Actor Suriya | दाक्षिणात्य सुपरस्टार सूर्या करणार बॉलीवुडमध्ये एन्ट्री; ‘ही’ ऐतिहासिक भूमिका साकारणार

पोलीसनामा ऑनलाइन – आपल्या अभिनयाने दाक्षिणात्य सिनेसृष्टी गाजवणारा अभिनेता सूर्या (Actor Suriya) आता बॉलीवुडमध्ये पदार्पण करणार आहे. तमिळ अभिनेता सूर्याचे फॅन हे फक्त दक्षिण भागात नाही तर संपूर्ण भारतात आहे. त्याच्या रावडी लूकवर आजही तरुणी फिदा होतात. आता अभिनेता सूर्या (Actor Suriya) एका ऐतिहासिक भूमिकेतून बॉलीवुडमध्ये एन्ट्री करणार आहे.

दाक्षिणात्य सिनेसृष्टी सध्या टेंड्रिंगमध्ये असून तेथील हिरो हिरोईनला संपूर्ण देशातून प्रेम मिळत आहे. अनेक दाक्षिणात्य अभिनेते आता बॉलीवुडमध्ये काम करत आहे. यामध्ये प्रामुख्याने अभिनेता विजय देवरकोंडा (Vijay Deverakonda), अभिनेत्री समंथा रुथ प्रभू (Samantha Ruth Prabhu), अभिनेत्री रश्मिका मंदान्ना (Rashmika Mandanna), अभिनेत्री तमन्ना (Tamannaah), अभिनेता प्रभास (Actor Prabhas), अल्लू अर्जुन (Allu Arjun), अभिनेता महेश बाबू (Mahesh Babu) या कलाकरांची नावे या यादीमध्ये सर्वांत अग्रस्थानी आहेत. यामध्ये आता अभिनेता सूर्याचे नाव देखील जोडले जाणार आहे. सुर्या लवकरच दिग्दर्शक राकेश ओमप्रकाश मेहरा (Director Rakesh Omprakash Mehra) यांच्या चित्रपटात दिसणार आहे.

राकेश ओमप्रकाश मेहरा हे ‘महाभारत’मधील (Mahabharat) कर्ण या सुप्रसिद्ध व्यक्तिरेखेवर चित्रपट तयार
करत आहेत. राकेश ओमप्रकाश मेहरा हे कर्ण (Karna) या भूमिकेसाठी सूर्याचा विचार करत आहे.
त्यांच्यामध्ये आणि सूर्यामध्ये याबाबत चर्चा सुरु आहे. सूर्या हा तमिळ चित्रपटसृष्टीतील सगळ्यात महागडा
अभिनेता आहे. मागील वर्षी प्रदर्शित झालेला त्याचा ‘जय भीम’ (Jai Bhim) हा चित्रपट फार गाजला होता.

लवकरच या चित्रपटाची अधिकृत घोषणा करण्यात येणार असून यामध्ये सूर्या महत्त्वपूर्ण असे ‘कर्ण’चे
पात्र साकारताना दिसणार आहे. राकेश ओमप्रकाश मेहरा यांचा हा चित्रपट 2 भागांमध्ये सादर केला जाणार आहे.

या बहुचर्चित चित्रपटाचे शूटिंग 2024 मध्ये होणार असल्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.
सध्या सुर्या (Actor Suriya Sivakumar) त्यांच्या ‘कांगुवा’ या चित्रपटाचे (Kanguva Movie) शूटिंग करत आहे.
या चित्रपटाचे शूट आधी तो पूर्ण करणार असून त्यानंतर राकेश ओमप्रकाश मेहरा यांच्या चित्रपटात काम करणार आहे.
दिग्दर्शक राकेश ओमप्रकाश मेहरा यांचा देखील हा एक ड्रीम प्रोजेक्ट असून ते देखील खूप उत्सुक आहेत.

Web Title : Actor Suriya | tamil superstar suriya will make debut in bollywood with rakyesh omprakash mehra

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

ACB Trap News | सरकारी हॉस्पीटलमधील डॉक्टरची ओळख असल्याचे सांगुन PhonePe व्दारे घेतली लाच; सापळा कारवाई दरम्यान ‘कॅश’ घेताना रंगेहाथ पकडले

Pune ACB Case | अ‍ॅन्टी करप्शनची पथके पुण्यातील ‘त्या’ 2 पोलिसांच्या मागावर

Jitendra Awhad On PI Shekhar Bagde | ‘…आणि उर्वरीत रोख पैसे PI बागडे आपल्या घरी घेऊन जातो’, जितेंद्र आव्हाडांचा खळबळजनक आरोप; शेअर केली ‘ती’ ऑडिओ क्लिप (ऑडिओ)