Amol Kolhe On Shivajirao Adhalrao Patil | केवळ स्वत:च्या व्यवसायासाठी आढळरावांनी संसदेत विचारले 70 पेक्षा जास्त प्रश्न, अमोल कोल्हेंचा गंभीर आणि खळबळजनक आरोप

पुणे : पोलीसनामा ऑनलाईन – Amol Kolhe On Shivajirao Adhalrao Patil | माजी खासदार शिवाजीराव आढळराव पाटील हे उद्योजक असून त्यांचे व्यवसाय संरक्षण खात्याशी निगडित आहेत. त्यामुळे आढळराव पाटील यांनी त्यांचे व्यवसाय सांभाळण्यासाठी संरक्षण खात्याविषयी संसदेत ७० पेक्षा अधिक प्रश्न विचारले आहेत. ते केवळ स्वतःच्या स्वार्थासाठी विचारले, असा खळबळजनक आरोप महाविकास आघाडीचे (Mahavikas Aghadi-MVA) शिरूरमधील (Shirur Lok Sabha) उमेदवार अमोल कोल्हे यांनी केला आहे. ते ओतूर येथे बोलत होते.

अढळराव पाटील यांच्यावर आरोप करताना अमोल कोल्हे पुढे म्हणाले, संरक्षण विभाग कोणते सॉफ्टवेअर कधी खरेदी करणार? कोणते कंत्राट कधी निघणार? अशा प्रकारचे प्रश्न विचारून कोणत्या कंपनीचा फायदा करण्यासाठी हे प्रश्न विचारले, त्यामुळे कोणत्या कंपनीला फायदा झाला. याची माहिती घेतल्यावर समजले की, माजी खासदार आढळराव पाटील केवळ आपला व्यापार करण्यासाठी संसदेत गेले होते.

अमोल कोल्हे यांनी म्हटले की, २०१९ साली जेव्हा मी संसदेत गेलो तेव्हा माहिती घेतली की, यापूर्वी खासदार असलेल्या महोदयांनी नेमके संसदेत कोणते प्रश्न विचारले आहेत. तेव्हा समजले की, काही लोक केवळ आपला व्यवसाय करण्यासाठी संसदेत गेले.

अमोल कोल्हे म्हणाले, शिरुर, जुन्नर, आंबेगाव, खेड या भागात ज्या खात्याचा काहीही संबंध नाही त्या खात्याचे संसदेत प्रश्न मांडण्याचा नेमका हेतू काय असावा, असे म्हणत डॉ. कोल्हे आढळरावांच्या हेतुवर शंका उपस्थित केली.

ते म्हणाले, संसदेत सामान्य जनतेचे आणि सर्वसामान्य शेतकऱ्यांचे प्रश्न मांडण्याची आवश्यकता असताना मात्र केवळ व्यापार करण्यासाठी माजी खासदार संसदेत गेले होते.

अजित पवारांना सवाल करताना अमोल कोल्हे म्हणाले, माझ्यासारख्या कार्यकर्त्याने शेतकऱ्यांचे प्रश्न मांडले, बिबट्यांचा शेतकऱ्यांना होणारा त्रास यावर आवाज उठवला, ही चूक केली का?

ते पुढे म्हणाले, माझ्यासारख्या लहान कार्यकर्त्याला पाडण्याची भाषा करणाऱ्या अजित पवारांना जर मर्दुमकी दाखवायची असेल तर ती दिल्लीत दाखवावी, आणि शेतकऱ्यांचे प्रश्न सोडवावेत. सर्वांना आव्हान द्या, पण बापाला आव्हान द्यायचे नसते, असेही कोल्हे म्हणाले.

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

Ajit Pawar Vs Sharad Pawar | एकेकाळी मी शरद पवारांना दैवत मानायचो, आता मी वेगळा मार्ग स्वीकारलाय : अजित पवार

Cheating Fraud Case Pune | पुणे : कंन्स्ट्रक्शन कंपनीत अपहार करुन 97 लाखांची फसवणूक, चार जणांवर FIR

Sanjay Kakade | संजय काकडे प्रचारात सक्रिय, म्हणाले ”पुण्याची जागा आम्हीच जिंकणार”, मुरलीधर मोहोळांचे बळ आणखी वाढले