ACB Trap News | अण्णाभाऊ साठे विकास महामंडळाचे 2 कर्मचारी लाच घेताना एसीबीच्या जाळ्यात

परभणी : पोलीसनामा ऑनलाइन – मंडप डेकोरेशन व्यवसायाकरिता (Mandap Decoration Business) घेतलेल्या कर्जाचा चेक देण्यासाठी 5 हजार रुपये लाच स्वीकारताना (Accepting Bribe) साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे विकास महामंडळ, कार्यालय परभणी येथील दोन कर्मचाऱ्यांना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने (ACB Trap News) रंगेहाथ पकडले. एसीबीच्या पथकाने (ACB Trap News) ही कारवाई बुधवारी (दि.19) केली.

साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे विकास महामंडळ (मर्या), परभणी कार्यालयातील (Sahityaratna Lokshahir Annabhau Sathe Development Corporation) जिल्हा व्यवस्थापक चंदू किसनराव साठे Chandu Kisanrao Sathe (वय 56 रा. वेदांत नगर, नांदेड), लिपिक टंकलेखक अविनाश प्रकाश मुराळकर Avinash Prakash Muralkar (वय 34 रा. विष्णू नगर, नांदेड) असे लाच घेताना पकडण्यात आलेल्या दोघांची नावे आहेत. याबाबत 28 वर्षीय व्यक्तीने परभणी एसीबीकडे (ACB Trap News) मंगळवारी (दि.18) तक्रार केली आहे.

तक्रारदार यांच्या आत्याचे नावाने मंडप डेकोरेशन व्यवसायाकरिता साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे विकास महामंडळ (मर्या), कार्यालय परभणी येथे एक लाख रुपये कर्ज मिळण्यासाठी अर्ज केल होता. यासंदर्भात तक्रारदार व त्यांच्या आत्या जिल्हा व्यवस्थापक चंदू साठे यांची 13 जुलै रोजी भेट घेतली. यावेळी चंदू साठे याने कर्जाचा धनादेश देण्यासाठी पाच हजार रुपये लाचेची मागणी केली. तर लिपीक अविनाश मुराळकर याने कर्ज मंजुरीचा चेक देण्यासाठी तुम्हाला पैसे द्यावे लागतील असे म्हणून लाच मागितली.


याबाबत तक्रारदार यांनी परभणी एसीबीकडे (Parbhani ACB Trap News)
मंगळवारी तक्रार केली. प्राप्त तक्रारीची बुधवारी पंचासमक्ष पडताळणी केली
असता चंदू साठे आणि अविनाश मुराळकर यांनी 10 हजार रुपये लाचेची मागणी
करुन तडजोडी अंती 5 हजार रुपये स्वीकारण्याचे मान्य केले.
एसीबीच्या पथकाने सापळा रचून तक्रारदार यांच्याकडून
लाचेची रक्कम स्वीकारताना अविनाश मुराळकर याला रंगेहात पकडले.
त्यानंतर जिल्हा व्यवस्थापक चंदू साठे याला ताब्यात घेतले.
त्यांच्यावर नवा मोंढा पोलीस ठाण्यात (Nava Mondha Police Station)
गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

ही कारवाई नांदेड लाचलुचपत प्रतिबंधक परिक्षेत्राचे (Nanded ACB)
पोलीस अधीक्षक डॉ. राजकुमार शिंदे (SP Dr. Rajkumar Shinde)
यांच्या मार्गदर्शनाखाली परभणी एसीबी पोलीस उप अधीक्षक अशोक इप्पर
(DySP Ashok Ipper), पोलीस निरीक्षक सदानंद वाघमारे
(PI Sadananda Waghmare) पोलीस अंमलदार चंद्रशेखर निलपत्रेवार, सिमा चाटे,
अतुल कदम, कल्याण नागरगोजे यांच्या पथकाने केली.

Pune Disaster Management | आपत्ती व्यवस्थापनासाठी यंत्रणेने सज्ज राहावे –
जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख