ACB Trap News | साडेसहा लाखांची लाच घेताना सार्वजनिक बांधकाम विभागाचा बडा अधिकारी (क्लास वन) अँन्टी करप्शनच्या जाळ्यात

घराच्या झडतीत सापडले तब्बल 72 लाख 91 हजार रुपये

नांदेड : पोलीसनामा ऑनलाइन – ACB Trap News | रस्त्याच्या कामाचे निविदा स्वीकृतीची मुख्य अभियंताकडे शिफारस करण्यासाठी 6 लाख 40 हजारांची लाच (Accepting Bribe) घेताना सार्वजनिक बांधकाम विभाग नांदेडच्या (PWD Nanded) अधीक्षक अभियंत्यासह एका लिपिकाला लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने (Anti Corruption Bureau (ACB) Nanded) रंगेहाथ पकडले. ही कारवाई बुधवारी (दि.1) सार्वजनिक बांधकाम विभागाच्या नांदेड (Public Works Department Nanded) कार्यालयात करण्यात आली. या कारवाईनंतर एसबीने संबंधित अधिकाऱ्याच्या घराची झडती घेतली. त्यावेळी घरातून 72 लाख 91 हजार 490 रुपये जप्त करण्यात आले आहेत. (ACB Trap News)

गजेंद्र हिरालाल राजपुत Gajendra Hiralal Rajput (वय 54 पद अधीक्षक अभियंता (वर्ग-1) नेमणूक सार्वजनिक बांधकाम मंडळ, नांदेड), विनोद केशवराव कंधारे Vinod Keshavrao Kandare (वय 47 पद वरिष्ठ लिपिक (वर्ग -3), नेमणूक सार्वजनिक बांधकाम मंडळ, नांदेड) असे लाच घेताना पकडण्यात आलेल्या दोघांची नावे आहेत. याबाबत 52 वर्षाच्या व्यक्तीने नांदेड एसीबीकडे (Nanded ACB Trap) मंगळवारी (दि.31 ऑक्टोबर) तक्रार केली आहे.

नांदेड एसीबीने दिलेल्या माहितीनुसार, तक्रारदार यांना हदगाव तालुक्यातील केदारगुडा, पिंगळी, डोंगरगाव, हदगाव, गोरलेगाव, गुरफळी रोड या रस्त्यांच्या दोन कामांचे टेंडर मिळाले आहे. सदर कामाच्या निविदा स्विकृतीचे शिफारसीसाठी तक्रारदार सार्वजनिक बांधकाम विभाग नांदेडचे अधीक्षक अभियंता गजेंद्र राजपूत यांना भेटले. राजपूत यांनी मंजुर झालेल्या दोन टेंडरचे एकुण 14 कोटी 10 लाख रूपयाचे अर्धा टक्का 7 लाख रूपयाची मागणी केली व सदर पैसे दिले तर पुढे मुख्य अभियंता, नांदेड यांच्याकडे शिफारस करतो असे सांगितले. त्यानंतर तक्रारदार हे संबंधित टेबलचे लिपिक विनोद कंधारे यांना भेटले, त्यांनी त्यांचे व त्यांचेसोबत असलेले लिपीक जयंत धावडे यांच्यासाठी प्रत्येक टेंडरचे 25 हजार रूपये असे एकुण 50 हजार रूपयाची मागणी केली. सदरचे पैसे हे लाच असल्याची तक्रारदार यांना खात्री झाल्याने त्यांना ती देण्याची इच्छा नसल्याने त्यांनी लाचलुचपत प्रतिबंधक विभाग, नांदेड (Nanded ACB) येथे तक्रार दिली. (ACB Trap News)

एसीबीच्या पथकाने तक्रारदार यांना लाच मागणी पडताळणीसाठी पाठविले असता, तक्रारदार यांनी गजेंद्र हिरालाल राजपुत यांची भेट घेतली व सात लाख रूपये जास्त होत आहेत. काही तरी कमी करा अशी विनंती केली. राजपुत यांनी तडजोडीअंती सहा लाख रूपयाची पंचासमक्ष मागणी केली. तसेच सहा लाख रुपये लिपिक कंधारे यांच्याकडे देण्यास सांगितले. त्यानंतर तक्रारदार हे लिपीक कंधारे यांच्याकडे गेले व राजपुत साहेबांनी सहा लाख रूपये तुमच्याकडे देण्यास सांगितले. तसेच दोन टेंडरचे प्रत्येकी 20 हजार रुपये असे एकुण 6 लाख 40 हजार घेण्यास वरिष्ठ लिपिक विनोद कंधारे यांनी पंचासमक्ष होकार दर्शविला.

एसीबीच्या पथकाने बुधवारी सार्वजनिक बांधकाम विभागाच्या, नांदेड कार्यालयात सापळा रचला.
तक्रारदार यांच्याकडून लाचेची रक्कम स्वीकारताना विनोद कंधारेला रंगेहाथ पकडण्यात आले.
दोघांवर नांदेड शहरातील शिवाजीनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दरम्यान गजेंद्र राजपूत यांच्या कार्यालय व घराची झडती घेण्यात आली. या झडतीतून लाचलुचपत प्रतिबंधक नांदेड पथकाने पंचासमक्ष एकूण 72 लाख 91 हजार 490 रुपये जप्त केले आहेत.

ही कारवाई एसीबी नांदेड परिक्षेत्राचे पोलीस अधीक्षक डॉ. राजकुमार शिंदे (Nanded ACB SP Dr. Rajkumar Shinde)
यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उप अधीक्षक अनिल कटके (DySP Anil Katke), पोलीस निरीक्षक गजानन बोडके
(PI Gajanan Bodke), सहायक पोलीस उपनिरीक्षक गजेंद्र मांजरमकर, पोलीस अंमलदार ज्ञानेश्वर पंचलिंगे, तानाजी मुंढे,
गजानन पवार, शेख अकबर, राजेश राठोड, अरशद खान, ईश्वर जाधव, गजानन राउत, प्रकाश मामुलवार यांच्या
पथकाने केली. पुढील तपास पोलीस उप अधीक्षक राजेंद्र पाटील करीत आहेत.

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

Supreme Court On Bhide Wada Smarak | भिडे वाड्यातील भाडेकरूंचे अपील सर्वोच्च न्यायालयाने फेटाळले ! महिन्याभरात वाडा खाली करा अन्यथा पालिकेला भूसंपदानाचे सर्व पर्याय खुले राहतील

Deepak Mankar On Maratha Reservation | ‘मराठा समाजाला त्वरित आरक्षण द्या’, राष्ट्रवादीचे पुणे शहराध्यक्ष दीपक मानकर यांचे मुख्यमंत्र्यांना पत्र