Ajay Devgn | “जंगली रम्मी खेळून तुम्ही आजपर्यंत किती पैसे जिंकले हे महाराष्ट्रातील तरुणांना सांगा”; तरुणाचे थेट अजय देवगणला पत्र

पोलीसनामा ऑनलाइन – बॉलीवुडचा सुपरस्टार अजय देवगण (Ajay Devgn) एक लोकप्रिय अभिनेता आहे. अजयचा चाहता वर्ग मोठा असून अनेक तरुण त्याला आपला रोल मॉडेल समजतात. व त्याचे अनुकरण करतात. पण अभिनेता अजय देवगण सध्या जंगली रम्मी (Ajay Devgn) या ऑनलाइन गेमिंगच्या जाहिरातीमध्ये झळकतो आहे. अभिनेता अजय हा या जाहिरातीमधून ऑनलाइन जोखमेची ही गेम लोकांना खेळण्याचे आवाहन करत आहे. यामध्ये तो जंगली रम्मीला एक योग्य प्लॅटफॉर्म आहे असे सांगत असून येथे मेहनत करा असे सूचवत आहे. अजयच्या अशा आवाहनाचा मोठा फटका हा तरुण वर्गाला आणि खास करुन ग्रामीण भागात जास्त बसत आहे. (Ajay Devgn Junglee Rummy) यावर एका तरुणाने थेट अजयला पत्र लिहीत तुम्ही आता पर्यंत जंगली रम्मीवरुन किती पैसे कमावले असा सवाल केला आहे. (Viral Letter To Ajay Devgn)

सध्या जंगली रम्मीसराख्या ऑनलाइन गेंमिंगचे (Junglee Rummy Online Game) लोण वाढले आहे. अनेक तरुण याकडे आकर्षित होऊन लाखो रुपयांचे नुकसान करुन घेत आहेत. अशा ऑनलाइन गेमिंगमुळे आयुष्यभराची कमाई अनेक लोक खर्च करत आहे. (Junglee Rummy Cash) अशा परिस्थितीमध्ये अनेक हिरो हिरोईन या जंगली रम्मीची जाहिरात करत आहे. यामध्ये अभिनेता अजय देवगणचा समावेश आहे. यावर नांदेड जिल्हातील विलास शिंदे (Vilas Shinde) या पठ्ठ्याने थेट अजयला पत्र लिहिले आहे. त्याने या पत्राचा फोटो सोशल मीडियावर पोस्टही केला आहे. अनेकांनी या तरुणाच्या भूमिकेला समर्थन दिले आहे.

विलास यांनी या पत्रात लिहिले आहे की, “महोदय अभिनेता देवगन सर नमस्कार आणि राम राम.. आपण एक अतिशय उत्तम अभिनेता आहात. आपले अनुकरण करणारे महाराष्ट्रात अनेक लाखो नवतरुण आहेत. हे तुमच्यासाठी अभिमानाची आणि तेवढीच जबाबदारीची गोष्ट आहे. आज काल सोशल मीडियाचा खूप सारे नवतरुण उपयोग करत आहेत. नवतरुणांना चांगली दिशा देण्याचे काम आपल्यासारख्या अभिनेत्याने सोशल मीडियावर केलं पाहिजे. पण सोशल मीडियावर आपली जंगली रम्मी या ऑनलाईन गेमची जाहिरात पाहून अनेक नवतरुणांना या गेम खेळण्याची जणू सवयच लागली.

याच सवयीमुळे अनेक तरुण कर्जबाजारी झाले आहेत. त्यामुळे अनेक तरुणांना प्रश्न पडला आहे की, आपण जंगली रम्मी हा ऑनलाईन गेम खेळून आजपर्यंत किती पैसे जिंकलेले आहे. जाहिरातीचा उद्देश काय आहे. हे महाराष्ट्रातील तरुणांना सांगितलं पाहिजे. नवतरुणांना जाणून घेण्याची इच्छा आहे. त्यामुळे आपण फेसबुक लाईव्हच्या माध्यमातून हे सर्व सांगितल पाहिजे. या गेमला काही राज्यात बंदी आहे. आपण मात्र बिंदास्त जाहिरात करता. महाराष्ट्रातील तरुणांना हा जंगली रम्मी गेम किती फायद्याचा आहे. हे पण आपण सांगितले पाहिजे.

हाच गेम तुमच्या आजुबाचे किती मान्यवर खेळतात हे पण आपण पाहिले पाहिजे. कारण ग्रामीण भागातील नवतरुणाना चांगल्या गोष्टीचे मार्गदर्शन करणारे खूप कमी लोक आहेत. त्यातच तुम्ही अशा जाहिराती करून नवतरुणांना काय संदेश देत आहोत हे पण सांगितल पाहिजे. फक्त जाहिरात करून पैसेच कमविण्याचा उद्देश असेल तर हाच उद्देश किती योग्य आहे. या सर्व गोष्टींचा आपण विचार करावा आणि आपण ही जाहिरात बंद करावी. तसेच नवतरुणांना चांगले विचार देण्याचा प्रसत्न करावा ही विनंती.”

अशा आशयाचे पत्र विलास शिंदे आणि अभिनेता अजय देवगणच्या जुहूच्या (Ajay Devgn Juhu Home )
घरच्या पत्यावर हे पत्र पोस्टाने पाठवून दिले आहे. त्याच्या या भूमिकेला अनेक नेटकऱ्यांनी दुजोरा दिला आहे.
अभिनेता अजय देवगण बरोबरच (Ajay Devgn Junglee Rummy) अभिनेता हृतिक रोशन (Hrithik Roshan),
शक्ती कपूर (Shakti Kapoor), अन्नू कपूर (Annu Kapoor), अभिनेता मनोज जोशी (Manoj Joshi) यांनी
जंगली रम्मीच्या जाहिराती केल्या आहेत. तर मराठी सिनेविश्वातील अभिनेता अंकुश चौधरी (Ankush Chaudhary),
स्वप्नील जोशी (Swapnil Joshi), प्रसाद ओक (Prasad Oak), शिवाजी साटम (Shivaji Satam), शरद केळकर
(Sharad Kelkar), शिव ठाकरे (Shiv Thackeray), सई ताम्हणकर (Sai Tamhankar), श्रुती मराठे
(Shruti Marathe) या कलाकारांनी जंगली रम्मीची जाहिरात करुन ते खेळण्याचे आवाहन लोकांना केले आहे.

Web Title : Ajay Devgn | nanded youth letter to ajay devgan who promotes online rummy

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा