Baramati Lok Sabha Election 2024 | खडकवासला विधानसभा मतदारसंघातील मतदान केंद्रांना साहित्याचे वितरण

पुणे : पोलीसनामा ऑनलाईन – बारामती लोकसभा मतदारसंघांतर्गत (Baramati Lok Sabha Election 2024) खडकवासला विधानसभा मतदारसंघातील (Khadakwasla Vidhan Sabha) मतदान केंद्रांना मतदानासाठी आवश्यक असणाऱ्या साहित्याचे वितरण सहायक निवडणूक निर्णय अधिकारी संजय आसवले (Sanjay Asawale) यांच्या मार्गदर्शनाखाली वडगाव बुद्रुक येथील स्प्रिंग डेल स्कूलच्या मैदानात करण्यात आले.(Baramati Lok Sabha Election 2024)

बारामती लोकसभा मतदार संघातील मतदान ७ मे रोजी सकाळी ७ ते सायंकाळी ६ वाजेपर्यंत होणार आहे. निवडणूक साहित्याचे वाटप करण्यासाठी स्वतंत्र पथके तयार करण्यात आली होती. मतदान प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर हे साहित्य जमा करून घेतले जाणार असून स्वीकृतीचे कामही वडगाव बुद्रुक येथील स्प्रिंग डेल स्कूलच्या मैदानात होणार आहे.

साहित्य वाटप करण्याकरीता व स्वीकृतीसाठी १०० कर्मचारी तसेच नियंत्रण पथक नियुक्त करण्यात आले आहे. साहित्य वाटपासाठी नेमणूक करण्यात आलेल्या कर्मचाऱ्यांनी सकाळपासून ५३ टेबलद्वारे मतदान केंद्रनिहाय साहित्य वाटप कामकाजाला सुरुवात केली. नेमून दिलेल्या मतदान केंद्रावरील कर्मचाऱ्यांची हजेरी घेऊन मतदान केंद्राचे साहित्य मतदान केंद्राध्यक्ष व संबंधित मतदान अधिकारी यांच्या ताब्यात देण्यात आले. याबाबतची नोंद साहित्य वाटप नोंदवहीत घेण्यात आली.

मतदान केंद्रनिहाय मतदान केंद्राध्यक्ष आणि सहायक मतदान केंद्राध्यक्षांकडे ईव्हीएम म्हणजेच बॅलेट युनिट, कंट्रोल युनिट आणि व्हीव्हीपॅट यंत्र, आवश्यक साहित्य तसेच मतदान प्रक्रियेविषयीचे विविध पाकीटे आणि लिफाफे आदी साहित्य सुपूर्द करण्यात आले.

मतदान साहित्य ताब्यात घेतल्यानंतर नेमून दिलेल्या मतदान केंद्रावर पोहोचण्यासाठी वाहतुकीची सुविधा उपलब्ध करुन देण्यात आली आहे. त्यामध्ये १२९ बसेस आणि ५३ जीपची व्यवस्था करण्यात आली आहे. कर्मचाऱ्यांच्या सोयीसाठी साहित्य वितरण ठिकाणी वाहतूक व्यवस्थेचा तपशील दर्शनी भागात लावण्यात आला होता.

या मतदार संघामध्ये एकूण ५ लाख ३८ हजार ३१ मतदार असून ५१५ मतदार केंद्रावर मतदान होणार आहे. मतदान प्रक्रियेसाठी सुमारे ३ हजार १९१ अधिकारी-कर्मचारी नियुक्त करण्यात आले आहेत. साहित्य घेवून जाणाऱ्या प्रत्येक बसला पोलीस बंदोबस्त असून जीपीएस प्रणाली अद्यावत ठेवली आहे. अनुपस्थित कर्मचाऱ्यांच्या बदली काम करण्यासाठी सुमारे १०० पथके राखीव ठेवण्यात आली आहेत.

खडकवासला विधानसभा मतदारसंघात निश्चित केलेल्या मतदान केंद्रांवर वेब कास्टिंगची तयारी पूर्ण झाली आहे. मतदानाच्या अनुषंगाने निवडणूक विभागामार्फत निवडणूक विषयक कामकाजासाठी नेमण्यात आलेल्या क्षेत्रीय (सेक्टर) अधिकारी, मतदान केंद्राध्यक्ष, मतदान अधिकारी तसेच सहायक यांना मतदानाच्या दिवशी प्रत्यक्ष करावयाच्या कामकाजाबाबत तसेच साहित्य वितरणापूर्वी कर्मचाऱ्यांना विहीत नमुन्यातील माहिती भरताना घ्यावयाची काळजी, ईव्हीएम यंत्रातील तांत्रिक अडचणी कशा दूर कराव्यात, साहित्य स्वीकारताना व जमा करताना काय काळजी घ्यावी याबाबत श्री.आसवले यांनी सविस्तर मार्गदर्शन करण्यात केले.

प्रत्येक केंद्राच्या ठिकाणी पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला असून कायदा व सुव्यवस्था अबाधित ठेवण्यासाठी पोलीस यंत्रणा सज्ज ठेवण्यात आली आहे. लोकसभा निवडणुक मतदानाच्या अनुषंगाने खडकवासला विधानसभा मतदारसंघात सर्व तयारी पूर्ण झाली असून ही निवडणूक मुक्त, निर्भय व पारदर्शक वातावरणात पार पाडण्यासाठी निवडणूक यंत्रणा सज्ज आहे.

मतदानाच्या दिवशी प्रत्येक कर्मचाऱ्याने जबाबदारीने काम पार पाडावे. कोणत्याही प्रलोभनाला बळी न पडता या मतदार संघातील प्रत्येक मतदाराने आपला मतदानाचा अधिकार बजावावा, असे आवाहन सहायक निवडणूक निर्णय अधिकारी संजय आसवले यांनी केले आहे.

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

Sharad Pawar Health Update | शरद पवारांना प्रकृती अस्वास्थामुळे आरामाचा सल्ला, प्रचाराची झाली दगदग, रोहित पवारांनी दिली प्रकृतीची अपडेट

Lok Sabha Election 2024 | तरूणाईने आदर्श घ्यावा असे 102 वर्षांचे आजोबा, लोकसभेसाठी 17 व्या वेळी करणार मतदान, 1952 साली केले पहिले मतदान