Ahmednagar Crime News | प्रात्यक्षिक परीक्षेत पैकीच्या पैकी मार्क देतो मला काय देणार? ‘रयत’च्या प्राध्यापकाची विद्यार्थिनीकडे शरीर सुखाची मागणी

अहमदनगर : पोलीसनामा ऑनलाइन – Molestation case | बारावीच्या भूगोल विषयाच्या प्रात्यक्षिक परीक्षेत 20 पैकी 20 मार्क देण्यासाठी प्राध्यापकाने विद्यार्थिनीकडे शरीर सुखाची मागणी केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. याप्रकरणी रयत शिक्षण संस्थेच्या नगरमधील राधाबाई काळे महिला महाविद्यालयातील प्राध्यापकावर गुन्हा दाखल करुन अटक करण्यात आली आहे. सतीश शिर्के असे या प्राध्यापकाचे नाव आहे. सध्या बारावीच्या प्रात्यक्षिक परीक्षा सुरु असून याच दरम्यान हा प्रकार घडला आहे. संबंधित विद्यार्थिनीने शिक्षकाच्या मागणीकडे दुर्लक्ष केले असता त्याने तिला शून्य मार्क देले. याबाबत विचारणा केली असता आरोपीने पुन्हा तीच मागणी करुन अश्लील हावभाव केल्याचा आरोप विद्यर्थिनीने केला आहे.(Ahmednagar Crime News)

याबाबत पीडित तरुणीने तोफखाना पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. पीडित मुलगी इयत्ता बारावीमध्ये शिकत आहे. तर आरोपी शिर्के हा भूगोल विषय शिकवतो. हा प्रकार 5 फेब्रुवारी रोजी आरोपी शिर्के याच्या केबिनमध्ये घडला आहे. याप्रकरणी तोफखाना पोलिसांनी सतीश शिर्के याच्यावर विनयभंग तसेच पोक्सो कायद्यांतर्गत गुन्हा दखल करुन अटक केली आहे.

पीडित तरुणीने दिलेल्या फिर्य़ादीत म्हटले की, 5 फेब्रुवारी रोजी प्रा. शिर्के याने त्याच्या केबिनमध्ये बोलवले.
तुला भूगोलाच्या प्रात्यक्षिक परिक्षेत 20 पैकी 20 मार्क हवे असतील तर मला काय देशील? अशी विचारणा केली.
तेव्हा मी विषय टाळून तिथून निघून गेले. त्यानंतर महाविद्यालयाच्या आवारत भेटल्यानंतर देखील शिर्के यांनी
तशीच मागणी केली. परंतु मी त्याकडे दुर्लक्ष केले. शेवटी मला प्रात्यक्षिक परीक्षेत त्यांनी शून्य गुण दिले.(Ahmednagar Crime News)

8 फेब्रुवारीला मी त्यांना याबाबत विचारण्यासाठी गेले. तेव्हा त्यांनी अश्लील हावभाव करीत पुन्हा तशीच मागणी केली.
माझे लैंगिक शोषण करण्याचा त्यांचा हेतू ओळखून मी तिथून निघून गेले.
मी घाबलेले असल्याने व बदनामी होईल म्हणून त्या दिवशी घरात कोणाला काहीच सांगितले नाही.
त्यानंतर दुसऱ्या दिवशी मी आई-वडिलांना हा प्रकार सांगितला. त्यांनी धीर दिला आणि आम्ही पोलीस ठाण्यात फिर्याद दिली,
असे फिर्य़ादीत नमूद केले आहे.

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

Murder In Budhwar Peth Pune | बुधवार पेठेत वस्ताऱ्याने गळ्यावर वार करुन खून : फरासखाना पोलिसांकडून आरोपीला अटक

Pune Crime Court News | पुणे : फसवणुकीच्या गुन्ह्यातून आरोपीची निर्दोष मुक्तता

Nikhil Wagle On Pune Police | कालचा हल्ला पुणे पोलिसांच्या संगनमताने, पत्रकार निखिल वागळे यांचा गंभीर आरोप

Manoj Jarange Patil | मनोज जरांगेंचे आजपासून बेमुदत उपोषण, मराठा बांधवांना केले आवाहन, ”सर्व आमदारांना फोन करा…”

Accident On Samriddhi Highway | समृद्धी महामार्गावर कार आणि कंटेनरचा भीषण अपघात; 3 ठार, 2 जखमी

Pune Bharti Vidyapeeth Crime | पिस्टल बाळगणाऱ्या सराईत गुन्हेगाराला भारती विद्यापीठ पोलिसांकडून अटक