Ajit Pawar Statement on Sambhaji Maharaj | इतिहास अभ्यासक श्रीमंत कोकाटे यांची अजित पवारांवर टीका, म्हणाले- ‘निधर्मी संकल्पना…’

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – Ajit Pawar Statement on Sambhaji Maharaj | विधानसभेचे विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी विधानसभेत बोलताना छत्रपती संभाजी महाराज हे धर्मवीर (Dharmaveer) नसून स्वराज्यरक्षक (Swarajrakshaka) होते, असे विधान केले होते. त्यांच्या या विधानानंतर (Ajit Pawar Statement on Sambhaji Maharaj) अनेकांनी टीका केली आहे. संभाजीराजे छत्रपती (Sambhaji Raje Chhatrapati) यांनी देखील अजित पवार यांच्यावर निशाणा साधला होता. आता पुरोगामी वर्तुळातून देखील अजित पवारांवर टीका होत आहे. पुरोगामी चळवळीतील नेते आणि इतिहास अभ्यासक श्रीमंत कोकाटे (Shrimant Kokate) यांनी देखील अजित पवारांचा दावा खोडून काढला आहे. तसेच त्यांनी हे अर्धसत्य सांगतल्याची टीका केली आहे.

अजित पवारांचे वक्तव्य अर्धसत्य

श्रीमंत कोकाटे म्हणाले, छत्रपती संभाजी महाराज हे स्वराज्यरक्षक होते धर्मवीर होते. अजित पवारांनी अर्धसत्य सांगितले. महाराज स्वराज्यरक्षक होते, हे सत्य आहे. छत्रपती शिवाजी महाराज (Chhatrapati Shivaji Maharaj) यांनी स्थापन केलेल्या स्वराज्याचे त्यांनी रक्षण केले. त्यासाठी त्यांनी बलिदान देखील दिले. ते जसे स्वराज्यरक्षक होते तसे ते धार्मिक परंपरांना मानणारे होते. ते शाक्त परंपरेंचे उपासक होते, असे संस्कृत पंडीत आणि प्राच्यविद्या पंडीत शरद पाटील सांगतात. (Ajit Pawar Statement on Sambhaji Maharaj)

आजच्या संकल्पना इतिहासावर लादू नका

कोकाटे पुढे म्हणाले, छत्रपती संभाजी महाराज यांनी चार ग्रंथ लिहिले आहेत.
त्या ग्रंथामध्ये त्यांनी शंभू महादेवाचे वर्णन केले आहे. भवानी मातेचे वर्णन केले आहे.
त्यांना आपल्या धर्मिक परंपरेचा प्रचंड अभिमान होता.
त्यामुळे ते जसे स्वराज्यरक्षक होते तसे ते धर्मवीर देखील होते.
आजच्या काळातील धर्मनिरपेक्ष आणि निधर्मी संकल्पना मध्ययुगीन काळातील महापुरुषावर लादणे हे
अनऐतिहासिक आहे. निधर्मी किवा पुरोगामी या आधुनिक संकल्पना आहेत. या मध्ययुगी नाहीत.
त्यामुळे आजच्या संकल्पना इतिहासावर लादू नका असा टोला कोकाटे यांनी अजित पवारांना लगावला.

Web Title :- Ajit Pawar Statement on Sambhaji Maharaj | history scholar shrimant kokate criticis ajit pawar statment on sambhaji maharaj dharmaveer

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

Sambhaji Raje Chhatrapati | ‘संभाजी महाराज धर्मवीर नव्हते’ या विधानावरून संभाजीराजे छत्रपतींनी अजित पवारांना ठणकावलं, म्हणाले…

Ajit Pawar | अजित पवारांच्या ‘त्या’ वक्तव्याचे बारामतीत पडसाद; बारामतीतील घरासमोर त्यांचा पुतळा जाळून व्यक्त केला निषेध

Bro Gref Recruitment | पुण्यात ५६७ जागांसाठी लवकरच भरती; १० वी ते ग्रॅज्युएट पास करू शकणार अर्ज