महिलेचा अजब दावा, म्हणाली – ‘स्वतःचं मुत्र प्राशन करून घटवलं वजन, डोळयांची दृष्टी देखील वाढली’

वॉशिंग्टन : वृत्तसंस्था –  अमेरिकेत एका महिलेचा अजब दावा करणारा व्हिडिओ व्हायरल होत आहे. यामध्ये तिने स्वत:चे मूत्र प्राशन केल्याचे सांगत आहे. असे केल्याने तिच्या अडचणीही दूर झाल्या आहेत आणि तिचे वजनही चांगलेच कमी झाल्याचा दावा तिने केला आहे.

ग्रेस जोन्स असे या 32 वर्षीय महिलेचे नाव आहे. ती अमेरिकेच्या सॅन डिएगो शहरात राहते. ग्रेस ही चेहरा आणि केसांसाठी ‘यूरिन थेरपी’चा वापर करते, असे ती गेल्या 3 आठवड्यांपासून करत आहे. तसेच ती सकाळी उठल्या-उठल्या यूरीन प्राशन करते. असे केल्याने दृष्टी तेज झाली आहे. याशिवाय हाय ब्लड प्रेशर आणि पचनशक्ती सुधारण्यास मदत मिळते, असा तिचा दावा आहे. ग्रेस जोन्स ही या थेरपीमुळे सुरुवातीला घाबरलेली होती. मात्र, जेव्हा याचे फायदे समोर आले तेव्हा तिचा आत्मविश्वास वाढला, असेही तिने सांगितले.

ग्रेसने सांगितले की, या थेरपीसह शाकाहारी डायटही घेत असते. दारू पिणे बंद केले आहे. माझा पार्टनर यावर काय प्रतिक्रिया देईल हे मला माहिती नाही. म्हणून मी त्याला अजून याबद्दल सांगितले नाही. मी माझ्या जवळच्या मित्रांना सांगितले तेव्हा ते घाबरले, असेही ती म्हणाली.

दरम्यान, ग्रेस जोन्सशिवाय पॉपस्टार मॅडोना ही देखील यूरिन थेरपीचा वापर करते, असे यापूर्वी स्पष्ट झाले होते. युरीन थेरपीला वैद्यकीय शास्त्रात योग्य असे मत नाही. पण 1945 मध्ये जॉन ऑर्मस्ट्राँगच्या नावाचे ब्रिटिश नॅच्युरोपॅथ यांनी एका पुस्तक छापले. त्यामध्ये त्यांनी युरीन प्राशन केल्याने अनेक आजारापासून दूर राहता येऊ शकते, असे सांगितले आहे. मात्र, याचा कोणताही पुरावा अद्याप समोर आला नाही.