Ajit Pawar On Onion Issue | अजित पवार यांची कबुली…; म्हणाले – ‘कांदा प्रश्नामुळे चार जिल्ह्यात फटका…’

पुणे : पोलीसनामा ऑनलाईन – Ajit Pawar On Onion Issue | लोकसभा निवडणुकीत कांद्याच्या (Onion Issue In Lok Sabha Election) प्रश्नावरून महायुतीला (Mahayuti) चार जिल्ह्यात फटका बसल्याची कबुली राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवारांनी दिली आहे. कांदा उत्पादक आणि ग्राहक दोघांचे समाधान होईल असा तोडगा काढावा असे केंद्राला सुचवले होते मात्र समाधानकारक तोडगा न निघाल्याने पुणे, अहमदनगर, नाशिक, सोलापूर या जिल्ह्यात फटका बसल्याचे पवारांनी सांगितले.(Ajit Pawar On Onion Issue)

पुणे दौऱ्यावर उपमुख्यमंत्री पवार पत्रकारांशी बोलताना म्हणाले, ‘जळगाव, नाशिक, पुणे, नगर आणि सोलापूर जिल्ह्यातील अनेक शेतकरी कांदा उत्पादन घेतात. कांदा प्रश्न पेटल्यानंतर कांदा उत्पादकांमध्ये नाराजी होती. त्यामुळे कांदा उत्पादक आणि ग्राहक या दोन्ही घटकांचे समाधान होईल, असा तोडगा काढण्याबाबत केंद्राला आम्ही सांगितले होते.

मात्र, तोडगा न निघाल्याने उत्तर महाराष्ट्रातील जळगाव आणि रावेर वगळता नाशिक, पुणे, नगर आणि सोलापूर येथील
जागांवर महायुतीला फटका बसला. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या शपथविधीसाठी मी दिल्ली येथे गेलो होतो.
तेव्हा अमित शहा आणि पियुष गोयल यांना देखील याची कल्पना देण्यात आली अशी प्रतिक्रिया अजित पवारांनी दिली.
तसेच आता लोकसभेच्या निकालानंतर प्रत्येकजण आपआपल्या पद्धतीने त्याचे विश्लेषण करीत असल्याचे त्यांनी सांगितले.

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

Ajit Pawar | सुनेत्रा पवार यांचा फॉर्म भरताना शिंदे फडणवीस का नव्हते? अजित पवार म्हणाले…

Indapur Pune News | देशात उंच घोड्यामध्ये नावलौकिक असलेल्या ‘सिंकदर’चे हृदयविकाराच्या झटक्याने निधन

Excise Department Pune | पुणे : पोर्शे कार अपघातानंतर उत्पादन शुल्क विभागाला आली जाग, 68 हॉटेल व पबचे परवाने रद्द करण्याचा जिल्हाधिकाऱ्यांना प्रस्ताव