Amol Kolhe On BJP Govt | डॉ. अमोल कोल्हे यांनी भाजपावर उगारला टीकेचा ‘आसूड’, केंद्राच्या चुकीच्या धोरणांमुळे कांदा, सोयाबिन, दूध उत्पादक शेतकरी…

पुणे : पोलीसनामा ऑनलाईन – Amol Kolhe On BJP Govt | आज महात्मा फुले यांच्या जयंतीनिमित्त पुण्यातील महात्मा फुले वाड्यात महाविकास आघाडीचे तीन उमेदवार, खासदार सुप्रिया सुळे (Supriya Sule), खासदार अमोल कोल्हे आणि आमदार रवींद्र धंगेकर (Ravindra Dhangekar) एकत्र आले होते. या तीनही उमेदवारांनी महात्मा फुले यांना अभिवादन केले. यानंतर पत्रकारांशी संवाद साधताना राज्य आणि देशातील कृषी समस्यांवर बोलताना अमोल कोल्हे यांनी भाजपावर जोरदार टीका केली.

डॉ. अमोल कोल्हे म्हणाले, केंद्र सरकारच्या चुकीच्या धोरणांमुळे शेतकरी पिचला आहे. महात्मा फुले यांनी १८८३ मध्ये शेतकऱ्याच्या अवस्थेचे एवढे प्रभावी व वास्तवदर्शी चित्रण केले आहे, त्याला तोड नाही. वर्तमानात यात किंचितही बदल झालेला नाही. त्यामुळे या चुकीच्या शेती विषयक धोरणांच्या विरोधात हाच आसूड उगारण्याची वेळ आली आहे.

अमोल कोल्हे म्हणाले, महात्मा फुले यांनी लिहिलेल्या शेतकऱ्याचा आसूड या ग्रंथात शेतकऱ्याच्या विदारक स्थितीचे चित्रण करून त्याच्या विकासाचा मार्गही सांगितला. सध्या कांदा, सोयाबीन, दूध उत्पादक शेतकऱ्यांचे केंद्र सरकारच्या चुकीच्या धोरणामुळे मोठे नुकसान होत आहे. अल्पभूधारक शेतकरी नागवला जात आहे. त्याविरोधात आवाज उठवणे, शेतकऱ्यांना न्याय मिळवून देणे हेच महात्मा फुले यांना अभिवादन ठरेल.

पाच वर्षात पाच पक्ष बदल्यामुळे शिरुर लोकसभा मतदार संघ बदनाम झाला, अशी टीका महायुतीचे उमेदवार
शिवाजीराव आढळराव पाटील यांनी केली होती. त्यांना प्रत्युत्तर देताना अमोल कोल्हे म्हणाले, कदाचित त्यांच्या
समोर आरसा असेल आणि मी त्यांना एवढ्याच शुभेच्छा देईल की, गेट वेल सून.
कारण हे सन्माननीय महोदय कांदा निर्यात बंदी, दूध उत्पादक शेतकरी यांच्या बाबत बोलले असते.
तर मला दिलासा मिळाला असता.

डॉ. कोल्हे म्हणाले, बेडूक उड्या मारून विनाकारण टीका करणे, तसेच खोटे बोल पण रेटून बोल अशी विधाने केली जात आहेत.
त्यामुळे मी त्यांचे वय लक्षात घेता, गेट वेल सून मी एवढ्याच शुभेच्छा देईन.

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

Pimpri Chinchwad Crime | पिंपरी : आयपीएल तिकिटांचा काळाबाजार करणाऱ्या दोघांना अटक

Pimpri Chinchwad Crime News | पिंपरी : बॅनर फाडल्याच्या जाब विचारुन तरुणाच्या डोक्यात घातला दगड, 6 जणांवर गुन्हा; एकाला अटक