Amitabh Bachchan | डिंपल कपाडियाच्या सततच्या फोनमुळे अमिताभ बच्चन लागले रडायला

पोलीसनामा ऑनलाइन – बॉलीवुडच्या सुपरस्टारमध्ये अमिताभ बच्चन (Amitabh Bachchan) यांचे नाव आदराने घेतले जाते. सिनेविश्वामध्ये बिग बी (Bollywood Big B) अशी ओळख निर्माण करणारे अमिताभ बच्चन यांनी अनेक दशके चित्रपटांमधून प्रेक्षकांचे निखळ मनोरंजन केले आहे. आजही अनेक चित्रपटांमध्ये ते भूमिका साकारताना दिसतात. आता अमिताभ बच्चन यांचे नाव श्रीमंत अभिनेत्यांमध्ये दुसऱ्या क्रमांकावर येते. मात्र एक काळ असाही होता की अमिताभ बच्चन (Amitabh Bachchan) हे कर्जबाजारी झाले होते. अनेकांकडून त्यांनी कर्ज घेतले होते. ते सर्व लोक त्यांच्या घरी पैसे मागायला सतत यायचे. या काळात अक्षरशः ते रडायला आले होते.

अभिनेते अमिताभ बच्चन अनेक वर्षांपासून चित्रपटांमध्ये (Amitabh Bachchan Movies) कामे करत आहेत. त्यांचा मोठा चाहता वर्ग असून अनेक लोक आजही त्यांच्या चित्रपटांची आतुरतेने वाट पाहत असतात. एका मुलाखती दरम्यान अमिताभ बच्चन यांनी त्यांच्या या कठीण काळाबद्दल सांगितले. मात्र मध्यंतरी बिग बी यांच्यावर अंत्यत वाईट परिस्थिती उद्भवली होती. अमिताभ बच्चन यांनी अनेकांकडून कर्ज घेतले होते. मात्र त्यांच्याकडे हे कर्ज परत करण्यासाठी पैसे नव्हते. यामध्ये अभिनेत्री डिंपल कपाडिया (Dimple Kapadia) यांचा देखील समावेश होता. अभिनेत्री डिंपल अमिताभ यांना सतत कॉल करुन पैशांबद्दल विचारणा करत असत. एवढेच नाही तर डिंपल त्यांचा सेक्रेटरी देखील अमिताभ यांच्या घरी पाठवत असत. यामुळे अमिताभ खूप वैतागून गेले होते. अनेकदा कर्जाचे पैसे मागण्यासाठी लोक त्यांच्या घरापुढे थांबत असत.

अमिताभ बच्चन यांनी सांगितले की, “मी कधीच विसरु शकत नाही जेव्हा लोक माझ्या दारात येऊन मला शिवीगाळ आणि धमक्या देत असत. माझ्या 44 वर्षांच्या कारकिर्दीतील हा सर्वात वाईट टप्पा होता. तेव्हा कितीतरी वेळा माझे अश्रू ओसंडून वाहत असत.” असे त्यांनी सांगितले. पण नंतर ही परिस्थिती पुन्हा सुधारली. अमिताभ बच्चन यांना ‘कौन बनेंगा करोडपती’ (Kaun Banega Crorepati) या कार्यक्रमामध्ये काम मिळाले व अमिताभ बच्चन यांनी पुन्हा त्यांचे वैभव निर्माण केले. मात्र हा आयुष्यातील कठीण काळ ते कधीच विसरले नाहीत. आता अमिताभ बच्चन हे श्रीमंत अभिनेत्यांमध्ये दुसऱ्या क्रमांकावर आहेत.

अमिताभ बच्चन (Amitabh Bachchan) हे शेवटचे ‘ब्रम्हास्त्र’ चित्रपटामध्ये (Brahmastra Movie) झळकले होते.
यामध्ये त्यांनी रणबीर कपूर (Ranbir Kapoor) व आलिया भट्ट (Alia Bhatt) सोबत काम केले.
आता अमिताभ बच्चन प्रोजेक्ट के (Project K) अर्थात कल्की 2898 AD (Kalki 2898 AD) या चित्रपटामध्ये
झळकणार आहेत. तसेच ते लवकरच पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांच्या जीवनपटामध्ये मोदींची
प्रमुख भूमिका साकारताना दिसणार आहेत.

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

Maharashtra Politics Chief Minister | मुख्यमंत्री पदामध्ये कुठलाही बदल होणार नाही, मुख्यमंत्री एकनाथ शिंदेच राहणार; अजित पवारांच्या मुख्यमंत्र्यांच्या चर्चांवर देवेंद्र फडणवीसांनी स्पष्ट सांगितले (व्हिडिओ)