Aditya Thackeray | शिंदेंसोबत जाणार्‍या आमदारांना का रोखले नाही, आदित्य ठाकरे म्हणाले – ‘उद्धव ठाकरेंचे म्हणणे होते की स्वत:ला विकेलेले हे लोक…’

मुंबई : Aditya Thackeray | एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) यांनी जून महिन्यात शिवसेनेत (Shivsena) उभी फूट पाडून राज्याच्या राजकारणात भूकंप घडवून आणला होता. सुरूवातीला 12 आमदारांसह शिंदे यांनी बंडासाठी सुरक्षित असलेली सुरत गाठली होती. यानंतर सर्वत्र एकच खळबळ उडाली. हळुहळु त्यांच्याकडील आमदारांची संख्या वाढत गेली आणि त्यांनी सुरत-गुवाहटी-गोवा असा प्रवास करत मुंबईत येऊन सत्तांतर घडवून आणले. या प्रकरणाच्या सुरूवातीपासून शेवटपर्यंत एक दोन अपवाद वगळता उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) अतिशय शांत, संयमी दिसून आले. याबाबत शिवसेना नेते आदित्य ठाकरे (Aditya Thackeray) यांना प्रश्न विचारण्यात आल्यावर त्यांनी सविस्तर खुलासा केला आहे. ते मुंबईत आयोजित एका मुलाखतीच्या कार्यक्रमात बोलत होते.

सत्ता नाट्यादरम्यान शिंदेंच्या समर्थनासाठी जाणार्‍या आमदारांना उद्धव ठाकरेंनी का थांबवले नाही, असा प्रश्न आदित्य यांना विचारला असता ते म्हणाले, आम्ही शिंदेंवर डोळे झाकून विश्वास ठेवण्याची चूक केली. 12 लोक गेले तेव्हा मला उद्धवसाहेबांनी सांगितले की, आदित्य यांच्यामागे आपण पोलीस वगैरे लावून काही उपयोग नाही. स्वत:ला विकेलेले हे लोक आज नाहीतर उद्या निघून जाणार आहेत. ते पैशाला विकले गेले आहेत.

आदित्य (Aditya Thackeray) म्हणाले, उद्धव ठाकरेंनी मला सांगितल की,
आता यांच्यामागे लागून काय करायचे? यांच्यावर काही दडपण असेल.
त्यांनी काही गैर केले असेल अथवा लोकांबरोबर काही चुकीचे केले असेल त्याचे दडपण असेल तर निघून जाणार
आहेत. स्वत:ला विकले असेल तर निघून जाणार आहेत.
यांना किती दिवस रोखायचे आणि का म्हणून रोखायचे? आपण काही चुकीचे केलेले नाही आपण जनतेसमोर जाऊ.
आपण जनतेमध्येच आहोत. आपला चेहरा लोकांना ठाऊक आहे.

शिंदे गटावर (Shinde Group) हल्लाबोल करताना आदित्य म्हणाले, हे मुखवटे लावून फिरत होते आणि अजून मुखवटे लावून फिरत आहेत. अनेक वेगवेगळी कारणे देतात. हिंदुत्वापासून, काँग्रेस (Congress),
राष्ट्रवादीपासून (NCP), निधीपासून सगळी कारणे देत असतात. ते पळून गेले आहेत.
आम्ही इथेच आहोत. आता बघू.

आदित्य म्हणाले, आम्हाला भीती एवढ्यासाठी नाहीय कारण आजपर्यंत शिवसेनेशी ज्यांनी ज्यांनी गद्दारी केलेली आहे
ते आज कुठे आहेत आणि शिवसेना कुठे आहे हे देखील समोर आहे.

Web Title :-  Aditya Thackeray | aditya thackeray says father ex cm uddhav thackeray said no use of forcing eknath shinde and rebel mla to stay in shivsena