Adipurush Cinema | आदिपुरूष चित्रपटाचं नवं गाणं प्रेक्षकांच्या भेटीला; अवघ्या तासाभरात केला मिलियनस टप्पा पार (VIDEO)

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन | ओम राऊत (Om Raut) दिग्दर्शित बहुचर्चित चित्रपट आदिपुरूष (Adipurush Cinema) येत्या 16 जून रोजी प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. तत्पूर्वी आदिपुरूष सिनेमातील ‘राम सिया राम’ (Ram Siya Ram) हे गाणं रिलिज झालं आहे. रामाच्या भक्तीचे गुणगाण करणारं हे भक्तीमय गाणं टी-सीरिजच्या (T-series) युट्यूब चॅनलवर प्रदर्शित करण्यात आलं आहे. हे गाणं युट्यूबवर येताच ट्रेंडिंगवर (Trending) आले असून केवळ एका तासात तब्बल 1.2 मिलियन व्ह्युज मिळाले आहेत. (Adipurush Cinema)
आदिपुरूष चित्रपटात श्रीरामाच्या भूमिकेत प्रभास (Prabhas as Ram), सीतेच्या भूमिकेत क्रिती सॅनन (Kriti Sanon as Sita) व रावणाच्या भूमिकेत सैफ अली खान (Saif Ali Khan as Ravana) दिसणार आहे. आतापर्यंतचा सर्वात जास्त 700 कोटी बजेट असलेल्या या सिनेमातील ‘राम सिया राम’ हे गाणे हिंदी (Hindi Song ), तेलुगू (Telugu Song), तामिळ (Tamil Song), कन्नड (Kannada Song ) व मल्याळम (Malayalam Song) अशा पाच भाषांमध्ये प्रदर्शित करण्यात आले आहे. ‘राम सिया राम’ या गाण्यात प्रभू राम आणि माता सीता यांच्यातील निखळ प्रेम दाखवण्यात आले आहे. या गाण्याचे गीत सर्वांच्या पसंतीस पडत असून गाण्याचे गीतकार हे लोकप्रिय गीतकार मनोज मुंतसिर शुक्ला (Lyricist Manoj Muntasir Shukla) आहेत. तर गाण्याला संगीत आणि त्याचे गायन सचेत आणि परंपरा टंडनने Sachet-Pramada Tandon) केले आहे.
चित्रपटात रामाची भूमिका साकारणाऱ्या प्रभासने त्याच्या इस्टाग्राम अंकाउटवरून (Instagram Account) हे
गाणं पोस्ट करत त्याच्या चाहत्यांना या गाण्याच्या प्रदर्शनाची बातमी दिली आहे. तसेच “आदिपुरुष’चा “आत्मा”
असे कॅप्शन दिले आहे. त्याच्या या पोस्टवर कमेंट्सचा पाऊस पडत असून त्याचे चाहते त्याच्यावर कौतुकाचा वर्षाव करत आहे.
सुरुवातीला वादाच्या भोवऱ्यात अडकलेल्या आदिपुरूष चित्रपटावर आता चाहते प्रेम करत आहे. याआधी प्रदर्शित झालेले लोकप्रिय संगीतकार अजय-अतुल (Composer Ajay-Atul) यांनी संगीत दिग्दर्शन केलेले ‘जय श्री राम’ (Jai Shri Ram) हे गाणे देखील प्रेक्षकांना भावलेले असून त्यानंतर आता ‘राम सिया राम’ धुमाकूळ घालत आहे.
गाण्यांना मिलीयनस मध्ये व्ह्युज मिळत असून चित्रपटाला लोक किती डोक्यावर घेतात यांकडे लक्ष लागले आहे. (Adipurush Cinema)
Web Title : Adipurush Cinema | The new song of the movie Adipurush is available to the audience; Crossed the million mark in just an hour
Join our WhatsApp Group, Telegram, facebook page and Twitter for every update
हे देखील वाचा
Pune Crime News | धक्कादायक ! पुण्यात मैत्रीणीकडून ‘जीवलग’ मित्राची चाकूने सपासप वार करून हत्या
Pune News | आराखडा आणि निधी तयार असूनही का रखडले आहे ससून रूग्णालयाचे नूतनीकरण ?