Bhumi Pednekar | अखेर भूमीने सांगितला ‘त्या’ सेक्स सीन मागील तिच्या भावना; म्हणाली “हा सिन करताना…….”

पोलीसनामा ऑनलाइन : अभिनेत्री भूमी पेडणेकरने (Bhumi Pednekar) 2018 साली नेटफ्लिक्स वर रिलीज झालेल्या ‘लस्ट स्टोरीज’ या चित्रपटातील तिने साकारलेल्या सेक्स सीन बद्दल भाष्य केले आहे. भूमी नेहमीच तिच्या वक्तव्यामुळे आणि कामामुळे चर्चेत असते. सध्या भूमीने केलेले हे वक्तव्य वायरल होताना दिसत आहे. ‘लस्ट स्टोरीज’ या चित्रपटामध्ये एका भागात भूमी पेडणेकरने (Bhumi Pednekar) देखील भूमिका साकारली होती. या चित्रपटाचे दिग्दर्शन झोया अख्तर हिने केले होते. त्यावेळी भूमीला नील भूपालम यांच्याबरोबर एक सेक्स सीन करायचा होता त्यावेळी मात्र भूमी खूपच नर्वस होती.

भूमीने दिलेल्या एका मुलाखतीत तिने सांगितले की, “हा सिन करताना मी खूप अस्वस्थ होते. कशा पद्धतीने हा सीन पार पडेल याची मला भीती वाटत होती. यावेळी एका रूममध्ये इतकी लोक असताना माझ्या अंगावर कमीत कमी कपडे होते. यावेळी माझ्या मनाच्या भावना होत्या त्याच भावना नीलच्याही मनात होत्या. आमच्या मनातील भावना झोयाने ओळखल्या तिने आम्हाला धीर दिला त्यानंतर मी आणि नीलने एकमेकांशी संवाद साधला. आम्ही आमच्या मर्यादा काय आहेत यावर भाष्य केलं.

असा सीन करत असताना तुमचे दिग्दर्शक आणि सहकलाकारांशी बोलणं तुम्हाला मानसिक बळ देऊन जातं.
जे खूपच जास्त महत्त्वाचे असते”. ‘लस्ट स्टोरीज’ या चित्रपटात भूमी पेडणेकर (Bhumi Pednekar)
व्यतिरिक्त विकी कौशल, कियारा अडवाणी, राधिका आपटे, मनीषा कोयराला हे कलाकार देखील दिसून आले होते.

Web Title :-  Bhumi Pednekar | bhumi pednekar shared her experience of lust stories film

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

MP Sanjay Raut | शिंदे गट शिवसेना भवनाचा ताबा घेणार? संजय राऊत म्हणाले -‘एक बाप असेल तर…’

Election Commission Of India | मतदान प्रक्रियेत होणार मोठा बदल; आता देशात कुठेही करता येणार मतदान