Beed ACB Trap | अनुदानाच्या चेकवर सरपंच आईची सही घेऊन देण्यासाठी 20 हजार रुपये लाचेची मागणी, मुलावार एसीबीकडून FIR

बीड : पोलीसनामा ऑनलाइन – अनुदानाच्या चेकवर सरपंच आईची सही करुन देण्यासाठी 20 हजार रुपये लाचेची मागणी करणाऱ्या मुलावर बीड लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने (Beed ACB Trap) गुन्हा दाखल केला आहे. सुधाकर नंदू उगलामुगले Sudhakar Nandu Uglamugle (वय -34 रा. नारेवाडी ता.केज जी.बीड) असे गुन्हा (FIR) दाखल करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे. बीड एसीबीच्या (Beed ACB Trap) पथकाने 21 सप्टेंबर 2022 रोजी पडताळणी केली होती.

याबाबत 65 वर्षाच्या व्यक्तीने बीड एसीबीकडे (Beed ACB Trap) तक्रार केली आहे. आरोपी सुधाकर उगलामुगले यांची आई आशाबाई उगलमुगले या नारेवाडी येथील सरपंच आहेत. तक्रारदार यांच्या मुलाच्या नावावर मनरेगा (MANREGA) अंतर्गत मंजुर जलसिंचन विहिरीचे (Irrigation Well) कुशल कामगारांच्या अनुदानाच्या चेकवर सरपंच यांची सही पाहिजे होती. चेकवर सही करुन देण्यासाठी तसेच ग्रामसेवक यांना देण्यासाठी सुधाकर यांनी 20 हजार रुपये लाचेची मागणी (Demand Bribe) केली.

बीड एसीबीच्या पथकाने 21 सप्टेंबर 2022 रोजी पडताळणी केली असता अनुदानाच्या रक्कमेच्या चेकवर
आरोपी यांनी त्यांच्या सरपंच आईची सही घेऊन देण्यासाठी तसेच ग्रामसेवक यांना देण्यासाठी 20 हजार रुपये
लाचेची मागणी करून लाच रक्कम मिळवण्याचा प्रयत्न केला.
याप्रकरणी सुधाकर उगलामुगले याच्यावर भ्रष्टाचार प्रतिबंध कायद्यांतर्गत (Prevention of Corruption Act) गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

ही कारवाई पोलीस अधीक्षक संदीप आटोळे (SP Sandeep Atole), अपर पोलीस अधीक्षक विशाल खांबे
(Addl SP Vishal Khambe), पोलीस उपअधीक्षक शंकर शिंदे (DySP Shankar Shinde)
यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक अमोल धस (Police Inspector Amol Dhas),
पोलीस अंमलदार भरत गारदे, अविनाश गवळी, चालक-गणेश म्हेत्रे यांच्या पथकाने केली.

Web Title :-  Beed ACB Trap | 20,000 rupees bribe demand to get sarpanch’s mother’s signature on subsidy cheque, FIR from Mulawar ACB

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

Rohit Pawar | अनिल देशमुखांची अटक ही त्यांना राजकीय दृष्टीकोनातून अडचणीत आणण्यासाठीचं; आमदार रोहित पवारांचा भाजपवर घणाघात…

Maharashtra Karnataka Border Dispute | मुंबईला केंद्रशासित करा म्हणणाऱ्या कर्नाटकच्या मंत्र्याला देवेंद्र फडणवीसांचे प्रत्युत्तर, म्हणाले- ‘मुंबई कोणाच्या बापाची…’