ACB Trap News | 30 हजार रुपये लाच घेताना वैधमापन शास्त्र विभागाचा निरीक्षक अँन्टी करप्शनच्या जाळ्यात

परभणी : पोलीसनामा ऑनलाइन – ACB Trap News | पेट्रोल पंपाचे स्टॅम्पिंग (Petrol Pump Stamping) करण्यासाठी 40 हजार रुपये लाचेची मागणी करुन 30 हजार रुपये लाच स्वीकारताना (Accepting Bribe) परभणी येथील वैधमान शास्त्र विभागाच्या (Department of Validation) निरीक्षकाला लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने (ACB Trap News) सापळा रचून रंगेहाथ पकडले. अरविंद नामदेवराव रोडेवाडकर Inspector Arvind Namdevrao Rodevadkar (वय 57 रा. कैलस नगर, नांदेड) असे लाच घेताना पकडलेल्या निरीक्षकाचे नाव आहे. एसीबीच्या पथकाने (ACB Trap News) ही कारवाई शुक्रवारी (दि.21) केली.

याबाबत 26 वर्षीय व्यक्तीने परभणी एसीबीकडेशुक्रवारी तक्रार केली आहे. तक्रारदार यांचा पेट्रोल पंप आहे. पेट्रोल पंपाची वायरिंग जळाल्यामुळे तो बंद पडला आहे. त्यांनी पेट्रोल पंपाची दुरुस्ती केली आहे. मात्र वैधमापन शास्त्र विभागाकडून स्टॅम्पिंग करून घेतल्याशिवाय पेट्रोल /डिझेल विक्री करता येत नाही. त्यामुळे तक्रारदार यांनी स्टॅम्पिंगची शासकीय फि 11 हजार रुपये 17 जुलै रोजी ऑनलाइन चलनाद्वारे भरली. त्यानंतर तक्रारदार यांनी वैधमापन शास्त्र विभागाकडे स्टॅम्पिंग साठी अर्ज दाखल केला.

तक्रारदार हे वैधमापन शास्त्र विभागाचे निरीक्षक अरविंद रोडेवाडकर यांना या कामासाठी भेटले. त्यावेळी पेट्रोल पंपाची स्टॅम्पिंग करण्यासाठी रोडेवाडकर यांनी 40 हजार रुपये लाचेची मागणी केली. तक्रारदार यांना लाच देण्याची इच्छा नसल्यामुळे त्यांनी शुक्रवारी परभणी एसीबी (Parbhani ACB Trap News) कार्यालयात तक्रार दिली.

ACB Trap News

प्राप्त तक्रारीवरुन एसीबीच्या पथकाने पंचासमक्ष पडताळणी केली असता रोडेवाडकर यांनी तक्रारदार यांच्याकडे
40 हजार रुपये लाचेची मागणी केल्याचे निष्पन्न झाले. तसेच तडजोडी अंती 30 हजार रुपये लगेच आणि स्टॅम्पिंग
केल्यानंतर 5 हजार रुपये लाचेची मागणी केली. पथकाने सापळा रचला. तक्रारदार यांच्याकडून 30 हजार रुपये लाच
घेताना अरविंद रोडेवाडकर यांना रंगेहाथ पकडले. त्यांच्यावर नानलपेठ पोलीस ठाण्यात (Nanalpet Police Station)
गुन्हा दाखल केला आहे.

ही कारवाई नांदेड लाचलुचपत प्रतिबंधक परिक्षेत्राचे (Nanded ACB) पोलीस अधीक्षक डॉ. राजकुमार शिंदे
(SP Dr. Rajkumar Shinde) यांच्या मार्गदर्शनाखाली परभणी एसीबी पोलीस उप अधीक्षक अशोक इप्पर
(DySP Ashok Ipper), पोलीस निरीक्षक जकी कोरे (PI Jackie Kore) पोलीस अंमलदार चंद्रशेखर निलपत्रेवार,
अतुल कदम, मो.जिब्राईल, शेख मुक्तार, कल्याण नागरगोजे व चालक कदम यांच्या पथकाने केली.

Puno Advance | पुनो अँडव्हान्स – पुणे टेक सिटीत सर्वात मोठा मनोरंजन पार्क सुरू