Baramati Lok Sabha Election 2024 | बारामती लोकसभा मतदार संघात मतदार जागृती उपक्रमांचे आयोजन

पुणे : पोलीसनामा ऑनलाईन – Baramati Lok Sabha Election 2024 | आगामी लोकसभा सार्वत्रिक निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मतदानाची टक्केवारी वाढविण्याकरीता बारामती लोकसभा मतदारसंघात बारामती (Baramati Vidhan Sabha), इंदापूर (Indapur Vidhan Sabha), खडकवासला (Khadakwasla Vidhan Sabha), दौंड (Daund Vidhan Sabha), भोर (Bhor Vidhan Sabha) आणि पुरंदर विधानसभा मतदारसंघात (Purandar Vidhan Sabha) विविध ठिकाणी मतदारांना मतदार यादीत नाव शोधण्यासह निवडणूक प्रक्रीयेची माहिती देण्यात आली.

इंदापूर येथे मतदार जागृती मंचाच्यावतीने क्युआर कोडद्वारे मतदार यादीत नाव शोधण्याची माहिती देण्याकरीता जिल्हा परिषद शाळा (ZP School Indapur) इंदापूर क्र.१ व २ येथे शिबीर आयोजित करण्यात आले. यावेळी विस्तार अधिकाऱ्यांनी मतदारांना क्युआर कोडबाबत प्रात्यक्षिकासह माहिती दिली. मतदार व त्यांच्या परिचयातील शिक्षक व पालकांना मतदान करण्याचे आवाहन केले.(Baramati Lok Sabha Election 2024)

बारामती विधानसभा मतदारसंघात पियाजियो कंपनीतील सुमारे तीनशेपेक्षा अधिक अधिकारी व कर्मचाऱ्यांनी मतदान करण्याबाबत प्रतिज्ञा घेतली. यावेळी निवडणूकीत मतदान करण्याबाबत आवाहन करण्यात आले.

खडकवासला विधानसभा मतदारसंघात वडगाव बुद्रुक येथे महिला बचत गटाच्यावतीने विठ्ठल मंदिर येथे मतदान करण्याविषयी जनजागृती करण्यात आली. यावेळी महिला मतदारांनी मतदान करण्याबाबत प्रतिज्ञा घेतली.

दौंड विधानसभा मतदारसंघात यवत (Yavat) आणि दहिटने (Dahitane) येथे अंगणवाडी स्तरावर गृहभेटीचे आयोजन करुन महिला मतदारांना मतदान प्रक्रीयेची माहिती देऊन मतदानाचे आवाहन करण्यात आले. अंगणवाडी सेविका आणि महिला मतदार यांनी मतदान करण्याबाबत प्रतिज्ञा घेतली.

भोर विधानसभा मतदारसंघात अरिहंत महाविद्यालय बावधन (Arihant College Bavdhan) येथे मतदार जनजागृती करण्यात आली.
यावेळी मुळशी पंचायत समितीचे (Mulshi Panchayat Samiti) विस्तार अधिकारी, शिक्षक आणि ९२ विद्यार्थी उपस्थित होते.
कार्यक्रमांतर्गत रांगोळी स्पर्धेसोबतच मतदान करण्याबाबत प्रतिज्ञा घेण्यात आली.

अनंतराव पवार महाविद्यालयाच्या (Anantrao Pawar College) विद्यार्थी व शिक्षकांनी पिरंगुट बसस्थानक चौक येथे मतदार जनजागृती फेरीचे आयोजन केले.
यावेळी सुमोर १५० पेक्षा अधिक विद्यार्थी-पालक उपस्थित होते.
पुरंदर विधानसभा मतदार संघात माळवाडी (वाल्हे) तालुका पुरंदर येथे मतदार जनजागृती कार्यक्रम अंतर्गत
मतदान करण्याची प्रतिज्ञा घेण्यात आली.

आगामी लोकसभा सार्वत्रिक निवडणुकीच्या प्रलोभनाला बळी न निर्भयपणे मतदानाचा हक्क बजावावा.
परिसरातील इतरही पात्र नागरिकांना मतदान करण्याबाबत प्रोत्साहित करावे, असे आवाहन निवडणूक प्रशासनाच्यावतीने करण्यात आले.

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

Pune Cheating Fraud Case | नोकरी लावण्याच्या बहाण्याने पुण्यात युवकाला 28 लाखांचा गंडा, दाम्पत्यावर FIR

Pune Traffic Police Action On Modified Silencers | ‘बुलेट राजा’वर वाहतूक शाखेची वक्र दृष्टी! 619 बुलेट वर कारवाई, कर्कश आवाजाचे सायलेन्सर जप्त