Bibvewadi Gangadham Chowk Pune News | गंगाधाम चौक परिसरातील रस्ते भविष्यात होणार मृत्यूचे जाळे? वाढत्या जड वाहतुकीमुळे तीव्र उतारावर वाहनचालकांचा जीव मुठीत घेउन प्रवास (Videos)

पुणे : पोलीसनामा ऑनलाईन – Bibvewadi Gangadham Chowk Pune News | बिबवेवाडी येथील गंगाधाम चौकाजवळील आईमाता मंदिर ते गंगाधाम चौका दरम्यानच्या तीव्र उताराच्या रस्त्यावर भरधाव डंपरच्या धडकेने दुचाकीवरील महिलेचा मृत्यू झाला तर तिची सून गंभीर जखमी झाली. या घटनेमुळे या परिसरात सुरू असलेल्या मोठ्याप्रमाणावरील बांधकामांच्या ठिकाणी दिवसा बंदी असतानाही डंपरसारख्या वाहनांची बिनदिक्कत वाहतूक सुरू असल्याचे उघडकीस आले आहे. त्याचवेळी भविष्यात याठिकाणी होउ घातलेल्या रस्त्यावरील मोठ्याप्रमाणावरील वाहतुकीच्या गंभीर घटनांचे ‘संकेत’ही मिळाले आहेत.

मार्केटयार्ड (Market Yard Pune) लगतच असलेल्या गंगाधाम चौकातून कात्रज कोंढवा रस्त्याकडे जाण्या येण्यासाठी टेकडीवरून रस्ता विकसित करण्यात आला आहे. अगदी कात्रज कोंढवा रस्ता मार्गे (Katraj Kondhwa Road) वरिल भागातून येणारी वाहने शहरात ये जा करण्यासाठी याच रस्त्याचा वापर करतात. गंगाधाम चौक ते कात्रज कोंढवा रस्त्यापर्यंतच्या सुमारे अडीच कि.मी. रस्त्याच्या दुतर्फा देखिल हिलटॉप हिलस्लोपवर मोठ्याप्रमाणावर निवासी बांधकामे झाली असून व्यावसायीक दुकाने आणि गोदामे देखिल झाली आहेत. अशातच या रस्त्यावर गंगाधाम चौकालगतच शेकडो सदनिकांचे मोठे निवासी संकुल आणि व्यावसायीक संकुलही उभारण्याचे काम वेगाने सुरू आहे.(Bibvewadi Gangadham Chowk Pune News)

यामुळे या रस्त्यावर भविष्यात मोठ्याप्रमाणावर छोट्या वाहनांसोबचत मालवाहतूक वाहनांची वर्दळ वाढणार आहे. यामुळे भविष्यात येथील रस्त्यांवर मोठ्याप्रमाणावर वाहतुकीची कोंडी आणि अपघातांची मालिका पाहायला मिळणार आहे. गंगाधाम चौकाकडून शत्रुंजय मंदिराकडे जाणार्‍या या रस्त्यावर आईमाता मंदिरापर्यंत जाताना तीव्र चढ असून येताना तीव्र उतार आहे. या रस्त्यावर गतिरोधक केला तरी अपघात होतील, एवढा तीव्र उतार आहे. अशातच बांधकामांसाठी खडी, वाळू वाहतूक करणार्‍या वाहनांतून पडणारा राडारोडा आणि पावसाळ्यात पाण्यासोबत वाहून येणार्‍या वाळू व खडीवरुन दुचाकी वाहने घसरून अपघात ही नित्याची बाब झाली आहे. भविष्यात येथील निवासी इमारती आणि व्यावसायीक गाळयांचा वापर सुरू झाल्यास अपघातांची परिस्थिती आणखीनच गंभीर होणार आहे. दुर्देवाने आज झालेल्या अपघातानंतर तरी प्रशासनाचे डोळे उघडतील की नाही? कि आणखी बळींची वाट पाहाणार असा प्रश्‍न उपस्थित करण्यात येत आहे.

