BJP On Shivsena MP Sanjay Raut | संजय राऊतांचे मानसिक संतुलन ढासळलंय, तातडीने उपचाराची गरज, नितीन गडकरींच्या विधानावर भाजपाचे प्रत्युत्तर

मुंबई : BJP On Shivsena MP Sanjay Raut | काल मविआ बैठकीत राऊत यांनी प्रकाशजी आंबेडकर यांना हट्ट करू नका असा इशारा देत त्यांचा अपमान केला. एकूणच संजय राऊत यांचे मानसिक संतुलन ढासळलेले आहे आणि त्यांना तातडीने उपचाराची गरज आहे, अशी टीका महाराष्ट्र भाजपाने आपल्या एक्स अकाऊंटवरून शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांच्यावर केली आहे.

नितीन गडकरी (Nitin Gadkari) यांचे पंतप्रधानपदी कुणी नाव पुढे करू नये, यासाठी आताच त्यांचा दिल्लीतील पत्ता कट करण्याचे काम केले जात आहे. नितीन गडकरी हे व्यासपीठावरदेखील सन्मानाने उभे असतात. महाराष्ट्राचा मराठी बाणा जपणाऱ्या नेत्याला अपमानित करायचे, डावलायचे, असे प्रयत्न आहेत, अशी टीका संजय राऊत यांनी केली होती. यावर भाजपाने हे प्रत्युत्तर दिले आहे.(BJP On Shivsena MP Sanjay Raut)

महाराष्ट्र भाजपाने आपल्या अधिकृत एक्स अकाऊंटवर केलेल्या एका दीर्घ पोस्टमध्ये म्हटले आहे की, संजय राऊत यांना नैराश्याने ग्रासलेले आहे. ते रोज काहीही बडबडतात. अलीकडे हे प्रमाण वाढले आहे. त्यामुळे त्यांचा राग येत नाही तर त्यांची कीव येते.

महाविकास आघाडीचे जागा वाटप अडलेले आहे. त्यांच्यात भांडणे सुरू आहेत. या भांडणाचे मुख्य कारण संजय राऊत हेच आहेत, ते आघाडीच्या बैठकीत काँग्रेस नेत्यांचा अपमान करतात. त्यांना धमकावतात. नेत्यांवर चिडचिड करूनही त्यांचे मन शांत होत नाही. म्हणून मग ते बैठकीत चहा देणाऱ्या वेटरवर खेकसतात. त्यामुळे महाविकास आघाडीतील सर्व नेते त्यांच्यावर प्रचंड संतापलेले आहेत.

काल राऊत यांनी प्रकाश जी आंबेडकर यांना हट्ट करू नका असा इशारा देत त्यांचा अपमान केला.
एकूणच संजय राऊत यांचे मानसिक संतुलन ढासळलेले आहे आणि त्यांना तातडीने उपचाराची गरज आहे.

आज संजय राऊत यांनी आमचे प्रदेशाध्यक्ष श्री. चंद्रशेखर जी बावनकुळे यांच्यावर टीका केली.
पण राऊत हे विसरले आहेत की, भारतीय जनता पक्ष हा एकमेव पक्ष असा आहे की, या पक्षातील सामान्य कार्यकर्ता
हा प्रदेशाध्यक्ष, मुख्यमंत्री होऊ शकतो आणि तो देशाचा पंतप्रधान देखील होऊ शकतो.
संजय राऊत ज्यांची चाकरी करतात त्या उबाठा मध्ये केवळ घरकोंबडा बाप आणि त्याचा ३३ वर्षाच्या मुलालाच पद
आणि सन्मान मिळतो. इतरांच्या वाट्याला केवळ मातोश्रीच्या प्रवेशद्वारावर अपमान येतो.

आदरणीय नितिन गडकरी जी आमचे ज्येष्ठ नेते आहेत. गडकरी साहेबांचे कर्तृत्व मोठे आहे.
संजय राऊत यांच्या सारख्या घरगड्यांनी त्यांची चिंता करू नये, असे या पोस्टमध्ये भाजपाने म्हटले आहे.

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

Pune News | पुणे महापालिका विधी सल्लागार निशा चव्हाण यांना मुक्ता साळवे पुरस्कार प्रदान

Nokia C01 Plus: A Reliable and Simplistic Budget Smartphone