Best Govt Saving Schemes | जलद रिटर्न आणि टॅक्स बेनिफिट ! ‘या’ 5 सरकारी योजना आहेत बेस्ट! मुलांपासून ज्येष्ठांपर्यंत लाभदायक

नवी दिल्ली : Best Govt Saving Schemes | प्रत्येकाला वाटते की आपल्या कमाईतील काही भागाची बचत करावी. बचत देखील अशी की टॅक्स बेनिफिट (Tax Benefits) सह मजबूत रिटर्न देखील मिळावा. तुम्ही सुद्धा असा इन्व्हेस्टमेंट प्लान करत असाल, तर सरकारद्वारे चालवल्या जाणाऱ्या सर्वोत्तम योजनांचा आढावा घेणे फायदेशीर ठरेल. या सरकारी योजनांमध्ये (Govt Schemes) उत्कृष्ट व्याजासह कर सवलतीचा लाभ मिळतो. यामध्ये नॅशनल सेव्हिंग मंथली इन्कम स्कीम, सीनियर सिटिझन सेव्हिंग स्कीम, पीपीएफ, सुकन्या समृद्धी योजना आणि महिला सन्मान बचत पत्र यांचा समावेश आहे. यासाठी खाते उघडण्याची प्रक्रिया आणि त्यात गुंतवणूक करण्याचे फायदे जाणून घेवूया : (Best Govt Saving Schemes)

पब्लिक प्रॉव्हिडंट फंड (public provident fund)

सरकारच्या या पीपीएफ योजनेत एका आर्थिक वर्षात किमान ५०० रुपये आणि जास्तीत जास्त १,५०,००० रुपये गुंतवले जाऊ शकतात. या योजनेचा मॅच्युरिटी पिरियड १५ वर्षे आहे, जो पाच अतिरिक्त वर्षांसाठी वाढवता येतो. या योजनेत सरकारकडून वार्षिक ७.१ टक्के व्याज दिले जाते आणि त्यात मिळणारे व्याज प्राप्तीकर कलम-१० अंतर्गत करमुक्त आहे. यामध्ये केलेल्या गुंतवणुकीवर 80-C अंतर्गत करलाभ देखील उपलब्ध आहे.

सुकन्या समृद्धी योजना (Sukanya Samriddhi Yojana)

मुलींचे भविष्य सुरक्षित करण्यासाठी, २०१५ मध्ये सुरू झालेल्या SSY या सरकारी योजनेत, वार्षिक किमान २५० रुपये आणि कमाल १.५ लाख रुपये गुंतवणूक करता येते. या अंतर्गत १० वर्षांपेक्षा कमी वयाच्या मुलीचे खाते उघडता येते. यामध्ये, सरकार ८ टक्के दराने व्याज देते आणि गुंतवणूकदारांना ८०-सी अंतर्गत लाभ मिळतो. या योजनेतही, गुंतवणुकीवर मिळणाऱ्या व्याजाची रक्कम प्राप्तीकर कलम-१० अंतर्गत करमुक्त आहे.

नॅशनल सेव्हिंग मंथली इन्कम स्कीम (National Saving Monthly Income Scheme)

राष्ट्रीय बचत मासिक उत्पन्न योजनेत भरघोस रिटर्न आणि कर सवलतींचा लाभ मिळतो. पोस्ट ऑफिसच्या या योजनेत गुंतवणूकदार रु. १,००० च्या पटीत रु. ९ लाखांपर्यंत गुंतवणूक करू शकतात. पाच वर्षांच्या मॅच्युरिटी कालावधीसह या योजनेत वार्षिक ७.४ टक्के दराने व्याज दिले जाते. यासोबतच प्राप्तिकरात सूटही मिळते.

महिला सन्मान बचत प्रमाणपत्र (Mahila Samman Savings Certificate)

महिलांमध्ये ही योजना खूप लोकप्रिय आहे. ही सरकारची एकरकमी स्मॉल सेव्हिंग सकीम आहे.
यामध्ये केलेल्या गुंतवणुकीवर आंशिक पैसे काढण्याची सुविधाही उपलब्ध आहे.
व्याजाबद्दल बोलायचे तर, या योजनेत केलेल्या गुंतवणुकीवर सरकार ७.५ टक्के हमी व्याजदर देते.
यामध्ये गुंतवणूकदार दोन वर्षांच्या कालावधीसाठी महिला किंवा मुलींच्या नावे २ लाख रुपयांपर्यंतची गुंतवणूक करू शकतो.

सीनियर सिटिझन सेव्हिंग स्कीम (Senior Citizens Saving Scheme)

ज्येष्ठांसाठी सर्वोत्कृष्ट सरकारी योजना म्हणजे ज्येष्ठ नागरिक बचत योजना.
या योजनेत जास्तीत जास्त ३० लाख रुपयांची गुंतवणूक करता येते.
सेवानिवृत्त झालेल्या ५५ वर्षांच्या व्यक्ती किंवा ६० वर्षे किंवा त्याहून अधिक वयाच्या व्यक्ती या योजनेअंतर्गत
खाते उघडू शकतात. या सरकारी योजनेत, प्राप्तीकर कलम ८०-सी अंतर्गत कर सवलतीचा लाभ मिळतो. यासोबतच १ एप्रिल २०२३ ते ३० जून २०२३ या कालावधीसाठी सरकारने ८.२० टक्के व्याजदर निश्चित केला आहे.

Web Title :-  Best Govt Saving Schemes | best govt saving schemes for child to senior citizens from ssy to ppf know all details here

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

Jyotiba Phule Jayanti – Chandrakant Patil | महात्मा जोतिराव फुले यांना जयंतीनिमित्त पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांचे अभिवादन

CM Eknath Shinde Threat Call | ‘मी एकनाथ शिंदेंना उडवणार आहे’, मुख्यमंत्र्यांना जीवे मारण्याची धमकी ! पुण्यातून धमकीचा कॉल, मुंबईतील एकजण अटकेत

PM Kisan | १४व्या हप्त्याची मोठी अपडेट! या महिन्यात येऊ शकतात पैसे, तयार ठेवा हे डॉक्‍यूमेंट