Bhumi Pednekar | अभिनेत्री भूमी पेडणेकरची ‘डायमेन्शन्स मुंबई’ या नामवंत लघुपटाच्या स्पर्धेची ब्रँड अ‍ॅम्बेसिडर म्हणून नियुक्ती

पोलीसनामा ऑनलाइन – Bhumi Pednekar | मुंबई हे विविधतेने नटलेले व स्वप्नपूर्ती करणारे जादूई शहर आहे असे म्हटले तर अतिशयोक्ती ठरणार नाही. या शहरात येऊन अनेकांनी आपापली स्वप्ने साकारली आहे. या मुंबई शहराच्या (Mumbai City) विविध पैलूंचे लघुपटाच्या माध्यामातून मांडण्याची संधी ‘डायमेन्शन्स मुंबई’ (Dimensions Mumbai) या सर्धेतून मिळते. 2009 साली जया बच्चन (Jaya Bachchan) यांनी हा नवा उपक्रम सुरू केला होता. यामध्ये देशभरातील तरुण दिग्दर्शकांना लघुपट दिग्दर्शित करण्याची संधी मिळते. यामध्ये लघुपटाचा विषय हा फक्त मुंबई शहरावर असणे बंधनकारक आहे. आता या पुढे या लघुपट स्पर्धेची ब्रँड अ‍ॅम्बेसिडर (Dimensions Mumbai Brand Ambassador) म्हणून अभिनेत्री भूमी पेडणेकर (Bhumi Pednekar) ही काम करणार आहे.

लघुपटांच्या स्पर्धेंमध्ये ‘डायमेन्शन्स मुंबई’ ही स्पर्धा एक मानाची स्पर्धा मानली जाते. यामध्ये वयोगट 18 ते 25 वर्षे तरुण दिग्दर्शकांसाठी ही एक पर्वणीच असते. अनेक लोक या स्पर्धेसाठी उत्सुक असतात. आधी ही स्पर्धा फक्त मुंबईकरांसाठी होती मात्र आता यामध्ये देशभरातील तरुण सहभागी होऊ शकतात. आता या ‘डायमेन्शन्स मुंबई’ लघुपट स्पर्धेसाठी बॉलीवुडमधील एक आघाड़ीची अभिनेत्री भूमी पेडणेकर (Bhumi As Brand Ambassador) हिची निवड करण्यात आली आहे. ती या स्पर्धेमध्ये सहभागी होणाऱ्या तरुण, विचारी व सर्जनशील दिग्दर्शकांशी संवाद साधणार आहे. त्यांना स्पर्धेचे महत्त्व समजावून सांगणार आहे. आणि या सिनेविश्वाची ओळख करुन देणार आहे. भूमी पेडणेकर ही स्वतः मुंबईकर असल्याने तिला या शहराबद्दल जास्त आपुलकी व माहिती आहे.

‘डायमेन्शन्स मुंबई’ या लघुपट स्पर्धेसाठी ब्रॅंड अ‍ॅम्बेसिडर बनल्यानंतर अभिनेत्री भूमी पेडणेकर हिने देखील तिच्या भावना व्यक्त केल्या आहेत. ती म्हणाली की, ‘यावर्षी डायमेन्शन्स मुंबईत सहभागी होताना मला आनंद होत आहे. हे व्यासपीठ तरुण दिग्दर्शकांसाठी उत्तम आहे आणि त्यांच्यासाठी महत्त्वाच्या असलेल्या गोष्टी सांगण्यासाठी पाठिंबा देणारं आहे. उत्तम गुणवत्ता असलेल्या दिग्दर्शकांना मिळणाऱ्या डायमेन्शन्स मुंबईसारख्या व्यासपीठाच्या मदतीने आपल्या गुणवत्तेचा पूर्ण क्षमतेसह वापर करण्याची संधी मिळेल. एक मुंबईकर या नात्याने मला कायमच या शहराची भुरळ पडली आहे. या दिग्दर्शकांशी संवाद साधण्यासाठी मी उत्सुक आहे. माझ्यामुळे त्यांच्या कौशल्यावर सकारात्मक प्रभाव निर्माण करता आला, तर मला खरंच आनंद होईल व त्यासाठी मी नेहमी ऋणी राहीन.” असे मनोगत अभिनेत्री भूमी पेडणेकर हिने व्यक्त केले आहे.

जिओ मामीच्या फेस्टिवल संचालक अनुपमा चोप्रा (Anupama Chopra) यांनी देखील अभिनेत्री भूमी पेडणेकर (Bhumi Pednekar) हिचे कौतुक केले आणि तिचे डायमेन्शन्स मुंबईमध्ये स्वागत केले. अनुमपा म्हणाल्या की. भूमी ही गुणवान व चोखंदळ कलाकार आहे. तिने पदार्पणातील पहिल्याच ‘दम लगा के हैशा’ (Dum Laga Ke Haisha) यामधूनच हिंदी सिनेमाच्या कक्षा रूंदावण्यास सुरुवात केली. तिचे ब्रँड अ‍ॅम्बेसिडर म्हणून असणे हे उत्साह वाढविणारे आहे. लघूपट क्षेत्रासाठी सध्याचा काळ पूरक आहे आणि त्यासाठी भूमीसारख्या सरस अभिनेत्रीशी सहकार्य करताना आम्हाला आनंद होत आहे.” अशा शब्दांत त्यांनी अभिनेत्री भूमी पेडणेकर हिचे कौतुक केले. या नामवंत स्पर्धेसाठी मुंबई शहरावर आधारित 5 मिनिटांचा लघूपट सादर करणे गरजेचे आहे. प्रवेशिका (Dimensions Mumbai Admission Date) स्वीकारण्याची सुरुवात 27 जुलै रोजी सुरू होणार असून शेवटची तारीख 31 ऑगस्ट ही आहे.

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

MNS on Priyanka Chaturvedi | प्रियंका चतुर्वैदींवरील विधानावरुन मनसे संतापली, ‘शिर’साटांना थेट इशारा