Barsu Refinery Survey | बारसूतील राड्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया, म्हणाले-‘बाहेरची माणसं आणून परिस्थिती…’

रत्नागिरी : पोलीसनामा ऑनलाइन – रत्नागिरीतील राजापूर तालुक्यातील बारसू येथे रिफायनरी प्रकल्प (Barsu Refinery Survey) होत आहे. या प्रकल्पाला स्थानिक नागिरकांकडून विरोध होत असून बारसूमध्ये वातावरण तापलेलं पाहायला मिळत आहे. शुक्रवारी आंदोलक आपल्या आंदोलनावर (Barsu Refinery Survey) ठाम असताना आंदोलक आक्रमक झाल्याचे पाहायला मिळाले. सर्वेक्षणाच्या ठिकाणी जाण्याचा प्रयत्न करणाऱ्या आंदोलकांना (Barsu Refinery Agitation) आडवताना पोलीस आणि आंदोलकांमध्ये झटापट झाली. यावेळी पोलिसांनी लाठी चार्ज (Lathi Charged) करुन अश्रु धुराच्या (Tear Gas) नळकांड्या फोडल्या.

बारसूतील या झटापटीबाबत उद्योगमंत्री उदय सामंत (Industries Minister Uday Samant) म्हणाले, बारसूमध्ये (Barsu Refinery Survey) तणाव निर्माण झाला आहे. मात्र ही परिस्थिती निर्माण करण्यामागे नेमकं कोण आहे, याचा शोध घेतला पाहिजे. कालपर्यंत तेथील प्रकल्पग्रस्त सरकारशी चर्चा करण्यासाठी तयार होते. आजही त्यांच्याशी सकारात्मक चर्चा सुरु होती. मात्र आज बाहेरची माणसं आणून ही परिस्थिती चिघळवण्यात आल्याचा आरोप उदय सामंत यांनी केला.

उदय सामंत पुढे म्हणाले, सकाळी खासदार विनायक राऊत (MP Vinayak Raut) हे देखील मोर्चा काढण्याच्या तयारीत होते. त्यामुळे प्रतिबंधात्मक कारवाई (Preventive Action) म्हणून त्यांच्यावर कारवाई करण्यात आली.
मात्र, त्यांच्याच पावलावर पाऊल ठेऊन आता ग्रामस्थांनी मोर्चा काढला.
बारसूतील ग्रामस्थांनी कोणत्याही पक्षीय राजकारणाला बळी पडू नये. त्यांच्या ज्या शंका असतील त्या दूर
करण्यासाठी सरकार तयार आहे. त्यामुळे ग्रामस्थांनी चर्चा करावी, असे आवाहन उदय सामंत यांनी केलं.

माझी मुख्यमंत्र्यांशी चर्चा झाली आहे. मुख्यमंत्र्यांनी (CM) मला सांगितले आहे की आपण चर्चेसाठी तयार आहोत.
प्रकल्पाला विरोध का आहे हे समजून घेऊ. मातीचे परिक्षण झाले म्हणजे आज उद्या प्रकल्प येणार नाही.
स्थानिकांचा विरोध कमी होत असताना काही लोकांनी पक्षीय राजकारणाला स्थानिकांचे रुप देऊन हे आंदोलन केले
जात असल्याचे उदय सामंत यांनी सांगितले.

Web Title :-  Barsu Refinery Survey | clashes between police and protesters at barsu in ratnagiri villagers oppose refinery project

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

Maharashtra Prisons Department News | राज्य कारागृह विभागातील 49 अधिकारी, कर्मचार्‍यांना प्रशंसनीय सेवेबद्दल सन्मानचिन्ह व प्रशस्तीपत्र जाहीर ! अप्पर पोलिस महासंचालक अमिताभ गुप्ता यांची घोषणा

Pune BJP Jagdish Mulik On Congress Mallikarjun Kharge | भाजपचे शहराध्यक्ष जगदिश मुळीक यांचे काँग्रेसवर शरसंधान; म्हणाले – ‘गांधी कुटुंबाचे पोपट बोलू लागले’