आता मोबाईल नंबर आधारकार्डशी लिंक करा तेही कोणत्याही कागदपत्रांविना!

नवी दिल्ली : जर आपण आपला मोबाईल क्रमांक आधारकार्डशी लिंक केला नसेल तर घाबरून जाण्याचे काहीही कारण नाही. ही बातमी तुमच्यासाठी आहे महत्त्वाची…कारण आता तुम्ही कोणत्याही कागदपत्रांविना मोबाईल नंबर आधारकार्डशी लिंक करू शकता.

युनिक आयडेंटिफिकेशन ऑथोरिटी ऑफ इंडिया (UIDAI) ने याबाबतची माहिती ट्विट करून दिली आहे. यामध्ये UIDAI ने सांगितले, की आधारकार्डसोबत मोबाईल नंबर लिंक करण्यासाठी आपणाला कोणत्याही कागदपत्रांची गरज लागणार नाही. आपण कोणत्याही आधार केंद्रावर जाऊन आपला नंबर आधारशी लिंक करू शकता. तसेच आपणाला आधारकार्डवरील आपला जुना मोबाईल नंबर बदलायचा असेल तेही करत येऊ शकतं.

मोबाईल क्रमांक आधारकार्डशी लिंक करण्याचे असे आहेत फायदे…

आधारकार्ड संबंधित बहुतांश कामांसाठी OTP (One Time Password) गरज भासते. हा OTP फक्त लिंक केलेल्या नंबरवरच पाठवला जातो. तसेच जर आपण आधारकार्ड डाऊनलोड करू इच्छिता तर आपल्याला OTP ची गरज भासते. त्यामुळे मोबाईल क्रमांक आधारकार्डशी लिंक असणे गरजेचे आहे.