ACB Trap On Maharashtra Jail Police | लाच घेताना कारागृहाचे तीन कर्मचारी एसीबीच्या जाळ्यात, 2 महिला कर्मचाऱ्यांचा समावेश

जळगाव : पोलीसनामा ऑनलाइन – ACB Trap On Maharashtra Jail Police | कारागृहात बंदी असलेल्या आरोपींची भेट घडवून देण्यासाठी नातेवाईकांकडून दोन हजार रुपये लाच स्वीकारताना जळगाव जिल्हा कारागृहातील (Jalgaon District Jail) तीन कर्मचाऱ्यांना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने सापळा (Jalgaon ACB Trap) रचून रंगेहाथ पकडले. या कारवाईमुळे खळबळ उडाली आहे. धुळे एसीबीने (Dhule ACB Trap) ही कारवाई बुधवारी (दि.8) केली. यामध्ये एक सुभेदार व दोन महिला कर्मचाऱ्यांचा समावेश आहे. (ACB Trap On Maharashtra Jail Police)

सुभेदार भीमा उखडू बिल (वय 53 रा. महाबळ रोड, तापी पाटबंधारे, जाणता राजा व्यायाम शाळेजवळ, वर्षा बिल्डिंग, 2 रा मजला, रूम नं 8, जळगाव, मूळ रा. दत्त मंदिर जवळ, मु. पो.जयनगर, ता. शहादा, जि.नंदुरबार), महिला कारागृह शिपाई हेमलता गयभू पाटील (वय 29 रा. प्लॉट नंबर 1/5/3, गट नं 180, गिरणा पंपिंग रोड वाघ नगर दत्त मंदिर समोर), पूजा सोपान सोनवणे (वय 30 रा-.कारागृह कॉटर्स क्र. 2, जिल्हा अधिकारी कार्यालय आवार, जळगाव) असे लाच घेताना रंगेहाथ पकडलेल्या जिल्हा कारागृहातील कर्मचाऱ्यांची नावे आहेत (Bribe Case). याबाबत जामनेर तालुक्यातील पहुर येथील 58 वर्षीय महिला शिक्षिकेने धुळे एसीबीकडे तक्रार केली आहे. (ACB Trap On Maharashtra Jail Police)

तक्रारदार या जामनेर तालुक्यातील पहूर येथे एकात्मिक बाल विकास योजनेंतर्गत अंगणवाडी शिक्षिका आहेत. त्यांच्या मुलाविरुद्ध जिल्हा पेठ पोलीस ठाण्यात आयपीसी 307 प्रमाणे गुन्हा दाखल आहे. या गुन्ह्यात त्यांच्या मुलाला अटक झाली असून तो सध्या जिल्हा कारागृहात न्यायालयीन कोठडीत आहे.

मुलाला भेटण्यासाठी तक्रारदार शिक्षिका वारंवार जिल्हा कार्यालयात गेल्या
असता ड्युटीवर असलेल्या कारागृह सुभेदार भीमा बिल, महिला पोलीस पूजा सोनवणे,
हेमलता पाटील, अनंत केंद्रेकर, परशुराम काळे मुलाला भेटण्यासाठी प्रत्येक वेळी दोन हजार रुपये मागत होते.
याबाबत महिला शिक्षिकेने धुळे एसीबीकडे बुधवारी तक्रार केली.
पथकाने पडताळणी केली असता कारागृह कर्मचाऱ्यांनी लाच मागितल्याचे निष्पन्न झाले.
त्यानंतर एसीबीच्या अधिकाऱ्यांनी सापळा लावला असता पूजा सोनवणे, हमलता पाटील आणि सुभेदार भीमा बिल यांना लाच घेताना रंगेहाथ पकडण्यात आले. त्यांच्यावर जिल्हा पोलीस स्टेशन जळगाव येथे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

ही कारवाई नाशिक परिक्षेत्र पोलीस अधीक्षक शर्मिष्ठा घारगे-वालावलकर,
अपर पोलीस अधीक्षक माधव रेड्डी, वाचक पोलीस उप अधीक्षक नरेंद्र पवार यांच्या
मार्गदर्शनाखाली पोलीस उप अधीक्षक अभिषेक पाटील, पोलीस निरीक्षक रूपाली खांडवी
पोलीस अंमलदार राजन कदम, रामदास बरेला यांच्या पथकाने केली.

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

Shri Sadguru Shankar Maharaj Samadhi Trust | निर्माल्यापासून अगरबत्ती,
धनकवडी येथील श्री सद्गुरू शंकर महाराज समाधी ट्रस्टचा उपक्रम