Ajit Pawar On Chhagan Bhujbal | ‘विरोधकांनी भुजबळ नाराज असल्याच्या बातम्या पेरल्या’ – अजित पवार

पुणे : पोलीसनामा ऑनलाईन – Ajit Pawar On Chhagan Bhujbal | लोकसभा निवडणुकीच्या निकालांनंतर राज्याच्या राजकारणात मोठ्या घडामोडी पाहायला मिळाल्या. लोकसभा निवडणुकीदरम्यान नाशिक लोकसभा मतदारसंघातून छगन भुजबळ यांच्या नावाची जोरदार चर्चा सुरू होती. त्यांनी आता निवडणुकीतून माघार का घेतली याचे कारणही सांगितले होते.

दिल्लीतून माझे तिकीट फायनल ही झाले होते. मात्र महिना झाला तरी जाहीर होत नव्हते. समोरचा उमेदवार मात्र महिनाभरापासून कामाला लागला होता. त्यामुळे मी निवडणूक न लढवण्याचा निर्णय घेतला होता असे स्पष्टीकरण भुजबळ यांनी दिले होते. त्यानंतर भुजबळ राज्यसभेवर जातील अशा चर्चा ही मागील काही दिवसांपासून रंगल्या होत्या.(Ajit Pawar On Chhagan Bhujbal)

मात्र या चर्चा देखील फोल ठरल्या असून राज्यसभेवर सुनेत्रा पवार यांची निवड करण्यात आली. राज्यसभेवर निवड न झाल्याने छगन भुजबळ नाराज असल्याच्या चर्चा सुरु झाल्या होत्या. याबाबत उपमुख्यमंत्री अजित पवारांना विचारले असता त्यांनी विरोधकांवर निशाणा साधला आहे.

प्रफुल्ल पटेल, सुनील तटकरे कोणीही मंत्रिपदाबाबत नाराज नाही. तसेच राज्यसभेच्या खासदारकीसाठी भुजबळही
नाराज नसल्याचे त्यांनी सांगितले. विरोधकांनी आणि जवळच्या मित्रांनी भुजबळ नाराज असल्याच्या बातम्या पेरल्या आहेत
असे म्हणत पवारांनी विरोधकांवर निशाणा साधला.

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

Ajit Pawar – RSS – BJP | संघाच्या मुखपत्रातून राष्ट्रवादीचा उल्लेख करत भाजपावर टीका; अजित पवार म्हणाले, “मला फक्त…”

Chhagan Bhujbal | लोकसभेत आम्ही दोनच जागा लढवल्या, मग 48 जागांवर परिणाम कसा? भुजबळांचा सवाल

Bhide Wada Smarak | भिडे वाडा येथे शाळा नाही स्मारक; भूमिपूजन जुलै मध्ये होणार असल्याची अजित पवारांची माहिती