Aakash BYJU’S | आकाश बायजूजतर्फे राष्ट्रीय प्रज्ञा शोध परीक्षा एएनटीएचई-२०२३ची घोषणा; इयत्ता सातवी-बारावीच्या विद्यार्थ्यांना शंभर टक्क्यांपर्यंत शिष्यवृत्ती आणि रोख पुरस्कार

एएनटीएचई-२०२३ ही आकाश संस्थेची राष्ट्रीय शिष्यवृत्ती परीक्षा, इयत्ता सातवी ते बारावीच्या विद्यार्थ्यांसाठी ७ ते १५ ऑक्टोबर दरम्यान ऑनलाइन आणि ऑफलाइन पद्धतीने घेतली जाईल.

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – आकाश बायजूज (Aakash BYJU’S) विविध प्रवेशपरीक्षांची पूर्वतयारी करून घेणाऱ्या आघाडीच्या संस्थेने आपल्या लोकप्रिय आणि मोठ्या प्रमाणावर मागणी असलेल्या एएनटीएचई-२०२३ (आकाश नॅशनल टॅलेंट हंट परीक्षा Aakash National Talent Hunt Exam) च्या १४व्या आवृत्तीची घोषणा केली. ही वार्षिक शिष्यवृत्ती परीक्षा (Scholarship Exam) इयत्ता सातवी ते दहावीपर्यंतच्या विद्यार्थ्यांना शंभर टक्क्यांपर्यंत शिष्यवृत्ती आणि रोख पुरस्कार मिळवण्याची संधी देते. वैद्यकशास्त्र किंवा अभियांत्रिकीमधील उज्ज्वल स्वप्ने साकारण्यासाठी तरुणांना सक्षम बनवून एएनटीएचई-२०२३ (ANTHE 2023) हा यशाचा मार्ग खुला असल्याचे वचन देते. (Aakash BYJU’S)

ही शिष्यवृत्ती मिळवणारे आकाश संस्थेमध्ये नावनोंदणी करू शकतात आणि नीट, जेईई, राज्यपातळीवरील सीईटी, शाळा किंवा बोर्ड परीक्षा, राष्ट्रीय विज्ञान प्रज्ञा शोध (एनटीएसई) आणि ऑलिम्पियाड्ससारख्या अशा विविध शिष्यवृत्ती परीक्षांच्या तयारीसाठी तज्ज्ञ मार्गदर्शन मिळवू शकतात. या वर्षी विद्यार्थ्यांसाठी यात आणखी एक मौल्यवान भर घालण्यात आली आहे, ती म्हणजे विविध इयत्तांमधील १०० विद्यार्थ्यांना राष्ट्रीय विज्ञान मोहिमेसाठी पाच दिवसांची सशुल्क सहल जिंकण्याची संधी आहे.

गेल्या काही वर्षांमध्ये, एएनटीएचई परीक्षेने उल्लेखनीय कामगिरी केली असून, आकाश बायजूजचे (Aakash BYJU’S) अनेक विद्यार्थी नीट (यूजी) आणि जेईई (अॅडव्हान्सड्) सारख्या परीक्षांमध्ये अव्वल ठरले आहेत. एएनटीएचई परीक्षेपासून आकाशमधून शैक्षणिक प्रवासाला सुरुवात करणारे कौस्तव बौरी (ऑल इंडिया रॅंकिंग -३), ध्रुव अडवाणी (ऑल इंडिया रॅंकिंग-५), आणि सूर्य सिद्धार्थ एन (ऑल इंडिया रॅंकिंग-६) यांच्यासह अनेक विद्यार्थी नीट (यूजी) आणि जेईई (अॅडव्हान्सड्) सारख्या परीक्षांमध्ये अव्वल ठरले आहेत. त्याचप्रमाणे आदित्य नीरजे (ऑल इंडिया रॅंकिंग -२७) आणि आकाश गुप्ता (ऑल इंडिया रॅंकिंग -२८) यांनीही जेईई (अॅडव्हान्सड्) २०२३ मध्ये चमकदार यश मिळवले आहे.

एएनटीएचई २०२३ बाबत माहिती देताना, आकाश एज्युकेशनल सर्व्हिसेस लि.चे (AESL) मुख्य कार्यकारी अधिकारी अभिषेक माहेश्वरी म्हणाले, “स्वप्न आणि क्षमता यांच्यातील अंतर कमी करून लाखो विद्यार्थ्यांच्या आकांक्षा पूर्ण करण्यासाठी एएनटीएचई हे महत्त्वाचे माध्यम ठरले आहे. २०१०पासून याची सुरवात झाल्यापासून, आम्ही देशभरातील पात्र विद्यार्थ्यांपर्यंत आमच्या मार्गदर्शाच्या संधी पोहोचवण्याचा प्रयत्न करत आहोत. ठिकाणाचे अडथळे दूर करत आहोत. एएनटीएचई परीक्षेने विद्यार्थ्यांना ते कुठेही असले तरी नीट (NEET) आणि आयआयटी-जेईई (IIT-JEE)परीक्षांची तयारी स्वत:च्या गतीने करण्याचा मार्ग खुला केला आहे. आम्‍हाला एएनटीएचई २०२३ साठी उदंड प्रतिसादाची अपेक्षा आहे. विद्यार्थ्‍यांना उज्ज्वल भविष्याकडे नेण्‍याच्‍या आमच्‍या मोहिमेमध्‍ये सातत्याने पुढे जात राहाण्यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत.”

