Actress Sumona Chakravarti | बालकलाकार म्हणून अमीर खान सोबत काम करणाऱ्या प्रसिद्ध अभिनेत्रीचे मनोरंजन विश्वात आहे मोठे नाव

पोलीसनामा ऑनलाइन – छोट्या पडद्यावरील लोकप्रिय कलाकार अभिनेत्री सुमोना चक्रवर्ती (Actress Sumona Chakravarti) हिचा मोठा चाहता वर्ग आहे. लोकप्रिय अशा ‘द कपिल शर्मा शो’ (The Kapil Sharma Show) या विनोदी कार्यक्रमामध्ये अभिनेत्री सुमोनाने कपिल शर्माच्या बायकोची भूमिका निभावत आहे. तिने कपिला शर्माची बायको मंजू शर्मा ही भूमिका करुन सर्व प्रेक्षकांना पोट धरुन हसायला लावले. तिच्या या भूमिकेमुळे ती घराघरात पोहचली आहे. अभिनेत्री सुमोना चक्रवर्ती ही सोशल मीडियावरही ॲक्टीव्ह असून तिचे चाहते तिच्या लाईफ अपडेट जाणून घेण्यासाठी उत्सुक असतात. अशा लोकप्रिय अभिनेत्री सुमोना चक्रवर्ती हिचा वाढदिवस आहे.

अभिनेत्री सुमोना चक्रवर्ती हिने बालकलाकार म्हणून वयाच्या 10 व्या वर्षापासून काम करण्यास सुरुवात केली. सुमोनाने 1999 साली आमिर खान (Aamir Khan) व मनीषा कोइराला (Manisha Koirala) यांच्या चित्रपटात बाल कलाकार म्हणून काम केले. तिची ही भूमिका प्रेक्षकांच्या एवढी लक्षात नसली तरी त्यानंतर अनेक भूमिका सुमोनाने उत्तमरित्या निभावल्या आहेत. छोट्या पडद्यावरील कामामुळे तिची घराघरात ओळख तयार झाली. सुमानाने कपिल शर्मा शो बरोबरच कमस से (Kamas Se), डिटेक्टिव डॉल (Detective Doll), कस्तूरी (Kasturi), हॉरर नाइट्स (Horror Nights), बड़े अच्छे लगते हैं (Bade Achhe Lagte Hain) यासारख्या अनेक हिंदी मालिकांमध्ये काम केले आहे. अभिनेत्री सुमोना चक्रवर्ती ही कपिल शर्माच्या एका एपिसोडसाठी 7 लाख रुपये मानधन घेते अशी माहिती मध्यंतरी समोर येत होती.

फक्त हिंदी मालिकांमध्ये नाही तर बॉलीवुडच्या चित्रपटातही (Bollywood Hit Movie) तिने काम केले. अभिनेत्रीने अनेक बड्या अभिनेत्यांसोबत हिंदी चित्रपटात काम केले आहे. तिने सलमान खान (Salman Khan) सोबत 2014 मध्ये किक (kick Movie) या गाजलेल्या चित्रपटात काम केले. यामध्ये तिने सलमानच्या मित्रांच्या बायकोची भूमिका साकारली होती. त्याच बरोबर तिने रणबीर कपूर (Ranbir Kapoor) सोबतही काम केले आहे. रणबीर कपूर, इलियाना डिक्रूज (Ileana D’Cruz) व प्रियंका चोप्रा (Priyanka Chopra) अशी तगडी स्टार कास्ट असलेल्या बर्फी या चित्रपटात (Barfi Movie) अभिनेत्री सुमानाने काम केले आहे.

मॉडेल, अभिनय आणि विनोदी कलाकार अशी ओळख निर्माण करणाऱ्या अभिनेत्री सुमोना चक्रवर्तीने
(Actress Sumona Chakravarti) आपल्या अभिनयाच्या बळावर मनोरंजन क्षेत्रात हक्काचे स्थान निर्माण केले आहे.
ती सोशल मीडियावर ॲक्टीव्ह (Sumona Chakravarti Photo) असून आपल्या प्रोजक्ट बद्दल तिथे माहिती
देत असते. आज अभिनेत्री सुमोना चक्रवर्ती 34 वा वाढदिवस साजरा करत आहे

Web Title :  Actress Sumona Chakravarti | sumona chakravarti birthday actress started career at 11 got popularity from kapil sharma comedy show worked with aamir khan salman khan in films

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा