Anand Paranjpe On Vijay Shivtare | अजितदादांवरील शिवतारेंच्या टीकेनंतर राष्ट्रवादीच्या नेत्याचा थेट मुख्यमंत्र्यांना इशारा, नेत्यांना आवरा अन्यथा कल्याणमध्ये…

मुंबई : Anand Paranjpe On Vijay Shivtare | महायुतीमध्ये सध्या जागावाटपावरून आव्हान-प्रतिआव्हान, आरोप-प्रत्यारोप सुरू आहेत. काल शिवसेना शिंदे गटाचे (Eknath Shinde Group) नेते विजय शिवतारे यांनी अजित पवार यांच्यावर जोरदार टीका केली होती. आता या टीकेला राष्ट्रवादी अजित पवार गटाचे (Ajit Pawar NCP) ठाण्यातील नेते आनंद परांजपे यांनी थेट मुख्यमंत्र्यांना इशारा दिला आहे.

अन्यथा कल्याण लोकसभेवर वेगळा निकाल लागू शकतो, असे म्हणत परांजपे यांनी कल्याण मतरदारसंघात एकनाथ शिंदेंचे पुत्र श्रीकांत शिंदे यांचा पराभव करण्याचा थेट इशारा दिला आहे.

लोकसभा निवडणुकीत बारामतीतून अपक्ष उमेदवार म्हणून निवडणूक लढणार, असा इशारा विजय शिवतारे यांनी दिला होता. यावर आनंद परांजपे म्हणाले, मुख्यमंत्री शिंदे यांना विनंती आहे, त्यांनी आपल्या नेत्यांना आवरावे. अन्यथा आम्ही राष्ट्रवादीचे स्वाभिमानी कार्यकर्ते आहोत. कोणाला वाटत असेल की कल्याण लोकसभा जिंकणे खूप सोपे आहे. तर राष्ट्रवादीचा कार्यकर्ता वेगळा निकाल कल्याण लोकसभेवर लावू शकतो.

आनंद परांजपे म्हणाले, महायुतीचे उमेदवार ठाणे, कल्याण, भिवंडी मतदारसंघातून विक्रमी मतधिक्याने निवडून
आले पाहिजेत. मात्र, विजय शिवतारे वैयक्तिक अजेंडा चालवत असतील तर मुख्यमंत्र्यांनी त्यांना योग्य ती समज
दिली पाहिजे. महायुतीत चांगले वातावरण राहण्यासाठी मुख्यमंत्र्यांनी वाचाळवीर विजय शिवतारेंना समज द्यावी.
आमच्या शक्तिस्थळावर आघात करत केल्यास राष्ट्रवादीचे स्वाभिमानी कार्यकर्ते कल्याण लोकसभेवर वेगळे चित्र
निर्माण करू शकतात.

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

Pune Rural Police | पौड पोलिसांकडून गावठी हातभट्टी दारूच्या अड्डयावर मोठी कारवाई, अड्डा उध्वस्त (Video)

Pune Crime News | पुण्यात घरफोडीचे सत्र सुरुच, वानवडी परिसरात 29 लाखांचा ऐवज लंपास

Sanjay Raut On Vasant More | वसंत मोरेंना राऊतांचा सल्ला, वॉशिंग मशिनच्या दिशेने जाऊ नये, प्रकाश आंबेडकरांना म्हणाले…