एएनटीएचई २०२३ (ANTHE-2023) परीक्षा भारतातील २६ राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांमध्ये ७ ते १५ ऑक्टोबर २०२३ या कालावधीत ऑनलाइन आणि ऑफलाइन दोन्ही पद्धतीने होणार आहे. यामध्ये सर्वोत्तम गुण मिळवणाऱ्या विद्यार्थ्यांना शंभर टक्क्यांपर्यंत शिष्यवृत्तीसह रोख बक्षीसेदेखील मिळतील.

ही परीक्षा ऑनलाइन पद्धतीने दिलेल्या सर्व दिवसांमध्ये सकाळी १० ते रात्री ९ वाजेपर्यंत आयोजित केली जाईल,
तर ऑफलाइन परीक्षा आठ आणि १५ ऑक्टोबर २०२३ रोजी सकाळी १०.३० ते ११.३० आणि ४ ते ५ अशा दोन शिफ्टमध्ये
देशभरातील बायजूज (Aakash BYJU’S) आणि आकाश केंद्रांवर घेतली जाईल.
विद्यार्थी त्यांच्या सोयीने कोणतीही एक वेळ निवडू शकतात.

ही परीक्षा एक तासाची असेल. यामध्ये एकूण ९० गुणांसाठी प्रश्न असतील.
त्यात विद्यार्थ्यांची ग्रेड आणि इच्छूक शाखा यानुसार ४० बहुपर्यायी प्रश्न असतील. इयत्ता सातवी-नवीच्या विद्यार्थ्यांसाठीच्या प्रश्नांमध्ये भौतिकशास्त्र, रसायनशास्त्र, जीवशास्त्र, गणित आणि मानसिक क्षमता या विषयांचा
समावेश असेल. वैद्यकीय शिक्षणासाठी इच्छुक असलेल्या इयत्ता दहावीच्या विद्यार्थ्यांसाठी, भौतिकशास्त्र, रसायनशास्त्र,
जीवशास्त्र आणि मानसिक क्षमता, तर त्याच वर्गातील अभियांत्रिकी इच्छूकांसाठी, भौतिकशास्त्र, रसायनशास्त्र, गणित
आणि मानसिक क्षमता या विषयांवरील प्रश्नांचा समावेश असेल. त्याचप्रमाणे, नीटचे ( NEET)उद्दिष्ट असलेल्या
इयत्ता अकरावी-बारावीच्या विद्यार्थ्यांसाठी भौतिकशास्त्र, रसायनशास्त्र, वनस्पतीशास्त्र आणि प्राणीशास्त्र विषयांवरील
समावेश असेल, तर अभियांत्रिकी इच्छुकांसाठी भौतिकशास्त्र, रसायनशास्त्र आणि गणित विषयांवरील प्रश्न असतील.

एएनटीएचई २०२३ (ANTHE 2023) साठी नावनोंदणी अर्ज दाखल करण्याची अंतिम तारीख ऑनलाइन परीक्षा सुरू
होण्याच्या तीन दिवस आधी आणि ऑफलाइन परीक्षेच्या सात दिवस आधी आहे.
परीक्षा शुल्क ऑफलाइन परीक्षेसाठी १०० रुपये आणि ऑनलाइन परीक्षेसाठी विनामूल्य आहे.

या परीक्षेचे निकाल इयत्ता दहावीच्या विद्यार्थ्यांसाठी २७ ऑक्टोबर २०२३ रोजी, इयत्ता सातवी ते नववीसाठी ३ नोव्हेंबर
२०२३ रोजी आणि अकरावी आणि बारावीच्या विद्यार्थ्यांसाठी आठ नोव्हेंबर २०२३ रोजी जाहीर केले जातील.
निकाल आमच्या वेबसाइटवर उपलब्ध होतील.

आकाश एज्युकेशनल सर्व्हिसेस लि.बद्दल (AESL) :

आकाश एज्युकेशनल सर्व्हिसेस लिमिटेड (AESL) ही भारतातील आघाडीची प्रवेश परीक्षा तयारी करून घेणारी कंपनी आहे.
वैद्यकीय (NEET) आणि अभियांत्रिकी प्रवेश परीक्षा (JEE), शाळा/बोर्ड परीक्षा आणि एनटीएसई आणि
ऑलिम्पियाडसारख्या स्पर्धात्मक परीक्षांची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी सर्वसमावेशक आणि प्रभावी मार्गदर्शन
सेवा प्रदान करण्यात कंपनी अव्वल आहे.

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

Pune Police News | रिक्षामध्ये विसरलेली 2 लाख रुपयांची दागिन्यांची बॅग पोलिसांमुळे मिळाली परत