पीपीपी तत्वावरील उड्डाणपुल आणि ग्रेड सेपरेटर लोकप्रतिनिधींच्या वादात अडकला!

गंगाधाम चौकातील गृह प्रकल्प आणि होलसेल मार्केटमुळे होणारी संभाव्य वाहतूक लक्षात घेउन महापालिकेने पीपीपी तत्वावर या चौकामध्ये एक उड्डाणपुल आणि ग्रेडसेपरेटर मंजुर केला आहे. तसेच या प्रकल्पांच्या मागील बाजूने बिबवेवाडी कोंढवा रस्त्याने आई माता मंदिराकडे जाण्यासाठी २०५ नुसार रस्त्याची आखणी देखिल केली आहे. उड्डाणपुल आणि ग्रेडसेपरेटरच्या निविदेला मंजुरी देउन दोन वर्षे उलटले आहेत. परंतू बिबवेवाडी कोंढवा रस्त्यावर उड्डाणपुल उभारायचा की मार्केटयार्ड येथील रस्त्यावरून आई माता मंदिराकडे जाणार्‍या रस्त्यावर हा उड्डाणपुल उभारायचा यावरून स्थानीक लोकप्रतिनिधींमध्ये मतभेद आहेत. विशेष असे की हे सर्व लोकप्रतिनिधी एकाच राजकिय पक्षाचे आहेत. या मतभेदांमुळेच मान्यतेनंतरही दोन वर्षांपासून येथील काम रखडल्याची चर्चा स्थानिक नागरिकांमध्ये आहे.

निष्पाप महिलेचा बळी गेला ह्याला जबाबदार कोण – प्रविण चोरबोले, माजी नगरसेवक

मार्केट यार्ड येथील गंगाधाम चौक परिसरात मोठ्या प्रमाणात बांधकामे सुरू आहेत. बांधकाम व्यवसायिकांचे डंपर,ट्रक, मिक्सर तीव्र उतारावरून ये जा करीत असतात व गेटमधून गाड्या बिनधास्तपणे बाहेर काढत असतात. रस्त्यावर अतिशय चिखल खडी वाळू सांडत जातात. यावरून गाड्या घसरतात व मोठी दुर्घटना घडतात. बांधकाम व्यवसायिकांचे सुरक्षा रक्षक गाड्यांना मार्ग दाखवत नाहीत. त्यामुळे वाहन चालक बिनधास्तसपणे गाडी चालवतात. वाहतूक पोलिसांकडून याकडे दुर्लक्ष केले जाते. आज अशाच निष्काळजी चालकामुळे एका निष्पाप महिलेचा बळी गेला. याला जबाबदार चालकावर व बांधकाम व्यवसायिकावर कारवाई करण्यात यावी, अशी मागणी स्थानीक माजी नगरसेवक व पुणे मर्चंटस चेंबर्सचे माजी अध्यक्ष प्रवीण चोरबोले (Pravin Chorbele) यांनी केली आहे.

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

MNS-BJP-Mahayuti | महायुतीत चौथा वाटेकरी, मनसेने महायुतीकडे ‘या’ 20 जागा मागितल्या? ; जाणून घ्या

RSS On BJP About Support Of Ajit Pawar | पुरेसे बहुमत असताना अजितदादांना सोबत का घेतलं? RSS ने भाजपाला सुनावलं

Sassoon Hospital | ससूनच्या डॉक्टरांची खाजगी मेडिकलवाल्यांशी ‘दुकानदारी’; ससून रुग्णालयाचा कारभार पुन्हा चव्हाट्यावर, कारवाई होणार? (Video)

Maha Vikas Aghadi | अखेर मविआचा तिढा सुटला; विधानपरिषद निवडणुकीतील दोन उमेदवारांचा अर्ज मागे