Bachchu Kadu | बच्चू कडूंचा सरकारला घरचा आहेर! म्हणाले, ”पंतप्रधान आवास योजनेत दुजाभाव, ग्रामीण भागावर अन्याय…”

अहमदनगर : Bachchu Kadu | पंतप्रधान आवास योजनेत (Pradhan Mantri Awas Yojana) शहरासाठी अडीच लाख व मागेल त्याला घर दिले जाते. पण तीच योजना गावात अटी घालून फक्त सव्वा लाखात दिली जाते. हा अपमान आहे. आम्ही अशा फाटक्या घराला मोदींचे पोस्टर लावले. हा असा अन्याय का? आमच्या मतांची किंमत तर सारखीच आहे, असे म्हणत आमदार बच्चू कडू (Bachchu Kadu) यांनी पंतप्रधान आवास योजनेतील दुजाभाव निदर्शनास आणत सरकारवर (CM Eknath Shinde Government) नाराजी व्यक्त केली.

बच्चू कडू म्हणाले, लोकशाहीत अशा प्रकारची विषमता निर्माण केली जात असेल तर ती आम्ही मांडणार. मग सत्तेतून बाहेर काढले तरी चालेल. त्याची पर्वा करत नाही. मी सत्तेत गेलो नव्हतो. त्यांचेच फोन आले होते. मी त्याचा विचार करत नाही. बच्चू कडू असा आहे. पटत असेल तर ठेवा नाहीतर नका ठेवू.

बच्चू कडू म्हणाले, आज कांद्याचे भाव पडले, उसाचे भाव पडले, कापसाला, सोयाबीनला भाव नाही.
मग असे म्हणायला काही हरकत नाही की आमच्या शेतमालाला कुणीच भाव दिला नाही, त्यामुळे आम्ही तुम्हाला मत
देत नाही. अशी हिंमत आहे का शेतकऱ्यांमध्ये? तेवढा एक बोर्ड लावायचा.

राज्य सरकारवर टीका करताना बच्चू कडू म्हणाले, आम्ही मत देणार नाही असे शेतकऱ्यांनी म्हणावे.
आंदोलन करण्याची गरज नाही. जातीचे प्रश्न ज्या पद्धतीने सरकारने हाताळले, त्या पद्धतीने शेतकऱ्यांचे प्रश्न हाताळले जात नाहीत.

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

दर महिन्याला 8-9 टक्के परताव्याचे आमिष दाखवून 70 लाखांची फसवणूक, कोंढव्यातील सलमान शिरोळकर याच्यावर MPID

सॉफ्टवेअर इंजिनिअर महिलेला ड्रग्जचे पार्सल पाठविल्याची भिती दाखवून तिच्या नावावर काढले १९ लाखांचे कर्ज; सायबर चोरट्यांचा फसवणुकीचा नवा प्रकार

‘माझ्याकडे का बघतो’ तरुणाला दगडाने मारहाण, ताडीवाला रोड येथील प्रकार

Pune News | ज्ञान-भक्ती -संस्कृतीचा पुण्यात अनोखा महोत्सव ! 5 फेब्रुवारीपासून चार दिवस श्री श्री रविशंकर पुणे दौऱ्यावर

Digital Media Sampadak Patrakar Sanghatana | प्रिंट मिडिया प्रमाणे डिजिटल मिडियाला राजमान्यता देऊन पत्रकारांच्या कल्याणासाठी सर्वतोपरी सहकार्य करणार – उपमुख्यमंत्री अजित पवार