ACB Trap News | 95 हजारांची लाच घेताना शिक्षण संस्थेच्या अध्यक्षासह मुख्याध्यापक, शिपाई अँन्टी करप्शनच्या जाळ्यात, शैक्षणिक क्षेत्रात प्रचंड खळबळ

कोल्हापूर : पोलीसनामा ऑनलाइन – ACB Trap News |  वरिष्ठ कार्यालयाशी पत्रव्यवहार करून तक्रारदार यांच्यावर दबाव निर्माण करून वेतनवाढ (Salary Increase) रोखण्याची भीती दाखवून महिला शिक्षिकेकडून 95 हजार 577 रुपयांचे एक महिन्याचे वेतन लाच म्हणून मागणी (Demanding Bribe)   केली. लाचेची रक्कम स्वीकारताना (Accepting Bribe) संजीवनी शिक्षण प्रसारक मंडळ संकलित अण्णासाहेब विभुते विद्या मंदिर प्राथमिक शाळा धरणगुत्ती. तालुका शिरोळ, जिल्हा कोल्हापूर संस्थेचे अध्यक्ष (Chairman), मुख्याध्यापक (Principal) आणि शिपाई यांना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने (ACB Trap News) सापळा रचून रंगेहाथ पकडले. ही कारवाई बुधवारी (दि. 23) करण्यात आली. एसबीच्या या कारवाईमुळे शिक्षण क्षेत्रात खळबळ उडाली आहे.

शिक्षण संस्था अध्यक्ष अजित उद्धव सूर्यवंशी (Ajit Uddhav Suryavanshi), मुख्याध्यापक महावीर आप्पासाहेब पाटील (Mahaveer Appasaheb Patil), शिपाई अनिल बाळासो टकले (Anil Balaso Takle) असे लाच घेताना पकडण्यात आलेल्या तिघांची नावे आहेत. याबाबत अण्णासाहेब विभुते विद्या मंदिर प्राथमिक शाळा, धरणगुत्ती. तालुका शिरोळ, जिल्हा कोल्हापूर येथील 48 वर्षीय महिला शिक्षिकेने कोल्हापूर एसबीकडे (ACB Trap News) 17 जुलै रोजी तक्रार केली आहे.

तक्रारदार ह्या संजीवनी शिक्षण प्रसारक मंडळ संकलित अण्णासाहेब विभुते विद्या मंदिर प्राथमिक शाळा (Annasaheb Vibhute Vidya Mandir Primary School), धरणगुत्ती. तालुका शिरोळ, जिल्हा कोल्हापूर येथे शिक्षिका म्हणून कार्यरत आहेत. त्यांच्याकडे अध्यक्ष अजित सूर्यवंशी यांनी संस्थेच्या इमारतीच्या भाड्यापोटी एप्रिल महिन्याच्या (95,577 रुपये) इतक्या वेतन रकमेची लाच स्वरूपात मागणी केली. तसेच लाच रक्कम दोन हप्त्यात देणेबाबत सांगितले. तक्रारदाराने ती रक्कम न दिल्याने त्यांची वेतन वाढ रोखण्याबाबत वरिष्ठ कार्यालयाशी पत्रव्यवहार करून तक्रारदार यांच्यावर दबाव निर्माण करून वेतनवाढ रोखण्याची भीती दाखवली.

याबाबत महिला शिक्षिकेने कोल्हापूर एसीबीकडे (Kolhapur ACB Trap News) तक्रार दाखल केली.
पथकाने पडताळणी केली असता संस्था अध्यक्ष अजित सूर्यवंशी यांनी तक्रारदार यांच्याकडे संस्थेच्या
भाड्यापोटी एक महिन्याचा पगार लाच म्हणून मागितल्याचे निष्पन्न झाले. तसेच लाचेची रक्कम संस्थेचे मुख्याध्यापक आरोपी महावीर पाटील यांच्याकडे देण्यास सांगितले. मुख्याध्यापक यांनी लाचेची रक्कम शाळेतील शिपाई अनिल टकले यांच्याकडे देण्यास सांगितले. शिपाई अनिल टकले याला तक्रारदार यांच्याकडून लाचेची रक्कम स्वीकारताना रंगेहाथ पकडण्यात आले. यानंतर अध्यक्ष आणि मुख्याध्यापक यांना ताब्यात घेण्यात आले. तीनही आरोपी विरुद्ध जयसिंगपूर पोलीस ठाण्यात (Jaisingpur Police Station) गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

ही कारवाई पुणे लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे (Pune ACB)
पोलीस अधीक्षक अमोल तांबे (SP Amol Tambe), अपर पोलीस अधीक्षक शीतल जानवे (Addl SP Sheetal Janve),
अपर पोलीस अधीक्षक विजय चौधरी (Addl SP Vijay Chaudhary)
यांच्या मार्गदर्शनाखाली कोल्हापूर एसीबीचे उपअधीक्षक सरदार नाळे (DySP Sardar Nale),
पोलीस उपनिरीक्षक संजीव बंबरगेकर (PSI Sanjeev Bambargekar) पोलीस अंमलदार प्रकाश भंडारे,
सुनील घोसाळकर, विकास माने, मयूर देसाई, रुपेश माने, संदीप पवार, सचिन पाटील, पुनम पाटील, गुरव,
अपराध यांच्या पथकाने केली.

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

Sakshi Chopra | बिग बॉस 17 मध्ये येणार रामानंद सागर यांची पणती साक्षी चोप्रा; आपल्या रिव्हिलिंग फॅशनसाठी जाते नावाजली