Anil Deshmukh | बडतर्फ सहाय्यक पोलिस निरीक्षक सचिन वाझे वसुलीची रक्कम देशमुखांच्या PA ला दयायचा; ईडीचा दावा

मुंबई न्यूज : पोलीसनामा ऑनलाइन (Policenama Online) –  ईडीने (ED) मंगळवारी मुंबई उच्च न्यायालयाला (Mumbai High Court) अनिल देशमुख (Anil Deshmukh) यांचे खाजगी सचिव संजीव पलांडे आणि देशमुख यांचे पीए कुंदन शिंदे यांच्या जबाबाच्या आधारावर पुन्हा एकदा निलंबित सचिन वाझेचे जबाब नोंदविण्यासाठी विशेष एनआयए न्यायालयात याचिका करण्यात आल्याची माहिती दिली. त्या याचिकेवर गुरुवारी सुनावणी होणार असून या याचिकेत सचिन वाझे (Sachin Waze) कडून वसुलीची रक्कम अनिल देशमुखांच्या वतीने कुंदन शिंदे (Kundan Shinde) घेत असल्याचा असा दावा ईडीने केला आहे. anil deshmukh pa instrumental in collecting cash from sachin waze says

Join our Whatsapp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

ईडीने आणखी एक आरोप केला असून वाझे, DCP राजू भुजबळ आणि ACP संजय पाटील यांच्याशी मुंबईतील ‘ऑर्केस्ट्रा बार’ मालकांकडून पैसे गोळा करण्यासाठी आणि शिंदे यांच्याकडे सुपूर्द करण्यासाठी पालंडे यांनी समन्वय साधला होता. वाझेने डिसेंबर २०२० ते फेब्रुवारी २०२० दरम्यान ४.७ कोटी रुपये जमा केले होते आणि ती रक्कम शिंदे यांच्याकडे दिली होती, असाही आरोप पलांडे यांच्यावर करण्यात आला आहे. तत्कालीन गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावतीने शिंदे हे वसुलीची रक्कम गोळा करण्यात म्हणजे वाझेकडून घेण्यात महत्त्वाची भूमिका बजावत असल्याचे स्पष्ट झाले आहे. याबाबत दोन पोलीस अधिकाऱयांचा जबाब नोंदवला असून वाझेनेही या दुजोरा दिला आहे, असे याचिकेत नमूद करण्यात आले आहे. या दोघांची कोठडी घेताना न्यायालयात ईडीने दावा केला होता कि, पोलिस अधिकाऱ्यांच्या आणि विशेषत: आयपीएस पोलिसांच्या बदल्यांमध्ये देशमुखांचा सहभाग होता. बदल्यांबद्दल चर्चा करण्यासाठी एक बैठक आयोजित करण्यात आली होती त्यामध्ये एक अनधिकृत यादी हि तयार करण्यात आल्याचे पालंडे यांनी आपल्या जबाबात म्हटल्याचे ईडीने सांगितले होते.

Web Title : anil deshmukh pa instrumental in collecting cash from sachin waze says

Join our Whatsapp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

Anti Corruption Bureau । 2 हजारांची लाच घेताना पोलिस कर्मचारी अ‍ॅन्टी करप्शनच्या जाळ्यात

Modi Cabinet Expansion | मोदी मंत्रिमंडळाच्या विस्तारापुर्वीच मोठी खळबळ ! केंद्रीय शिक्षण मंत्री रमेश पोखरियाल निशंक यांचा राजीनामा

Shivsena | फडणवीसांच्या काळात काँग्रेस-राष्ट्रवादीच्या 19 आमदारांचे निलंबन झाले त्यावेळी सामूहिक हत्याकांड वाटलं नव्हतं का? – शिवसेना