानंतर हे तंत्रज्ञान सामान्य लोकांसाठी थोडे सोपे बनवले होते.

त्यांनी पुढे म्हटले की, अगोदर डीपफेकसाठी गुंतागुंतीचे व्हीज्युएल इफेक्ट्स आणि प्रोग्रामिंगची आवश्यकता होती,
तर आता काही मर्यादेपर्यंत बहुतांश लोक हे करू शकतात.
परंतु याचे परिणाम कोणत्याही व्यक्तीच्या कम्प्युटर स्किलवर अवलंबून असतात.
त्यांनी म्हटले की, याचा खुप चुकीचा वापर होऊ शकतो आणि यास गांभीर्याने घेण्याची आवश्यकता आहे.

शेफील्डमध्ये राहणारी हेलेन मोर्ट एक लेखिका आहे.
त्यांनी दोन वर्षापूर्वी एका पॉर्न वेबसाइटवर आपले डीपफेक छायाचित्र पाहिले होते.
हे छायाचित्र 2017 पासूनच इंटरनेटवर होते. बीबीसीसोबत बोलताना हेलेन यांनी म्हटले की,
मला हे छायाचित्र पाहून प्रचंड धक्का बसला होता.

हेलेनने म्हटले की, मी जेव्हा ही छायाचित्रे पाहिली तेव्हा मला वाटले की,
अखेर मी असे काय केले की मला हा दिवस पहावा लागला ? माझी कोणतीही चूक नसताना मला माझी लाज वाटू लागली होती.

हेलेनला यामुळे बरे वाटले की, तिच्या चेहर्‍याचा वापर करून डीपफेक व्हिडिओ बनवला नव्हता.
तिने ही छायाचित्रे हटवली आहेत.
परंतु इंग्लंडमध्ये छायाचित्रांसोबत मॅनिपुलेशन करणे अजूनपर्यंत क्राईम मानला जात नाही.
यामुळे हेलेनला अजूनपर्यंत हे समजले नाही की, तिच्या फोटोंसोबत कुणी छेडछाड केली होती.

डरहम युनिव्हर्सिटीचे प्रोफेसर मेक्ग्लायनने याबाबतीत सांगितले की, डीपफेकला बळी पडलेल्या लोकांची संख्या सध्यातरी खुप कमी आहे. परंतु आपण याबाबतीत पूर्णपणे निष्काळजीपणा दाखवला तर भविष्यात ही मोठी समस्या बनू शकते.

त्यांनी पुढे म्हटले की, जर आपण या तंत्रज्ञानावर नियंत्रण ठेवले नाही आणि गोष्टी बदण्याचा प्रयत्न केला नाही तर ही समस्या एका महामारीचे रूप धारण करू शकते आणि यास शोषणाची महामारी म्हणणे चुकीचे ठरणार नाही.

Also Read This : 

 

Pune News : केवळ उदघाटनाच्या प्रतिक्षेमुळे महिन्याभरापासून ‘बंद’ ठेवलेला उड्डाणपुल शिवसेनेने वाहतुकीसाठी केला खुला

 

Spa in Pimpri Chinchwad | झिया थाई स्पा सेंटरमध्ये चालणाऱ्या सेक्स रॅकेटचा पर्दाफाश, 3 महिलांची सुटका