व्हॉट्स अ‍ॅप ग्रुपचा अ‍ॅडमिनच बिग बॉस

पोलीसनामा ऑनलाईन

व्हॉट्स अ‍ॅप ग्रुप अ‍ॅडमिनसाठी खुषखबर आहे. आता ग्रुपचे सर्वाधिकार ग्रुप अ‍ॅडमिनला मिळणार आहेत. व्हॉट्स अ‍ॅपने नवे फिचर सादर केले असून ग्रुपमध्ये कुठलीही पोस्ट करायचे सगळे अधिकारी अ‍ॅडमिनला असून कुणाला पोस्ट टाकायचे अधिकार द्यायचे असेल याचे नियंत्रण देखील अ‍ॅडमिनला देण्यात आले आहेत. ग्रुप सेटिंगध्ये सेंड मेसेजेस हा नवीन पर्याय देण्यात आला असून पोस्ट करण्याचे राईट ठराविक सदस्यांना आहे. गु्रपमध्ये पोस्ट केवळ अ‍ॅडमिनने करायची की सर्वच सदस्यांना तो अधिकार द्यायचा हे देखील अ‍ॅडमिनच ठरविणार आहे. व्हॉट्स अ‍ॅपच्या या नवीन फिचरमुळे अनेक गु्रप अ‍ॅडमिन यांनी सुटकेचा निश्‍वास सोडला आहे. अनेकांची त्रासांपासून सुटका होणार आहे. काही गु्रपमध्ये भलतेच मेसेज येत असतात. त्यामुळे गु्रपमधील काही सदस्य वैतागतात. काहीजण स्वतःची जाहिरत बाजी ग्रुपमध्ये करतात. अलिकडील काळात व्हॉट्स अ‍ॅपवरून अफवा देखील पसरविल्या जातात. या सर्व गोष्टींवर कंट्रोल ठेवता येणार आहे.

[amazon_link asins=’B078BNQ313′ template=’ProductCarousel’ store=’policenama-100′ marketplace=’IN’ link_id=’4da73708-7c67-11e8-8ffd-a5916836519a’]

नव्याने देण्यात आलेल्या या फिचरमुळे बहुतांश ग्रुप अ‍ॅडमिनची त्रासातुन सुटका होणार आहे. व्हॉट्स अ‍ॅपतर्फे ओन्ली अ‍ॅडमिन्स हे सेटिंग आणले जाणार असून गु्रपमध्ये अ‍ॅडमिन स्वतःच मेजेस टाकायचे, कोणी मेजेस पोस्ट करायचे याचा निर्णय घेऊ शकणार आहे. त्यासाठी अ‍ॅडमिनला ओन्ली अ‍ॅडमिन हे सेटिंग सलेक्ट करावे लागणार आहे. व्हॉटस् अ‍ॅपच्या प्रवक्त्याने इंडियन एक्सप्रेसला यासंदर्भातील माहिती दिली आहे. गेल्या काही वर्षापासुन व्हॉट्स अ‍ॅपला खुप मोठा प्रतिसाद मिळत आहेत. देशात व्हॉट्स अ‍ॅप हे संपर्काचे खुप प्रभावी माध्यम बनले आहे. मात्र, अफवा पसरवणे, अश्‍लील व्हिडिओज, आक्षेपार्ह मजकूर यांचेही प्रमाण व्हॉट्स अ‍ॅपवर लक्षणीय आहे.