Actress Sobhita Dhulipala | “मी फारशी गोरी आणि म्हणावी तितकी सुंदर नाही”, अभिनेत्रीने सांगितला तिचा मनोरंजन क्षेत्रातील अनुभव

पोलीसनामा ऑनलाइन – अभिनेत्री आणि मॉडेल म्हणून प्रसिद्ध असलेली शोभिता धुलिपाला (Actress Sobhita Dhulipala) ही सध्या चर्चेत आहे. तिचे दाक्षिणात्य अभिनेता नागा चैतन्यसोबत (Actor Naga Chaitanya) अफेअर असल्याच्या चर्चांनी उधान आले आहे. अभिनेत्री सामंथा रुथ प्रभु (Samantha Ruth Prabhu) सोबतच्या घटस्फोटानंतर नागा चैतन्य शोभिता धूलीपालाली डेट करत असल्याचे बोलले जात आहे. (Naga Chaitanya And Sobhita) 2013 सालची मिस अर्थ (Miss Earth 2013) असलेली शोभिता धुलिपाला (Actress Sobhita Dhulipala) हिने तिच्या करिअरच्या सुरुवातीच्या काळात आलेला अनुभव शेअर केला आहे. तिच्या रुपरंगावर तिने सुनावण्यात आलेले बोल आता तिने चाहत्यांसोबत शेअर केले आहे.

अभिनेत्री शोभिता धुलिपाला हिने अभिनय क्षेत्रात येण्याआधी मॉडेल म्हणून काम केले आहे. ती ‘मिस अर्थ’ जरी असली तरी काम मिळवण्यासाठी तिला फार त्रास झाला असे तिने कबुल केले आहे. ती जाहिरातींमध्ये कामे मिळवण्यासाठी ती प्रयत्न करत होती. यावेळेचे अनुभव तिने एका वृत्तनाहिनीला दिलेल्या मुलाखतीमध्ये सांगितले आहेत. लोकांनी तिला तिच्या रंगावरुन आणि रुपावरुन सल्ले दिले हे तिने सांगितले आहे. सोभिता म्हणाली की, “जेव्हा तुम्ही एखादी नवी गोष्ट सुरू करता तेव्हा तुम्हाला बराच संघर्ष करावा लागतो. मी चित्रपट क्षेत्राशी जोडलेली नाही. मला आजही आठवतं की जेव्हा मी जाहिरातीसाठी ऑडिशन द्यायचे तेव्हा बरीच लोक मला म्हणायचे की मी फारशी गोरी आणि म्हणावी तितकी सुंदर नाही. हे सगळं लोक मला माझ्या तोंडावर सांगायचे.”

या क्षेत्रात येण्यासाठी अनेक तरुणी उत्सुक असतात. मात्र इथे दिली जाणारी वागणुक तिने सांगितली आहे. तिने या प्रसंगानंतर काहीतरी हटके करुन दाखवण्याचा निर्धार केला. अभिनेत्री म्हणून तिने 2016 साली ‘रमण राघव 2.0’ (Raman Raghav 2.0) या चित्रपटातून पदार्पण केले. दिग्दर्शक अनुराग कश्यप (Director Anurag Kashyap) यांनी दिग्दर्शिक केलेल्या या सिनेमात प्रमुख भूमिका साकारण्याची संधी तिला मिळाली. तिने अभिनेता नवाजुद्दीन सिद्दीकी (Actor Nawazuddin Siddiqui) आणि अभिनेता विकी कौशल (Actor Vicky Kaushal) सोबत स्क्रिन शेअर केली. चित्रपटसृष्टीत पदार्पण करताना शोभिताला एक स्टार म्हणून नव्हे तर एक अभिनेत्री म्हणून यायचं होतं हे तिने या मुलाखतीमध्ये स्पष्ट केलं.

अभिनेत्री शोभिता धुलिपाला (Actress Sobhita Dhulipala) हिला खरी ओळख ‘मेड इन हेवन’ (Made In Heaven)
या वेबसिरीजमुळे मिळाली. प्राइम व्हिडीओच्या या वेबसिरीजमधून तिचा मोठा चाहता वर्ग निर्माण झाला.
त्यानंतर तिने गुडाचारी (Goodachari) या तमिळ चित्रपटात काम केले.
तसेच सुप्रसिद्ध पोन्नियिन सेल्वन (Ponniyin Selvan) या चित्रपटाच्या दोन्ही भागात ती झळकली होती.
आता लवकरच ती ‘द नाईट मॅनेजर’ (The Night Manager) या ओटीटीवरील वेब सीरिजच्या दुसऱ्या
सीझनमध्ये झळकणार आहे. यामध्ये शोभिता आदित्य रॉय कपूर (Aditya Roy Kapoor) आणि
अभिनेता अनिल कपूर (Anil Kapoor) सोबत काम करणार आहे.

Web Title :  Actress Sobhita Dhulipala | the night manager actress sobhita dhulipala says she was told she was not pretty enough

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

Major General Smita Devrani and Brigadier Amita Devrani Receive Prestigious National Florence Nightingale Awards for Exemplary Service in Nursing

Unveiling the Truth: Atal Bihari Vajpayee, the Right Man in the Right Party

C-DAC Collaborates with Bharati Vidyapeeth (Deemed to be University) College of Engineering, Pune, to Introduce New Technical Courses

Lonavla Residents Duped in Chardham Yatra Scam: 37 Victims Seek Justice

Autorickshaw Driver Arrested for Stealing Temple Bell: Kondhwa Police Crack the Case

India Takes Flight: Pioneering Female Representation among Commercial Pilots Globall