Andheri By Election| “तुम्ही राजीनामा स्वीकारत आहात किंवा नाही”, हे दुपारी दोन पर्यंत सांगा – उच्च न्यायालयाचे आयुक्तांना निर्देश

मुंबई – अंधेरी पोटनिवडणुकीसाठी (Andheri By Election) शिवसेनेचे दिवंगत आमदार रमेश लटके (Ramesh Latke) यांच्या पत्नी ऋतुजा लटके (Rutuja Latke) यांना शिवसेनेच्या ठाकरे गटाने उमेदवारी दिली आहे. परंतु लटके या महापालिकेते नोकरीस असल्याने त्यांनी राजीनामा (Resign) देणे प्राप्त होते. त्यानुसार त्यांनी त्यांचा राजीनामा आयुक्तांकडे दिला आहे. तसेच नियमानुसार त्यांनी एक महिन्याचे वेतन कोषागारात जमा देखील केले आहे. पण त्यांच्या राजीनाम्याच्या कार्यवाहीस विलंब होत आहे. महापालिका आयुक्त (Municipal Commissioner) इक्बाल चहल (Iqbal Chahal) यांनी यासाठी 30 दिवसांचा कालावधी लागणार असल्याचे कळविले. निवडणुकीसाठी अर्ज दाखल करण्याची तारीख जवळ येत असून त्यांचा राजीनामा तात्काळ मंजूर करुन घेतला गेला पाहिजे, यासाठी शिवसेनेने (Shivsena) न्यायालयात धाव घेतली आहे. मुंबई उच्च न्यायालयाने (Mumbai High Court) गुरुवारी दुपारी या याचिकेवर सुनावणी केली आहे.

यावेळी न्यायमूर्ती नितीन जमादार (Justice Nitin Jamadar) यांच्या खंडपीठाने पालिका आयुक्त इक्बाल चहल यांना उत्तर देण्यासाठी तासाभराचा अवधी देऊ केला आहे. “तुम्ही राजीनामा स्वीकारत आहात किंवा नाही”, हे दुपारी दोन पर्यंत सांगा, असे निर्देशच न्यायलयाने दिले आहेत. त्यामुळे आता चहल यांच्या भूमिकेकडे सर्वांच्या नजरा लागल्या आहेत.

पालिका आयुक्त इक्बाल चहल हे शिंदे फडणवीस सरकारच्या (Shinde Fadnavis Government)
दबावाखाली काम करत असल्याचा आरोप शिवसेनेच्या उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांच्या गटाने केला होता.
ऋतुजा लटके या तृतीय क्षेणीतील कर्मचारी आहेत. त्यांनी दिलेला राजीनामा सह आयुक्त देखील मंजूर करु शकतात.
तरी देखील त्यांची फाईल आयुक्तांकडे कशी काय गेली? दुसरी गोष्ट आयुक्तांना सर्व कागदपत्रे आणि एक महिन्याचे वेतन यांची पूर्तता केली असताना त्यांना राजीनामा स्वीकारण्यासाठी वेळ का लागत आहे?
आयुक्त आपल्या विशेष अधिकारांत त्यांचा राजीनामा स्वीकारु शकतात, तरी देखील ते तसे करत नाहीत,
असा आरोप शिवसेनेच्या ठाकरे गटाने केला आहे.

Web Title – Andheri By Election | andheri bypoll are you accepting rutuja latke resignation or not bombay high court asks bmc commissioner iqbal singh chahal

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा