Amravati ACB Trap | 30 हजाराची लाच घेताना उपविभागीय अभियंता अ‍ॅन्टी करप्शनच्या जाळ्यात

अमरावती : पोलीसनामा ऑनलाइन – कामांचे देयक मंजूर करण्यासाठी 30 हजार रुपयांची लाच घेताना (Accepting Bribe जिल्हा परिषदेच्या (Zilla Parishad) बांधकाम विभागाच्या दर्यापूर येथील उपविभागीय अभियंत्यास (Sub-Divisional Engineer) अमरावती लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने (Amravati ACB Trap) सापळा रचून रंगेहाथ पकडले. अमरावती एसीबीच्या युनिटने (Amravati ACB Trap) ही कारवाई गुरुवारी (दि.7) दुपारी जिल्हा परिषदेतील बांधकाम विभागातील कार्यकारी अभियंता यांच्या दालनात केली. तेजकुमार वसंतराव येवले Tejkumar Vasantrao Yevale (वय- 57) असे लाच घेताना अटक करण्यात आलेल्या उपविभागीय अभियंत्याचे नाव आहे.

याबाबत मूर्तिजापूर येथील 63 वर्षाच्या व्यक्तीने अमरावती लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे (Amravati ACB Trap) तक्रार केली आहे. तक्रारदाराच्या कंत्राटदार मुलाने जिल्हा परिषद बांधकाम उप विभाग, दर्यापूर अंतर्गत नांदरुन येथील समाजिक सभागृह आणि नाचोना येथील रस्ता डांबरीकरणाचे काम केले आहे. या दोन्ही कामांचे 16 लाख 88 हजार 999 रुपयांचे बिल मंजूर करण्यासाठी दर्यापूर येथील उपविभागीय अभियंता तेजकुमार येवले यांनी त्यांच्याकडे 55 हजार रुपये लाच मागितली. पहिला हप्ता म्हणून 30 हजार रुपये मागितले. याबाबत कंत्राटदारांच्या वडिलांनी अमरावती एसीबीकडे तक्रार केली.

अमरावती एसीबी युनिटने प्राप्त तक्रारीची मंगळवारी (दि.4) पंचासमक्ष पडताळणी केली असता तेजकुमार येवले यांनी 55 हजार रुपये लाच मागून पहिला हप्ता म्हणून 30 हजार रुपये लाच मागितल्याचे निष्पन्न झाले.
गुरुवारी दुपारी जिल्हा परिषदेतील कार्यकारी अभियंता यांच्या कार्यालय परिसरात सापळा रचला.
कंत्राटदाराकडून 30 हजार रुपये लाच घेताना तेजकुमार येवले यांना रंगेहाथ पकडण्यात आले.
येवले याच्याविरुद्ध गाडगे नगर पोलीस ठाण्यात (Gadgenagar Police Station) गुन्हा (FIR) दाखल करण्यात आला आहे.

ही कारवाई लाचलुचपत प्रतिबंधक विभाग, अमरावती परिक्षेत्र (Amravati Region)
पोलीस अधिक्षक विशाल गायकवाड (SP Vishal Gaikwad), अपर पोलीस अधीक्षक अरुण सावंत
(Addl SP Arun Sawant),
देविदास घेवारे (Addl SP Devidas Gheware), पोलीस उपअधीक्षक संजय महाजन
(Deputy Superintendent of Police Sanjay Mahajan), शिवलाल भगत
(Deputy Superintendent of Police Shivlal Bhagat) यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक केतन मांजरे (Police Inspector Ketan Manjare), अमोल कडु (Police Inspector Amol Kadu),
पोलीस नाईक विनोद कुंजाम, पोलीस शिपाई शैलेश कडु, रोशन खंडारे चालक पोलीस उपनिरीक्षक सतीश किटूकले यांच्या पथकाने केली.

Web Title :- Amravati ACB Trap | Sub Divisional Engineer in anti-corruption net while taking bribe of 30 thousand

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

IND vs PAK आज होणार सामना, कधी आणि कुठे होणार मॅच, जाणून घ्या

Eknath Shinde Vs Shivsena Uddhav Thackeray | ‘धनुष्यबाण’ कोणाचे? अ‍ॅड. उज्ज्वल निकम यांनी दिले महत्वाचे संकेत, निकाल देताना आमदार, खासदारांची संख्या, प्रतिज्ञापत्रांचाही विचार होणार का?