Abdul Sattar | उद्धव ठाकरेंसोबत असतो, तर माझ्या नावापुढे “ही” पाटी लागली असती – अब्दुल सत्तार

नाशिक : पोलीसनामा ऑनलाइन – मी उद्धव ठाकरे यांच्यासोबत राहिलो असतो, तर माझ्या नावापुढे माजी आमदार पाटी लागली असती, असे कृषिमंत्री अब्दुल सत्तार (Abdul Sattar) म्हणाले आहेत. त्यांनी जून 2022 मध्ये मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या बंडात सहभाग घेतला होता. नाशिकमध्ये जिल्हा कृषी महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. या कार्यक्रमासाठी अब्दुल सत्तार (Abdul Sattar) नाशिकमध्ये आले होते. त्यावेळी ते बोलत होते.

राज्यात महाविकास आघाडीचे सरकार असताना उद्धव ठाकरे आजारी होते. त्यावेळी आम्ही त्यांना रश्मी ठाकरे यांना मुख्यमंत्र्यांच्या खुर्चीत बसवा, असे सांगितले होते. पण त्यांनी आमचे ऐकले नाही. मग आम्ही वेगळा निर्णय घेतला आणि शिवसेनेत बंड केले. मी आजही उद्धव ठाकरे यांच्यासोबत राहिलो असतो, तर माझ्या नावापुढे माजी आमदार म्हणून पाटी लागली असती. मला पुन्हा निवडून यायचे आहे, त्यामुळे आम्ही शिवसेनेत बंड केले, असे अब्दुल सत्तार (Abdul Sattar) म्हणाले.

‘एक दिवस बळीराजासोबत’ या उपक्रमाला चांगला प्रतिसाद मिळाला असून,
यासाठी आता एक समिती आम्ही नेमणार आहोत. या समितीवरील अधिकारी अहवाल सादर करतील.
त्या अहवालात प्रत्येक विभागाचा प्रश्न वेगळा असेल आणि त्यानुसार आम्ही काम करू.
सध्या राज्यभरात टोमॅटोच्या दरात घसरण झाली आहे. टोमॅटोचे भाव पडतात, यावर शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी सरकार प्रयत्न करत आहे. किती पीक लागते, किती उत्पादन घ्यायला पाहिजे, याचा विचार शेतकऱ्यांनी करायला हवा. यावर उपाय म्हणून शेतीमाल ठेवण्यासाठी कोल्ड स्टोअरेज तयार केली जात आहेत, असे यावेळी सत्तार म्हणाले.

Web Title :- Abdul Sattar | stayed with uddhav thackeray former mla appeared my name says abdul sattar

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

Pune Crime | धक्कादायक! लग्नाचे आमिष दाखवून कायद्याचे शिक्षण घेणाऱ्या युवतीवर बलात्कार; पुण्यातील कसबा पेठेतील घटना

E-Shram Card | 2 लाखांचा फायदा हवा, तर ताबडतोब बनवा ‘हे’ कार्ड; सरकार देत आहे आकर्षक स्कीम